Lokmat Sakhi >Fitness > बॉडी टोनिंगसाठी मलायका अरोरा घरच्याघरी करते तो व्यायाम पाहा; बघा जमतेय का ही पोझिशन?

बॉडी टोनिंगसाठी मलायका अरोरा घरच्याघरी करते तो व्यायाम पाहा; बघा जमतेय का ही पोझिशन?

Fitness tips: मलायका अरोरा आणि तिचं फिटनेस प्रेम खरोखरंच अद्भूत आहे.. आता हेच बघा ना बॉडी टोनिंग आणि मसल्स स्ट्राँग करण्यासाठी ती कशा प्रकारचा व्यायाम करते आहे ते..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2022 01:09 PM2022-02-03T13:09:48+5:302022-02-03T13:10:38+5:30

Fitness tips: मलायका अरोरा आणि तिचं फिटनेस प्रेम खरोखरंच अद्भूत आहे.. आता हेच बघा ना बॉडी टोनिंग आणि मसल्स स्ट्राँग करण्यासाठी ती कशा प्रकारचा व्यायाम करते आहे ते..

Workout for perfect body tonning and strong muscles, fitness challenge given by Malaika Arora | बॉडी टोनिंगसाठी मलायका अरोरा घरच्याघरी करते तो व्यायाम पाहा; बघा जमतेय का ही पोझिशन?

बॉडी टोनिंगसाठी मलायका अरोरा घरच्याघरी करते तो व्यायाम पाहा; बघा जमतेय का ही पोझिशन?

Highlightsहा व्यायाम जर परफेक्ट जमला तर खरोखरंच घरच्याघरी तुम्हाला मलायकासारखं स्लिम- ट्रिम होणं आणि उत्तम बाॅडी टोनिंग जमणं शक्य आहे.. 

मलायका अरोरा नेहमीच तिच्या फिटनेसबाबत चर्चेत असते.. तिचा फिटनेस टिकविण्यासाठी आणि तो आणखी वाढविण्यासाठी ती कायमच तिच्या फिटनेस ट्रेनरच्या मदतीने वेगवेगळे प्रयोग करते आणि सोशल मिडियावर त्याची जबरदस्त चर्चाही होत असते.. अशीच चर्चा सध्या सुरू आहे ती मलायकाच्या एका नव्या फिटनेस व्हिडिओची... या व्हिडिओमध्ये मलायकाने सांगितलेला व्यायाम हाताचे आणि पायाचे स्नायू बळकट करून बॉडी टोनिंगसाठी (tonned body) उपयुक्त ठरणारा आहे...

 

मलायका सोशल मिडियावर (social media) नेहमीच ॲक्टीव्ह असते... तिच्याकडून देण्यात येणाऱ्या फिटनेस टिप्सचीही तिच्या चाहत्यांना चांगलीच प्रतिक्षा असते... मलायकाकडून आज काय नविन शिकायला मिळणार हे जाणून घेण्यासाठी अनेक जण उत्सूक असतात.. तुम्हालाही मलायकाकडून बॉडी टोनिंग आणि स्ट्राँग मसल्ससाठी काही टिप्स पाहिजे असतील किंवा यासाठी कसा व्यायाम करावा, असा प्रश्न पडला असेल तर मलायकाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडिओ एकदा बघाच...

 

sarvesh_shashi या इन्स्टाग्राम पेजवर मलायकाचा व्यायाम करतानाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये मलायकाने दोन्ही हातांचे तळवे आणि पाय जमिनीवर टेकवले असून ती तिच्या शरीराची वर- खाली या पद्धतीने मुव्हमेंट करते आहे. ती हा जो व्यायाम करते आहे त्याला downward dog to upward dog flow असं म्हणतात, असं या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आलं आहे. 

 

हा व्यायाम वरवर आपल्याला दिसतो तेवढा सोपा आणि साधा मुळीच नाही. आपण अशा पद्धतीने एक- दोन जरी फ्लो करायला गेलो तरी जाम थकून जातो. त्यामुळेच तर योग अभ्यासक आणि डान्सर असणारे सर्वेश शशी हे सांगत आहेत की तुम्ही अशा पद्धतीने खूप काही नाही, फक्त २० फ्लो करण्याचं चॅलेंज घ्या.. त्यांनी दिलेलं हे ओपन चॅलेंज स्विकारण्यासाठी फिटनेस लेव्हल कमालीची वाढवणं गरजेचं आहे बरं का.. पण हा व्यायाम जर परफेक्ट जमला तर खरोखरंच घरच्याघरी तुम्हाला मलायकासारखं स्लिम- ट्रिम होणं आणि उत्तम बाॅडी टोनिंग जमणं शक्य आहे.. 

 

Web Title: Workout for perfect body tonning and strong muscles, fitness challenge given by Malaika Arora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.