Join us  

दिवाळीआधी वजन कमी करायचं? फिटनेस कोच सांगतात ७ सोप्या टिप्स; महिनाभरात दिसेल फरक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2024 5:39 PM

With less than three months to go, fitness coach shares eight tweaks to lose 10 kilos before Diwali : दिवाळीत फिट आणि यंग दिसायचं? मग आतापासून ७ गोष्टी फॉलो करा..

वेट लॉस करणं जणू एक टास्क बनलं आहे. लोक लग्न, किंवा सण जवळ आल्यावर व्यायाम आणि डाएटकडे लक्ष देतात (Weight Loss). वजन वाढण्यामागे अनेक कारणं आहेत (Fitness). बिघडलेली जीवनशैली, शारीरिक हालचाल नसणे, उलट सुलट पदार्थ खाणे, यामुळे वजन वाढत जातं (Diwali). वजनावर कण्ट्रोल ठेवणं अवघड होऊन जातं.

एक्सट्रा फॅट्समुळे गंभीर आजारांचा धोकाही वाढतो. आता काही महिन्यात दिवाळी हा सण येईल. दिवाळी हा सण येण्यापूर्वी लोकं वेट लॉस करण्याकडे लक्ष देतात. कारण या सणानिमित लोकांना आकर्षक कपड्यांमध्ये सुंदर दिसायचं असतं. जर आपल्याला दिवाळीच्या आधी वेट लॉस करायचं असेल तर, फिटनेस कोच चिराग बरजात्या यांनी सांगितलेल्या काही टिप्स फॉलो करून पाहा(With less than three months to go, fitness coach shares eight tweaks to lose 10 kilos before Diwali).

वेट लॉससाठी फॉलो करा ७ स्टेप्स

- वेट लॉस करायचं असेल तर, जंक फूड खाणं टाळा. सोबतच गोड पदार्थही खाणं टाळा. यामुळे शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढते. ज्यामुळे वेट लॉस होत नाही.

वजन वाढतं म्हणून चपाती बंद केली? कणकेत घाला ३ गोष्टी; वजन वाढणारच नाही; उलट..

- नाश्त्यापासून ते डिनरपर्यंत आहारात प्रोटीनचे प्रमाण वाढवा. प्रोटीनयुक्त पदार्थ खा. प्रोटीनमुळे स्किन, केस आणि वजन कमी करण्यास मदत होऊ शकते.

- नियमित ८ ते १० हजार पावलं चाला. वॉक केल्याने वेट लॉस करण्यास मदत होईल. शिवाय शरीर तंदुरुस्त राहील.

- उत्तम डाएट फॉलो करा. यासाठी आहारात सॅलॅड आणि भाज्यांचा समावेश करा. यामुळे शरीराला आवश्यक पौष्टीक घटक मिळतील.

- दररोज ३ ते ४ लिटर पाणी प्या. पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहील, आणि स्किन ग्लो करेल.

अक्षय कुमार उठल्यानंतर करतो १ 'खास' काम; पन्नाशीतही तंदुरुस्त राहायचं असेल तर..

- दररोज ७ ते ८ तासांची झोप घ्या. ४ नंतर चहा किंवा कॉफी पिऊ नका. कॅफिनयुक्त पेयांमुळे झोपेचं खोबरं होतं.

- नियमित वर्कआउटसाठी ३० मिनिटं काढा. घरातच विविध वर्कआउटचे प्रकार करा. हवं तर जिममध्येही आपण वर्कआउट करू शकता. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य