Lokmat Sakhi >Fitness > वयानुसार किती व्यायाम करावा? WHO सांगते; रोज 'या' प्रकारचा व्यायाम केल्याने पन्नाशीतही फिट राहाल

वयानुसार किती व्यायाम करावा? WHO सांगते; रोज 'या' प्रकारचा व्यायाम केल्याने पन्नाशीतही फिट राहाल

WHO guidelines on physical activity and sedentary behaviour: at a glance : दररोज किमान किती तास व्यायाम केल्याने आरोग्य सुदृढ राहील?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2024 01:07 PM2024-06-19T13:07:16+5:302024-06-19T13:08:51+5:30

WHO guidelines on physical activity and sedentary behaviour: at a glance : दररोज किमान किती तास व्यायाम केल्याने आरोग्य सुदृढ राहील?

WHO guidelines on physical activity and sedentary behaviour: at a glance | वयानुसार किती व्यायाम करावा? WHO सांगते; रोज 'या' प्रकारचा व्यायाम केल्याने पन्नाशीतही फिट राहाल

वयानुसार किती व्यायाम करावा? WHO सांगते; रोज 'या' प्रकारचा व्यायाम केल्याने पन्नाशीतही फिट राहाल

व्यायाम केवळ शरीराला आकार देण्यासाठी नसून, त्याचे इतरही अनेक फायदे आहेत (Exercise Guidelines). अनेक अभ्यासांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, जे लोक नियमित व्यायाम करतात, त्यांना मधुमेह, हृदयरोग, नैराश्य, चिंता, स्ट्रोक, निद्रानाश यासारख्या गंभीर आरोग्य समस्या होण्याची शक्यता कमी असते.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार (WHO), 'व्यायाम न करणाऱ्या लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका २० ते ३० टक्के जास्त असतो. दर चारपैकी एक व्यक्ती पुरेसा व्यायाम करत नसल्याचेही संस्थेने म्हटले आहे (Health Tips). अशा परिस्थितीत आपणही व्यायाम करीत नसाल तर, आरोग्याकडे लक्ष द्यायला सुरुवात करा (Physical Activity).' पण वयानुसार किती वेळ व्यायाम करायला हवे? हे देखील जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे(WHO guidelines on physical activity and sedentary behaviour: at a glance).

एखाद्या व्यक्तीने कोणता व्यायाम किती वेळ करावा हे अनेक घटकांवर अवलंबून असते. अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनाने शारीरिक हालचालींबाबत मार्गदर्शक तत्त्वे शेअर केली आहेत. त्यानुसार आपण वयानुसार किती वेळ व्यायाम करायला हवा. हे कळून येईल.

विकतचे महागडे प्रोटीन पावडर कशाला? 'या' डाळीची करा झटपट प्रोटीन पावडर; वजन घटेल - मसल्स वाढतील

वय ५ ते १७

दिवसातून कमीतकमी ६० मिनिटे मिडीयम ते हार्ड फिजिकल अॅक्टिव्हिटी करायला हवी. आठवड्यातून ३ दिवस एरोबिक व्यायाम आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगचा समावेश करायला हवा.

वय १८ ते ६४

आठवड्यातून किमान १५० ते ३०० मिनिटे मध्यम ७५ ते १५० मिनिटे हार्ड एरोबिक अॅक्टिव्हिटी करायला हवी. आठवड्यातून २ वेळा आपण स्ट्रेंथ ट्रेनिंग देखील घेऊ शकता.

ती सोडून गेली आणि ‘त्यानं’ स्वत:ला बदलून टाकलं, पाहा ब्रेकअपने आयुष्य पालटवणाऱ्या तरुणाची गोष्ट

६५ वर्षांपेक्षा अधिक

६५ वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील व्यक्ती आठवड्यातून २ ते ३ वेळा तज्ज्ञांचा सल्ला घेऊन व्यायाम करू शकते. 

Web Title: WHO guidelines on physical activity and sedentary behaviour: at a glance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.