Lokmat Sakhi >Fitness > आठवड्याच्या 'या' वारी तुम्हालाही येऊ शकतो हार्ट अ‍ॅटॅक; डॉक्टर सांगतात अचानक अ‍ॅटॅक येण्याचं कारण..

आठवड्याच्या 'या' वारी तुम्हालाही येऊ शकतो हार्ट अ‍ॅटॅक; डॉक्टर सांगतात अचानक अ‍ॅटॅक येण्याचं कारण..

Why Heart Attack Risk High On Monday Mornings : रात्री उशिरा झोपणं आणि सकाळी उशीरा उठल्यामुळे शरीरावर चुकीचा परिणाम होतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 08:38 AM2024-10-23T08:38:00+5:302024-10-23T14:53:25+5:30

Why Heart Attack Risk High On Monday Mornings : रात्री उशिरा झोपणं आणि सकाळी उशीरा उठल्यामुळे शरीरावर चुकीचा परिणाम होतो.

Why Heart Attack Risk High On Monday Mornings Know Reason By Doctor Nene How To Prevent Heart Attack | आठवड्याच्या 'या' वारी तुम्हालाही येऊ शकतो हार्ट अ‍ॅटॅक; डॉक्टर सांगतात अचानक अ‍ॅटॅक येण्याचं कारण..

आठवड्याच्या 'या' वारी तुम्हालाही येऊ शकतो हार्ट अ‍ॅटॅक; डॉक्टर सांगतात अचानक अ‍ॅटॅक येण्याचं कारण..

मागच्या काही वर्षांत हार्ट अ‍ॅटॅक चा धोका वेगानं वाढला आहे. हार्ट अ‍ॅटॅक मुळे मृत्यू होण्याची अनेक कारणं समोर आली आहेत. हार्ट अ‍ॅटॅक  कोणत्याहीवेळी येऊ शकतो. पण सोमवारी हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. ब्रिटिश हार्ट फाऊंडेशनच्या रिपोर्टनुसार सोमवारच्या दिवशी हार्ट अ‍ॅटॅक  येण्याचा धोका १३ टक्के जास्त असतो. (Why Heart Attack Risk High On Monday Mornings Know Reason By Doctor Nene)

अभिनेत्री माधुरी दिक्षीतचे पती आणि प्रसिद्ध  कार्डीयोथोरेसिक सर्जन डॉ. नेने यांनी देखिल सांगितले होते की सोमवारी हार्ट अ‍ॅटॅक  येण्याचा धोका जास्त असतो अशा स्थितीत तुम्हाला फार सावध राहण्याची गरज आहे.आकडेवारीनुसार सोमवारच्या दिवशी हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. रिपोर्ट्सनुसार सोमवारी हार्ट अटॅकचा धोका १३ टक्क्यांनी वाढतो. ज्याला ब्लू मंडे असंही म्हटलं जातं. असं का होतं, याची कारणं काय समजून घेऊ. (How To Prevent Heart Attack)

ब्ल्यू मंडे काय असते?

रिजनरेशन सेंटर ऑफ थायलंडच्या अहवालानुसार  हृदयविकाराचा झटका जास्त प्रमाणात आठवड्याच्या सुरूवातीला उद्भवतो.  आयरिश डॉक्टरांनी संपूर्ण आयलँडमधील जवळपास १० हजारांपेक्षा जास्त रुग्णांच्या वैदयकिय नोंदींचा शोध घेतला ज्यांना मायोकार्डियल इन्फ्रॅक्शनमुळे २०१३ ते २०१८ दरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  ब्ल्यू मंडेच्या प्रभावामागील कारणं अजूनही वैज्ञानिक समुदायालला पूर्णपणे समजलेली नाहीत.

सोमवारी सकाळी ६ ते १० वाजतादरम्यान हार्ट अ‍ॅटॅक येण्याचा धोका सगळ्यात जास्त असतो. डॉक्टर नेने सांगतात की सोमवारी सकाळी उठल्यानंतर ब्लड कोर्टिसोल आणि हॉर्मोन जास्त प्रमाणात  वाढतात. ज्यामुळे सर्काडियन रिदम होते. ज्यामुळे झोपण्याची आणि उठण्याची सायकल प्रभावित होते. एक्सपर्ट्सच्या मते झोपण्याच्या आणि उठण्याच्या सायकलमध्ये बदल झाल्यास आरोग्यावर चुकीचा परिणाम होतो. 

डॉक्टर नेने यांच्यामते बरेच लोक रविवारी उशिरा झोपतात तर काही लोक चित्रपट पाहायला जातात. रात्री उशिरा झोपणं आणि सकाळी उशीरा उठल्यामुळे शरीरावर चुकीचा परिणाम होतो. तुमच्या सर्काडिनय रिदमध्ये बदल होतो. रविवारी रात्री झोप पूर्ण न झाल्यामुळे सोशल जेट लॅग सुद्धा होते आणि हार्ट अ‍ॅटॅकचा धोका वाढतो.

Web Title: Why Heart Attack Risk High On Monday Mornings Know Reason By Doctor Nene How To Prevent Heart Attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.