बहुतांश लोकांना असे वाटते की, अन्न कमी खाल्ल्याने वजन कमी (Weight loss) होते. यासाठी अनेक जण नाश्ता किंवा रात्रीचं जेवण स्किप करतात. पण सकाळचा नाश्ता स्किप केल्याने खरंच वजन कमी होते का? नाश्ता स्किप केल्याने फिगर स्लिम-ट्रिम होते का? तंदुरुस्त राहण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी आपण नाश्ता स्किप करत असाल तर, असे अजिबात करू नका.
कारण एक वेळचं जेवण स्किप केल्याने शरीरात मायक्रोन्यूट्रिएंट्सची कमतरता भासू लागते. मेटाबॉलिक डिसऑर्डरमुळे आजार तर वाढतातच शिवाय वेट गेनही होते(Will Skipping Breakfast Make You Fit or Fat?).
यासंदर्भात पोषणतज्ज्ञ इतू छाबरा सांगतात, 'जर आपण वेट लॉस करण्याच्या नादात नाश्ता स्किप करत आसाल तर असे करू नका. कारण नाश्ता केल्याने आपल्याला दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. त्यामुळे नाश्ता हा नेहमी पोटभर आणि हेल्दी पदार्थांनी करावा. हेल्दी ब्रेकफास्टमुळे वजन नियंत्रणात राहते, व ब्लड शुगरही कण्ट्रोलमध्ये राहते.'
गव्हाच्या पिठांत मिसळा ३ प्रकारची पिठं, वजन होईल झरझर कमी- खा चपाती बिंधास्त
ब्रेकफास्ट महत्वाचे का आहे?
रात्रीचे जेवण करून जेव्हा आपण झोपतो, त्यानंतर दुसऱ्या दिवसापर्यंत आपला उपवास होतो. त्यामुळे सकाळी आपल्याला शरीराला हेल्दी पदार्थांची गरज असते. जेणेकरून आपल्याला दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. त्यामुळे हेवी पण हेल्दी पदार्थ खाऊन दिवसाची सुरुवात करा.
ब्रेकफास्ट स्किप केल्याने काय होते?
धावपळीच्या या जीवनात अनेकांना स्वतःसाठी विशेष वेळ मिळत नाही. ज्यामुळे कित्येकांना नाश्ता करायलाही वेळ मिळत नाही. त्यामुळे बरेच जण नाश्ता स्किप करून थेट लंच करतात. पण ही जीवनशैली चुकीची आहे. अनेक जण नाश्ता वजन कमी होईल या आशेने स्किप करतात. पण यामुळे कमी होत नसून वाढते. त्यामुळे पौष्टीक पदार्थांनीच दिवसाची सुरुवात करा.
नाश्ता स्किप केल्याने कोणते आजार छळतात?
हृदयरोग
मधुमेह
लठ्ठपणा
उच्च रक्तदाब
हिरोईनसारखी किलर ३४-२४-३६ फिगर हवी? मग घरीच करा ५ सोपे व्यायाम, व्हा फिट आणि सुंदरही
स्ट्रोक
लठ्ठपणा
हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीत समस्या
एलडीएल कोलेस्ट्रॉलमध्ये वाढ
नाश्ता स्किप केल्याने मेटाबॉलिक रेट होते कमी
नाश्ता स्किप केल्याने चयापचय क्रिया मंदावते. ज्यामुळे वजन वाढीची समस्या निर्माण होते. जेव्हा आपण कमी कॅलरीजचे सेवन करतो. तेव्हा आपले शरीर संवर्धन मोडमध्ये जाते, ज्यामुळे आपली चयापचय मंदावते.
रक्तदाब होईल अनियंत्रित
काही लोकांना नाश्ता स्किप केल्यानंतर डोकेदुखी, रक्तातील साखर कमी होणे, चक्कर येणे, लक्ष केंद्रित करण्यात अडचण या प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागते. वेळेवर नाश्ता केल्यास ब्लड शुगर लेव्हल यासह कोलेस्टेरॉलची पातळी सुधारण्यास मदत होते.
न्यूट्रिशनिस्ट इतू छाबरा म्हणतात, "नाश्ता स्किप केल्याने अॅसिडिटीचा त्रास होतो. यासह भूकही लागते. नाश्ता स्किप केल्याने आपले वजन कमी होऊ शकते. पण ते कमी कालावधीसाठी, त्यानंतर पुन्हा आपले वजन झपाट्याने वाढू शकते.'