Lokmat Sakhi >Fitness > वाढीच्या वयात मुलं फिट व्हावी असं वाटत असेल तर खाऊ घाला ५ पदार्थ, आजीपणजीच्या काळातला सोपा उपाय

वाढीच्या वयात मुलं फिट व्हावी असं वाटत असेल तर खाऊ घाला ५ पदार्थ, आजीपणजीच्या काळातला सोपा उपाय

Why are Indian villagers fit without doing any workout? : प्रोटीन पावडर न खाता खेड्यातील लोक 'या' पद्धतीने बॉडी बनवतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2024 05:01 PM2024-07-23T17:01:34+5:302024-07-25T16:56:22+5:30

Why are Indian villagers fit without doing any workout? : प्रोटीन पावडर न खाता खेड्यातील लोक 'या' पद्धतीने बॉडी बनवतात

Why are Indian villagers fit without doing any workout? | वाढीच्या वयात मुलं फिट व्हावी असं वाटत असेल तर खाऊ घाला ५ पदार्थ, आजीपणजीच्या काळातला सोपा उपाय

वाढीच्या वयात मुलं फिट व्हावी असं वाटत असेल तर खाऊ घाला ५ पदार्थ, आजीपणजीच्या काळातला सोपा उपाय

बॉडी बनत नसेल तर, बरेच जण जिम लावतात. तिथे व्यायाम करून वजन वाढवतात (Fitness). पण खेड्याकडच्या मुलांची शरीरयष्टी जिमला न जाता फिट दिसते. जिम किंवा डाएट फॉलो न करता, मुलांची बॉडी कशी तयार होते? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल (Weight Loss).  घरचे अन्न खरंतर वजन वाढवण्यास मदत करतात. जर जिम आणि डाएट फॉलो न करता, मजबूत बॉडी बनवायची असेल तर, आहारात काही पदार्थांचा समावेश करा. यामुळे नक्कीच बॉडी तयार करण्यास मदत होईल. ताकदवान शरीर हवं असेल तर, आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करायला हवा पाहूयात..

गुळ आणि चणे

खेड्याकडची मुलं अजूनही गुळ आणि भाजलेला हरभरा खातात. या दोन्ही पदार्थांमध्ये आयर्न आणि कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. या दोन्ही गोष्टी समप्रमाणात खाल्ल्याने शरीरात रक्त तयार होते. आणि कॅल्शियममुळे हाडं मजबूत होतात.

डाळ - भात

आजही खेड्यात विविध प्रकारची डाळीसोबत भात खाल्ला जातो. विविध प्रकारच्या डाळींमध्ये प्रोटीन, आयर्न, खनिजे, कॅल्शियम आणि सर्व आवश्यक पोषक तत्वांचे भांडार आढळते. जे शरीराला मजबूत आणि मसल्स बिल्ड करण्यास मदत करतात.

ब्रेन पॉवर वाढवण्यासाठी खा ५ पदार्थ; तुम्ही कधीच काहीच विसरणार नाही

धान्य

गावाकडे फक्त गहू नसून, फायबरयुक्त धान्यांचा आहारात समावेश केला जातो. ज्यात मका, हरभरा, बाजरी आणि ज्वारीचा समावेश केला जातो. ज्यामुळे शरीर अधिक मजबूत होते.

दूध, ताक, दही

आहारात दुग्धजन्य पदार्थांचा समावेश जरूर करायला हवा. नियमित, दूध, ताक किंवा दही खायला हवे. यातील पौष्टीक घटक आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

फ्रेश पाले भाज्या

बाराही महिने पालेभाज्या खायला हवे. पालेभाज्यांमध्ये विविध पौष्टीक घटक असतात. यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फोलेट असतात. हे पोषक तत्व विविध शारीरिक कार्यांना मदत करतात.

कानात मळ झाला म्हणून कान कोरता? पाहा, कानात मळ झाला तर काय करायचे..

फास्ट फूडपासून दूर राहा

खेड्यातील मुलं फास्ट फूडपासून दूर राहतात. या पदार्थांमुळे शरीराची योग्य वाढ होत नाही. शिवाय वजन वाढते. त्यामुळे फास्ट फूड खाणं टाळा.

Web Title: Why are Indian villagers fit without doing any workout?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.