Join us  

हिवाळ्यात रोज खा रताळी, व्हिटामिन-फायबरचे पॉवरहाऊस-कतरिना कैफच्याही डाएटमधला खास आवडता पदार्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 9:12 PM

Sweet Potatoes Benefits : रताळ्यांमध्ये एंटीऑक्सिडेंट्स मोठ्या प्रमाणात असतात. त्वचा तरूण ठेवण्यासाठीही मदत होते.

हिवाळा (Winter) हा रताळ्यांचा सिजन असतो. रताळ्यांची चव गोड आणि अधिक रूचकर असते. रताळे पोषक तत्वांचा भंडार आहे (Sweet Potatoes Benefits) . रताळे खाल्ल्यानं शरीराला बरेच फायदे मिळतात. रताळ्यांमध्ये फायबर्स, व्हिटामीन ए, व्हिटामीन सी आणि बी-६ असते. याव्यतिरिक्त पोटॅशियम, मॅग्ननिज यांसारखे मिनरल्स असतात. रताळ्यांचा वापर करून तुम्ही अनेक वेगवेगळ्या रेसिपीजही बनवू शकता. थंडीच्या दिवसांत  रोज एक रताळं खाणं गरजेचं आहे. ज्यामुळे शरीराला व्हिटामीन्स, मिनरल्स यांसारखे पोषक तत्व मिळतात. (Winter Super foood Sweet potato Surprising Benefits Eat Daily One Get Many Benefits)

रताळ्यांमध्ये एंटीऑक्सिडेंट्स मोठ्या प्रमाणात असतात. त्वचा तरूण ठेवण्यासाठीही मदत होते. यामुळे त्वचेचं फ्रि रॅडीकल्सपासून होणारं नुकसान  टाळता येतं. अनेक गंभीर आजारांना दूर करण्यासाठी रताळे फायदेशीर ठरतात. तुम्ही रताळे उकळून किंवा भाजून खाऊ शकता. 

सद्गुरूंचा सल्ला, नियमित 'या' तांदूळाचा भात खा, तब्येतही सुधारेल आणि सतत येणारा थकवाही जाईल पळून

माय जुनिपर को. यु के च्या रिपोर्टनुसार रताळे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. वजन कमी करण्याच्या डाएटमध्ये तुम्ही रताळ्यांचा समावेश करू शकता. यात फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात. रताळे खाल्ल्यानं इम्यूनिटी मजबूत राहते. यातील व्हिटामीन सी, व्हिटामीन ई स्किनला हेल्दी ठेवते आणि कोलेजन उत्पादन वाढवण्यास फायदेशीर ठरते. बटाट्याच्या भाजी या प्रकारात समावेश होतो तर रताळे कंदमुळ असून बटाट्यांपेक्षा रताळ्यांचे सेवन कधीही हेल्दी ठरते.

रताळ्यांमध्ये व्हिटामीन ए चांगल्या प्रमाणात असते. यात बीटा कॅरोटीन असते ज्यामुळे स्ट्रेस कमी होतो  आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी रताळे फायदेशीर ठरतात.

सद्गुरूंचा सल्ला, नियमित 'या' तांदूळाचा भात खा, तब्येतही सुधारेल आणि सतत येणारा थकवाही जाईल पळून

रताळे चवीला हलके गोड असतात पण यात फायबर्स कंटेट जास्त असल्यामुळे  आणि लो ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळे डायबिटीसचे रुग्णही रताळे खाऊ शकता.  ज्यामुळे पचनक्रियाही चांगली राहते. रताळे तुम्ही उकडून  खाऊ शकता किंवा रताळ्याचा शिरा खाऊ  शकता. रताळ्यांचा आहारात समावेश केल्यास वजनही नियंत्रणात राहील.

टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य