Join us  

लंचब्रेकनंतर ऑफिसमध्ये खूप सुस्ती येते- कामं सुचत नाहीत? ५ गोष्टी करा- दिवसभर फ्रेश वाटेल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2024 2:49 PM

Why Do We Feel Sleepy After Lunch Break: लंचब्रेकनंतरचा बराच वेळ जांभया देत जातो, असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. अशी सुस्ती येऊ नये म्हणून बघा काय करावं... (How do you stay fresh after lunch?)

ठळक मुद्देजेवण झाल्यानंतर लगेच कामाला येऊन बसू नका. १० ते १२ मिनिटे तरी ऑफिसच्या परिसरात चाला. त्यानंतर पाणी प्या आणि मग कामाला सुरुवात करा. सुस्ती येणार नाही. 

आपली दिवसाची सुरुवात मोठ्या उत्साहात होते. घरचं, मुलांचं, नवऱ्याचं, स्वत:चं झटपट आवरून आपण धावतपळत ऑफिस गाठतो. तिथेही भराभर कामं हातावेगळी करतो. एवढं सगळं होईपर्यंत लंचब्रेकची वेळ होतेच. तो ब्रेक होतो आणि त्यानंतर मात्र आपण पुर्णपणे ढेपाळून जातो. लंचब्रेकच्या आधीचा आणि त्यानंतरचा आपला दिवस पुर्णपणे वेगळा असतो. सकाळच्या सत्रात असणारा उत्साह आणि कामाचा झपाटा लंचब्रेकनंतर मात्र पुर्णपणे गायब होतो (why do we feel sleepy after lunch break in office). असं रोजच झालं तर त्याचा परिणाम कामावर होतो. स्त्री असो अथवा पुरुष असो, ऑफिसला जाणाऱ्या बहुतांश लोकांना या अनुभवातून जावंच लागतं (why do we get lazy in afternoon after lunch?). म्हणूनच आता हा बघा त्यावरचा उपाय.. लंचब्रेकनंतर तुम्हाला अजिबात सुस्ती येणार नाही. (How do you stay fresh after lunch?)

 

लंचब्रेकनंतर सुस्ती येऊ नये म्हणून काय करावं?

१. तुम्हाला रात्री उशिरा झोपण्याची सवय असेल तर त्यामुळेही तुम्हाला दुपारी झोप येऊ शकते. रात्री १० ते १०: ३० च्या दरम्यान नियमितपणे सक्तीने झोपा. दुसऱ्यादिवशी दिवसभर फ्रेश वाटेल.

राखीपौर्णिमेला भावासाठी गोड काय करावं? बघा साखर- कॅलरी कमी असणाऱ्या ५ सुपरहेल्दी मिठाई

२. तुम्ही दुपारी डबा खाताना ओव्हरइटींग तर करत नाही ना, याकडे लक्ष द्या. दुपारच्या जेवणात जास्तीतजास्त प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्स असतील, याकडे लक्ष द्या. आणि खूप जास्त खाऊ नका. पोट थोडं रिकामंच ठेवा.

 

३. नियमितपणे पाणी प्या. पुरेसं पाणी शरीरात गेलं नाही तरी सुद्धा झोप येऊ लागते. थकवा जाणवतो. त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने आठवण ठेवून पाणी प्या.

राखीपौर्णिमा स्पेशल: पार्लरसाठी वेळच नाही? ३ पदार्थ मिसळून चेहऱ्याला लावा; मिळेल फेशियलसारखा इंस्टंट ग्लो

४. सकाळच्या धावपळीतून वेळ काढणं थोडं अवघड असलं तरी १० मिनिटे का होईना पण व्यायाम करा, शांत बसून ध्यान करा. यामुळे मन शांत होतं आणि दिवसभर उत्साही वाटतं. 

५. जेवण झाल्यानंतर लगेच कामाला येऊन बसू नका. १० ते १२ मिनिटे तरी ऑफिसच्या परिसरात चाला. त्यानंतर पाणी प्या आणि मग कामाला सुरुवात करा. सुस्ती येणार नाही. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सअन्नयोगासने प्रकार व फायदेव्यायाम