शिल्पा शेट्टी सध्या सुट्टीवर गेली आहे, पण तरीही सुटीवर असतानाही ती तिच्या रेग्युलर वर्कआऊटमध्ये (yoga by Shilpa Shetty) मुळीच खंड पडू देत नाही. सध्या ती आणि तिची बहिण दोघीही लंडनमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहेत. पण शिल्पाचा सुट्ट्या एन्जॉय करण्याचा फंडाही अतिशय वेगळा असून वर्कआऊटने दिवसाची सुरुवात झाल्याशिवाय तिची सुट्टी छान एन्जॉय होत नाही. तिने नुकताच तिचा एक वर्कआऊट व्हिडिओ इन्स्टाग्रामला शेअर (instagram share) केला आहे. या व्हिडिओमध्ये शिल्पा तिची बहिण शमिता शेट्टीसोबत व्यायाम करताना दिसते आहे.(yoga for reducing belly fat)
शिल्पा आणि शमिता दोघी जणी जे आसन करत आहेत त्याचं नाव आहे गत्यात्मक उत्तानपादासन. core workout प्रकारातला हा व्यायाम असून शिल्पा तिच्या या व्यायामावर भलतीच खुश आहे.. वर वर बघता आपल्याला हा व्यायाम प्रकार अगदी साधा सोपा वाटू शकतो. पण ज्य पद्धतीने त्या दोघीही त्यांच्या बॉडी मुव्हमेंट्स करत आहेत किंवा पाय एका जागी स्थिर ठेवत आहेत, त्यावरून हा व्यायाम निश्चितच अवघड असल्याचे दिसून येते.
कसं करायचं गत्यात्मक उत्तानपादासन (Uttanpadasana)
शिल्पा शेट्टी जे आसन करते आहे ते करण्यासाठी जमिनीवर पाठीवर झोपा. यानंतर दोन्ही तळहात हिप्सच्या खाली ठेवा आणि गुडघ्यात न वाकवता दोन्ही पाय एक सोबतच जमिनीवरून वर उचला. दोन्ही पाय वर उचलल्यानंतर अगदी ताठ असावेत. आता काही सेकंद पाय तसेच वर ठेवल्यानंतर अलगद खाली आणा आणि जमिनीपासून एखादा फूट अंतरावर तसेच ठेवा. जमिनीला टेकू देऊ नका. पुन्हा काही सेकंद पाय या अवस्थेत ठेवल्यानंतर पुन्हा वर उचला. ही स्थिती ३ ते ४ वेळा रिपिट करा. पाय जमिनीवर न टेकवता पुन्हा त्याच पद्धतीने वर नेणे हे खरोखरंच कठीण असून नियमित सरावानेच जमण्यासारखे आहे.
उत्तानपादासन करण्याचे फायदे (benefits of Uttanpadasana)
- पोटावरची चरबी कमी होण्यासाठी मदत होते.
- हिप्स आणि मांड्यांवरची चरबी वाढली असेल तर हे आसन नियमित करावे.
- पेल्विक मसल्स मजबूत होण्यासाठी उपयुक्त
- लेग टोन्ड होण्यासाठी परफेक्ट आसन.
- प्रजनन संस्थेचे कार्य अधिक बळकट होते. त्यामुळे महिलांसाठी हे आसन विशेष उपयुक्त ठरते.
- गर्भाशयाच्या भिंतींची ताकद वाढविण्यासाठी फायदेशीर.
या लोकांनी उत्तानपादासन करू नये
- गर्भवती महिलांनी हे आसन अजिबात करू नये.
- तसेच मासिक पाळी सुरू असतानाही उत्तानपादासन करणे टाळावे.
- पाठदुखी, कंबरदुखी, स्लिप डिस्क किंवा सर्व्हायकल त्रास असणाऱ्यांनी हे आसन करू नये.