शाळा अजून सुरू झालेल्या नाहीत, त्यामुळे मुले अजूनही घरातच आहेत. कॉलनीत मित्रमैत्रिणी नसल्याने किंवा कमी असल्याने म्हणावे तसे मैदानी खेळ खेळले जात नाहीत. त्यामुळे मुलांच्या शारिरिक हालचाली होत नाहीत, म्हणावा तसा त्यांचा व्यायाम नाही... असं वाटत असेल आणि मुलांनी त्यांच्या तब्येतीसाठी खरंच काही तरी व्यायाम, वर्कआऊट करावं असं वाटत असेल, तर आता अभिनेत्री सोहा अली खान हिच्याप्रमाणे तुम्हीदेखील तुमचे वर्कआऊट (workout) प्लॅन करा.. मुलगी इयानासोबत वर्कआऊट करतानाचा सोहाचा व्हिडियो सध्या सोशल मिडियावर (social media) खूपच व्हायरल होत आहे. प्रत्येक पालकाने बघावा असा हा व्हिडियो आहे.
सैफ अली खानची बहिण सोहा अली खान तिच्या फिटनेसबाबत (fitness tips by Soha Ali Khan) अतिशय जागरूक आहे. वेगवेगळ्या प्रकारचे डाएट, नवनविन प्रकारचे वर्कआऊट हे तिच्या रूटीन एक्सरसाईजचे भाग. म्हणूनच तर काही दिवसांपुर्वी सोहाने स्टेअर वर्कआऊट या प्रकारचा एक व्हिडियो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. यामध्ये घरातल्या पायऱ्यांचा उपयोग वर्कआऊटसाठी कसा करायचा आणि पायऱ्यांवर कसे वर्कआऊट करायचे, हे सोहाने सांगितले होते. तिचा तो व्हिडियोदेखील सोशल मिडियावर चांगलाच गाजला होता.
आता सोहाने नुकताच आणखी एक व्हिडियो इन्स्टाग्रामवर (instagram) शेअर केला आहे. यामध्ये ती तिच्या मुलीसोबत वर्कआऊट करते आहे. हा व्हिडियो शेअर करताना तिने म्हटलं आहे की... Parenting can be all consuming but don’t let it come in the way of your workout. खरोखरंच आहे. पालकत्व ही एकप्रकारची भली मोठी प्रोसेस. ही प्रोसेस तुमच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी व्यापून टाकते. इतर काहीही व्यापलं तरी चालेल मात्र तुमच्या वर्कआऊटच्या प्रोसेसमध्ये ते कधीच येऊ नका.. असं सोहाला म्हणायचं आहे. ती ही नेमकं तेच करते.
या व्हिडियोमध्ये सोहा आणि मुलगी इयाना या एकत्रितपणे व्यायाम करत आहोत. Plank वर्कआऊट करताना जी पोझिशन होते, तशीच पोझिशन सोहाने घेतली आहे. तिच्यासमोर तिची मुलगी असून ती देखील याच पोझिशनमध्ये आहे. या पोझिशनमध्ये असताना एका हातावर तोल सावरायचा आणि दुसऱ्या हाताने एकमेकींना टाळ्या द्यायच्या अशा प्रकारचं अतिशय छान वर्कआऊट त्यादोघी करत आहेत. हे वर्कआऊट केल्यानंतर सोहाने तिच्या मुलीना तिच्या पाठीवर बसवलं आणि तिला पाठीवर घेऊनच तिने उठ- बस अशा प्रकारचं वर्कआऊट केलं. मुलं सारखी टिव्हीसमोर बसून आळशी झाली असतील, तर तुम्हीही त्यांना अशा पद्धतीने सोबत घ्या. स्वत:ही व्यायाम करा आणि मुलांनाही करायला लावा. व्यायाम करण्याच्या अशा नवनविन पद्धती शोधून काढल्या तर नक्कीच मुलंही (workout with kids) त्या एन्जॉय करतील.
Plank वर्कआऊट करण्याचे फायदे Benefits of plank workout- पाेटावरची चरबी कमी करण्यासाठी हे वर्कआऊट अतिशय उपयुक्त मानले जाते.- शरीर लवचिक होण्यासाठी प्लॅंक करावेत.- हात, पाठ आणि पायाचे स्नायू या वर्कआऊटमुळे मजबूत होतात. - एकाग्रता वाढविण्यासाठी Plank वर्कआऊट करावे.- खांद्याचं दुखणं, हॅमस्ट्रिंग यासाठीही हे वर्कआऊट फायद्याचं आहे.