ब्रा च्या वापराबाबत प्रत्येक महिलेच्या डोक्यात वेगवेगळे विचार असतात. चार चौघात अशा प्रश्नांबाबत बोललं जात नाही. त्यामुळे अनेक गैरसमज लोकांच्या मनात असू शकतात. आज आम्ही तुम्हाला ब्रा च्या वापराबाबत काही फॅक्ट्स सांगणार आहोत. जेणेकरून गैरसमज दूर होण्यास मदत होईल. घट्ट ब्रा घालू नये त्यामुळे रक्तभिसारण व्यवस्थित होत नाही किंवा रात्रीच्यावेळी ब्रा घालून झोपू नये असं अनेकदा तुम्ही ऐकलं असेल. अशाच काही प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला आज देणार आहोत.
1) ब्रा न वापरल्यानं स्तनांचा आकार बदलतो?
तुम्ही नेहमीच ऐकत आला असाल तर ब्रा न वापरल्यास स्तनांचा आकार बिघडू शकतो किंवा स्तन लूज वाटू शकतात. पण एक मोठा गैरसमज आहे. याचे कोणतेही वैज्ञानिक प्रमाण नाही. वाढतं वजन, वय , अनुवांशिक पद्धतीनं होणारे बदल यांमुळे स्तन लूज, हलके वाटू शकता. ब्रा च्या वापराशी याचा काहीच संबंध नाही
2) रात्री झोपताना ब्रा घालू नये?
हे खरे आहे, रात्री ब्रा घालणे आरोग्यास बर्याच प्रकारे नुकसानकारक ठरू शकते. 2000 मध्ये, या विषयावर एक लहान संशोधन झालं. संशोधनात असे आढळून आले आहे की जर आपण रात्री ब्रा किंवा इतर फिटिंग किंवा घट्ट वस्तू परिधान करून झोपलो तर त्याचा झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळेवर परिणाम होतो. यामुळे स्लिप हॉर्मोन मेलिटोनिन ( झोपण्याची आणि उठण्याची सवय नियंत्रणात ठेवणारं हॉर्मोन) प्रभावित होतो. 10 महिलांवर 58 तास सुरू असलेल्या एका संशोधनातून समोर आलं की रात्रीच्यावेळी ब्रा घालणं शरीरासाठी योग्य ठरत नाही.
3) दिवसभर ब्रा घातल्यानंतर स्तनांचं नुकसान होऊ शकतं?
दिवसा ब्रा घालण्याने आरोग्यास हानी पोहचविण्याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. परंतु, चुकीच्या आकाराची ब्रा घातल्यास छातीच्या स्नायूंमध्ये त्रास होऊ शकतो. याशिवाय ब्राच्या पट्ट्या खांद्यांनाही जोडतात. 2003 मध्ये एक अभ्यास झाला होता. हा अभ्यास 102 महिलांवर करण्यात आला. यात सर्व महिलांनी चुकीच्या आकाराची ब्रा परिधान केली, ज्यामुळे त्यांच्या खांद्यावर ताण, ताणतणाव इत्यादी लक्षणे अधिकच बिघडू लागली. अशा परिस्थितीत त्यांना ब्रेस्ट रिडक्शन शस्त्रक्रिया करावी लागल्याचे दिसून आले.
4) ब्रा घातल्यानं कॅन्सरचा धोका कमी होतो?
अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या मते, स्तनाच्या कॅन्सरबाबत ब्रा घालण्याविषयी कोणतेही वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत. 2014 मध्ये एक अभ्यास करण्यात आला होता त्यानुसार 1513 महिला (पोस्टमेनोपॉझल) वर हा अभ्यास केला गेला, ज्याच्यात असे आढळले की ब्रा आणि स्तनाच्या कॅन्सरचा काहीच संबंध नाही.
5) व्यायामासाठी स्पोर्ट्स ब्रा गरजेची असते?
हे खरं आहे. 2019 मध्ये 29 महिलांवर एक अभ्यास करण्यात आला होता. महिलांनी सामान्य आणि चुकीच्या आकाराची ब्रा घातली होती. त्या अभ्यासानुसार, 17 टक्के स्त्रियांनी असे सांगितले की त्यांना व्यायामादरम्यान त्रास होत आहे. त्याच वेळी, 2015 मध्ये केलेल्या अभ्यासानुसार, ज्या स्त्रियांचे स्तन मोठे आहेत. त्यांनी स्पोर्ट्स ब्रा घालायला सुरूवात केल्यानंतर त्रास कमी होऊ लागला.
6) पाठदुखी ब्रा च्या वापरानं कमी होते?
ज्या स्त्रियांच्या स्तनांचे आकार मोठे आहेत त्यांना मान, पाठदुखी, डोकेदुखी, मज्जातंतू जळजळ होण्याची समस्या उद्भवू शकते. तथापि, नॉर्थवेस्टर्न यूनिवर्सिटी महिला आरोग्य संशोधन संस्थेच्या म्हणण्यानुसार मोठ्या स्तनांचा पाठदुखीशी संबंध नाही. पाठदुखी जास्त वजन, गर्भधारणा, ऑस्टिओपोरोसिस, चुकीच्या फिटिंगची ब्रा, अशक्तपणा यांमुळे उद्भवू शकते.