Join us  

स्तन बेढब, ओघळल्यासारखे दिसतात? कायम सुडौल, मेंटेन दिसायचंय तर ५ टिप्स लक्षात ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 9:30 AM

Why breast sagging occurs : लाईफस्टाईलचा आपल्या स्तनांवरही परिणाम होतो. सिगारेट स्मोकींगमुळे शरीरातील इलास्टिन तंतूंवर परिणाम होतो आणि त्यामुळे त्वचेची लवचिकता कमी होते.  

वाढत्या वयात  शरीरात अनेक बदल होत जातात. शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेत छातीच्या आकारातही बदल होतो. प्रेग्नंसी, वजन वाढ, हार्मोनल बदल या कारणांमुळे स्तनांमध्ये बराच बदल जाणवतो. महिलांचे स्तन हे  फॅट्स आणि लिगामेंट्सच्या मदतीनं तयार होतात. (Sagging Breasts Causes and Prevention) स्तन सैल झाल्यासारखे वाटणं म्हणजेच ओघळल्यासारखे वाटणं खूपच कॉमन आहे.  गायनॅकोलोजिस्ट डॉ, गरिमा श्रीवास्तव यांनी इंस्टाग्रामवरून याबाबत अधिक माहिती दिली आहे. त्यांच्यामते स्तन ओघळणं हे नैसर्गिक आहे. (Why breast sagging occurs) 

स्तन लूज झाल्यासारखे का वाटतात?

जसजसे महिलांचे वय वाढते तसतसे स्तनांचे टिश्यूज सैल होते. स्तन हा अशा अवयवांपैकी एक आहे ज्यामध्ये वयाचा प्रभाव प्रथम दिसू लागतो. लवचिकता कमी झाल्यामुळे, स्तनाची परीपूर्णता कमी होते आणि स्तनाखालील आधार कमी होतो. हा बदल रजोनिवृत्तीपूर्वी जास्तीत जास्त दिसतो. हे तुमच्या वयाच्या आधी होत आहे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही रोज व्यायाम करा आणि तुमचा आहार बदलून संतुलित आहार घ्या.

गुरूत्वाकर्षण

गुरुत्वाकर्षणाचा आपल्या स्तनांवर खूप परिणाम होतो. स्तन वर्षानुवर्षे ताणलेले असतील तर कालांतराने ते सैल होतात. गुरुत्वाकर्षणाबरोबरच सनबर्न आणि अल्ट्राव्हायोलेट किरणांचाही स्तनाच्या लवचिकतेवर परिणाम होतो. म्हणूनच मान, स्तन आणि पाठीच्या भागावर सनस्क्रीन वापरण्याची शिफारस केली जाते.

वजन जास्त वाढणं

वजन वाढलं की छातीच्या आकारात बदल होतो. गरजेपेक्षा जास्त  वजन ब्रेस्ट मसल्सना स्ट्रेच करतात. हेल्दी वेटसाठी फिजिकल फिटनेस गरजेचा आहे. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी थायरॉईट टेस्ट करणं गरजेचं आहे.  तज्ज्ञांच्या सल्ल्यानं डाएट करून तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता. 

जीवनशैली

लाईफस्टाईलचा आपल्या स्तनांवरही परिणाम होतो. सिगारेट स्मोकींगमुळे शरीरातील इलास्टिन तंतूंवर परिणाम होतो आणि त्यामुळे त्वचेची लवचिकता कमी होते.  तर त्यामुळे चेहऱ्याची त्वचाही लवकर वयस्कर झाल्याप्रमाणे दिसते.

बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामदेव बाबा सांगतात ५ उपाय; हृदय राहील ठणठणीत

ब्रा निवडताना चूक करू नका

ब्रेस्ट साईज कोणतीही असेल तरी नेहमी सपोर्टिव्ह ब्रा वापरायला हवी. जर तुम्ही ही सवय सुरूवातीपासून लावली नाही तर  ३५ वयात येईपर्यंत ब्रेस्ट ओघळण्यास सुरूवात होते. नॉर्मल कॉटन ब्रा न वापरता पॅडेड पुशअप ब्राचा वापर करा. यामुळे स्तनांना योग्य आधार मिळेल. प्रत्येक वर्षी स्तनांची साईज मोजून त्यानुसार ब्रा विकत घ्या. जुन्या मापाची ब्रा घेऊ नका.

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यस्त्रियांचे आरोग्य