Join us  

रोज मॉर्निंग वॉकला जाता पण वजन कमीच होत नाही? ५ गोष्टी करा, वजन आणि होईल कमी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2023 2:06 PM

How Walking Can Help You Lose Weight and Belly Fat : म्हणायला रोज मॉर्निंग वॉक होते पण गप्पा मारत, रमतगमत चालत असाल तर झोपमोड करुन फिरण्याचाही काही उपयोग नाही.

आपल्यापैकी बरेचजण फिट राहण्यासाठी तसेच वजन कमी करण्यासाठी अशा अनेक कारणांनी मॉर्निंग वॉकला जातात. नियमित मॉर्निंग वॉक केल्यास वजन नियंत्रणात राहण्याव्यतिरिक्त आरोग्याला अनेक लाभ मिळतात. नियमित मॉर्निंग वॉक करण्याचे अनेक फायदे आहेत. दिवसाच्या सुरुवातीस २० ते ३० मिनिटांसाठी वॉक केल्यास आपल्याला दिवसभरातील काम करण्यास अधिक ऊर्जा मिळते. विशेष म्हणजे जी लोक नियमित मॉर्निंग वॉक करतात त्यांच्या शरीरात रात्रीपर्यंत ऊर्जा टिकून राहते. निरोगी आरोग्यासाठी खरंतर अनेक प्रकारचे व्यायाम करणे गरजेचे असते. परंतु सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे किंवा वेळेच्या अभावामुळे आपल्याला व्यायाम करण्यास वेळ मिळत नाही. अशावेळी किमान सकाळी उठून मॉर्निंग वॉक करणे हा सर्वात सोपा व्यायाम प्रकार आहे. 

मॉर्निंग वॉकची सवय आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सर्व वयोगटातील लोकांनी सकाळी लवकर उठून किमान मॉर्निंग वॉक करण्याचा सल्ला दिला जातो.  यामुळे अनेक आजारांपासून मुक्तता मिळतो. मॉर्निंग वॉक करताना आपण जर वेगाने चालत असाल तर हा एक उत्तम कार्डिओ व्यायाम प्रकार देखील होऊ शकतो. असे केल्याने शरीर केवळ टोनच राहत नाही तर दिवसभर फ्रेशही वाटते. मात्र, जर तुम्हाला मॉर्निंग वॉक आणखी फायदेशीर बनवायचा असेल, तर काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. मेडिकल न्यूज टुडेच्या म्हणण्यानुसार, आपण जर नियमित किंवा १२ आठवड्यातुन  प्रत्येकी ३ दिवस, ५० ते ७० मिनिटे सलग  मॉर्निंग वॉक किंवा ब्रिस्क वॉक केल्यास यामुळे आपली कंबर १.१ इंच तर कमी होईलच, पण त्याचबरोबर शरीरातील चरबीही १.५ टक्क्यांनी कमी होईल(Why You Haven't Been Losing Weight With Morning Walking).

मॉर्निंग वॉक करताना नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ? 

१.  मॉर्निंग वॉक करण्याचा वेग वाढवा :- तुम्ही जितका तुमचा चालण्याचा वेग वाढवाल तितक्या वेगाने शरीरातील अतिरिक्त कॅलरीज कमी होऊ लागतील आणि तुमचे वजन कमी होऊ लागेल. त्यामुळे दररोज आणखी काही पावले चालण्याचा प्रयत्न करा.

२. मॉर्निंग वॉक घेताना वजन कॅरी करा :- मॉर्निंग वॉक करताना ते अधिक फायदेशीर व्हावे यासाठी मॉर्निंग वॉक घेताना वजन कॅरी करा. मॉर्निंग वॉक करताना वजन घेऊन चालण्यानें अधिक फायदे दिसून येतात. यासाठी आपण हातात छोटे डंबेल्स किंवा हेव्ही एक्सरसाइज वेट प्लेट हातात कॅरी करुन चालू शकता. 

३. चढण चढण्याचा प्रयत्न करा :- मॉर्निंग वॉक करताना सरळ सपाट रस्त्यांवर मॉर्निंग वॉक करण्यापेक्षा चढण असलेल्या रस्त्यांवर मॉर्निंग वॉक करणे हे केव्हाही उत्तम. चढण असलेल्या रस्त्यांवर मॉर्निंग वॉक केल्याने आपल्या पायांच्या आणि शरीराच्या स्नायूंवर थोडा ताण पडून ते अधिक अ‍ॅक्टिव्ह होण्यास मदत मिळते.   

आलिया म्हणाली, योगासनं कर तर चेहऱ्यावर तेज येईल! रणबीर कपूर सांगतो, लाइफस्टाइल बदलली आणि...

४. बॉडी पोश्‍चर वर लक्ष द्यावे :- मॉर्निंग वॉक करताना नेहमी आपल्या बॉडी पोश्‍चर वर लक्ष द्यावे. मॉर्निंग वॉक करताना नेहमी समोर बघून सरळ रेषेत समोरच्या दिशेने चालण्याचा प्रयत्न करावा, मॉर्निंग वॉक करताना नजर समोर ठेवून चालावे. चालताना नेहमी आपल्या पोटाच्या मसल्सना टाइट करुन एक एक पाऊल पुढे टाकत चालत राहावे. 

५. रोज जास्तीत जास्त पावले चालण्याचा प्रयत्न करावा :- मॉर्निंग वॉक करताना रोज कालपेक्षा अधिक पावले चालण्याचा प्रयत्न करावा. रोज किती पावले चालत आहोत याची नोंद ठेवा. तसेच आज जितकी पावले चाललो उद्या त्यापेक्षा अधिक पावले चालण्याचा प्रयत्न करावा.

उन्हाळ्यात डिहायड्रेशनचा त्रास होतो? योगतज्ज्ञ सांगतात ३ सोपे उपाय, लाही लाही होईल कमी...

टॅग्स :फिटनेस टिप्स