सोहा अली खान (Saif Ali Khan's sister Soha Ali Khan) सोशल मिडियावर चांगलीच ॲक्टीव्ह असते. बऱ्याचदा ती तिचे वर्कआऊट व्हिडिओही इन्स्टाग्रामवर शेअर करते. कधी तिचं पायऱ्यांवरचं वर्कआऊट असतं तर कधी योगासनं.. एक मात्र अगदी खरं की तिची वर्कआऊट (new way of exercise) स्टाईल इतरांपेक्षा एकदमच वेगळी असते. म्हणूनच तर तिचे वर्कआऊट व्हिडिओ नेहमीच तिच्या चाहत्यांकडून आवडीने बघितले जातात आणि त्यातून त्यांना व्यायामाचे वेगवेगळे फंडे कळत जातात. आता सध्या तिचा असाच एक ट्रेडमिल वर्कआऊट व्हिडिओ (treadmill workout video) गाजतो आहे.
सोहाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडिओ खरोखरंच अतिशय वेगळा आहे. ट्रेडमिल सुरू करायचं आणि त्याच्यावर आपापल्या स्पीडने वॉकिंग करायचं, अशा पद्धतीचा व्यायाम आपल्याला माहिती असतो. पण सोहा जो व्यायाम करते आहे, त्यासाठी तिने ट्रेडमिल सुरू केलेलंच नाही. सध्या पावसाळी वातावरण आहे. अशा वातावरणात बाहेर जाऊन व्यायाम करणं शक्य नसेल आणि घरी ट्रेडमिल असेल तर सोहा करतेय तसा व्यायाम तुम्ही करू शकता. किंवा लाईट गेले आणि ट्रेडमिल बंद झालं, तर तुमचा व्यायामाचा वेळ वाया न घालवता तुम्ही अशा पद्धतीने व्यायाम करू शकता.
ट्रेडमिलवर सोहाचा अनोखा व्यायाम
You don’t even need to turn your treadmill on to get a workout out of it! असं कॅप्शन तिने तिच्या या व्हिडिओला दिलं आहे. यामध्ये तिने ३ प्रकारचे व्यायाम केले असून यापैकी कोणत्याही व्यायामासाठी तिने ट्रेडमिल सुरू केलेलं नाही. ती जे व्यायाम करते आहे, ते तिन्ही व्यायाम बेली फॅट कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत.
फक्त १ मिनिटाचा व्यायाम, फुल बॉडी रिलॅक्स; बघा मलायका अरोराचा रिलॅक्सेशन फंडा
१. पहिल्या प्रकारच्या व्यायामात तिने तिचे दोन्ही तळहात ट्रेडमिलच्या बॉर्डरवर ठेवले आहेत. आणि दोन्ही पायांनी ती ट्रेडमिल मागे- मागे ओढते आहे. अशा पद्धतीच्या व्यायामामुळे तिच्या पायांचा व्यायाम तर होतोच आहे, पण हाताचे स्नायू बळकट होण्यासाठीही मदत होते आहे.
२. दुसऱ्या प्रकारच्या व्यायामात सोहाने ट्रेडमिलच्या शेवटच्या बाजूला दोन्ही तळहात ठेवले आहेत. तिचे शरीर आणि तिचे पाय दोन्ही ट्रेडमिलच्या खाली आहेत. पुशअप्स करताना जशी पोझिशन असते, तशीच तिची पोझिशन आहे. यावेळी ती दोन्ही हातांनी ट्रेडमिलचा वॉकिंग ट्रॅक पुढे आणि मागे ढकलत आहे. पोट कमी होण्यासाठी हा व्यायाम अतिशय उपयुक्त आहे.
मैने भी झाडू मारा.. भाग्यश्रीचा घर झाडतानाचा व्हायरल व्हिडिओ, ती म्हणते हा तर व्यायाम
३. तिसऱ्या प्रकारच्या व्यायामात सोहाने दोन्ही तळहात ट्रेडमिलच्या बाजूंवर ठेवले आहेत आणि पाठ, कंबर, पाय उचलून ती दोन्ही तळपायांनी ट्रेडमिलचा वॉकिंग ट्रॅक पुढे- पुढे सरकवत आहे.