लठ्ठपणा हा जणू एक प्रकारचा आजारच झाला आहे. काही लोकांचे झपाट्याने वजन वाढते. ते कमी करताना नाकीनऊ येतात. अनेक महिला स्वतःकडे लक्ष देत नाहीत. ज्यामुळे वजन वाढत राहते, बिघडलेल्या जीवनशैलीमुळे ही समस्या निर्माण होते. वजन वाढत राहिलं तर अनेक आजारांचा धोका वाढतो. या आजारांमध्ये हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, व कर्करोग यांचा समावेश आहे. यासंदर्भात, नवी मुंबई, वाशी येथील फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटलचे डॉ. शरद शर्मा सांगतात महिलांना लठ्ठपणाचा धोका का जास्त असतो आणि त्यातून कोणते त्रास उद्भवतात(Why do women gain weight for no reason?).
महिलांच्या लठ्ठपणाची कारणं कोणती?
१.हल्ली अनेकजणी नोकऱ्या करतात. पण डेस्क जॉब. या बैठी जीवनशैलीमुळे वजन लवकर वाढते.
२. अनहेल्दी डाएट ज्यात कॅलरीयुक्त पदार्थ, प्रोसेस्ड फूड्स, सोडा, शुगर ड्रिंक्स, अनहेल्दी फॅट, आहारात सोडियमचे प्रमाण जास्त. हे सर्व पदार्थ शरीराचे वजन वाढवण्याचं काम करतात. हे पदार्थ वगळा, व त्या जागी हेल्दी पदार्थ खा.
३. गर्भधारणा, मेनोपॉज, हार्मोन्समध्ये बदल, किंवा इतर आजारांमुळे स्त्रियांचे वजन वाढू शकते. डॉक्टरांचा सल्ला घेऊन आहाराकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
वजन कमी करायचं तर आधी पचन सुधारा! करा ४ गोष्टी, झटपट कमी होतील नकोसे फॅट्स
४. स्ट्रेस, डिप्रेशन, व इतर मानसिक कारणांमुळे खाण्यापिण्याच्या सवयीवर थेट परिणाम होतो. काही लोकं स्ट्रेस - इटिंग करतात. ज्यामुळे वजन वाढीची समस्या निर्माण होते.
५. आनुवंशिक कारण, मेटाबॉलिज्म स्लो असणे, चरबी जमा होणे, याचा थेट परिणाम आपल्या भुकेवर होतो. ज्यामुळे वजन वाढते.
६. काही औषधे जसे की अँटीडिप्रेसेन्ट्स, अँटीसायकोटिक्स, कॉर्टिकोस्टिरॉईड्स आणि काही गर्भनिरोधक गोळ्यांच्या दुष्परिणामामुळे वजन वाढू शकते.
जिरे-मिरे-दालचिनी-हळद, पोटावरची चरबी कमी करण्याचा १ सोपा आणि मस्त उपाय
७, वाढत्या वजनाकडे दुर्लक्ष न करता योग्य आहार, योग व्यायाम यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. अतिरेकी डाएट न करता आपली जीवनशैली कशी उत्तम राखता येईल याकडे लक्ष द्या.