आपल्याकडे पुर्वीपासून हाताच्या पाच बोटांचा वापर करूनच जेवण करतात. अगदी वरणभात, पोहे, उपमा खाण्यासाठीही हाताच्या पाच बोटांचाच वापर व्हायचा. पण हल्ली आपल्या जेवणात चमचे आले आहेत. अगदी इडली- उत्तप्पा खायलाही आपण चमचे वापरू लागलो आहेत. काही काही ठिकाणी तर वरणभात कंम्प्लसरी चमच्यानेच खाल्ला जातो. हाताने खाणाऱ्या लोकांकडेही विचित्र नजरेने पाहिले जाते (Benefits of eating with your hands). तुम्हालाही अशा सवयी असतील तर त्या लगेच सोडा आणि चमच्याऐवजी हाताची पाच बोटे वापरून जेवण करण्यास प्राधान्य द्या.. असं का करावं, यामागचं कारण सांगत आहेत अनेक सेलिब्रिटींच्या फिटनेस ट्रेनर असलेल्या अंशुका परवानी (Why to avoid spoon for eating?)...
चमचा न वापरता हाताने जेवण्याचे फायदे
याविषयी सांगताना अंशुका म्हणतात की आपली पाच बोटं ही पाच तत्त्वांची प्रतिकं आहेत. जेव्हा आपण घास घेण्यासाठी ही पाच बोटं एकत्र करतो, तेव्हा त्यातून शुन्य मुद्रा तयार होते. या मुद्रेचे अनेक फायदे आहेत.
यामुळे शरीरातील रक्ताभिसरण क्रिया वाढण्यास मदत होते.
ब्यूटी ब्लेंडर धुण्याची योग्य पद्धत पाहून घ्या, नुसतंच पाण्याने धुत असाल तर त्वचेचं होईल नुकसान....
हल्ली mindful eating या संकल्पनेविषयी खूप बोललं जातं. हे हाताच्या पाच बोटांचा वापर करून जेवल्याने शक्य होते. कारण यामुळे आपला मेंदू आणि आपण खात असलेले अन्न यांच्यात कनेक्शन निर्माण होते आणि त्यामुळे अतिखाणे न होता आपल्याला जेवढी भूक आहे, तेवढेच अन्न खाण्याची सूचना मेंदूकडून येते.
त्याच त्या नेहमीच्या कानटोप्या नकोच, बाळांसाठी बघा कानटोप्यांचे ३ हटके पर्याय- बाळ दिसेल आणखी गोंडस
या मुद्रेमुळे पचनक्रिया वाढण्यास मदत होते.
त्यामुळे आता चारचौघात हाताने जेवण्याचा न्यूनगंड सोडा आणि चमच्याला बाय बाय करून बिंधास्तपणे हाताची पाच बोटे एकत्र करून जेवा.