Join us  

आलिया भटचा वर्कआउट ग्लो ! वाचा आलियाचे सुंदर ब्यूटी सिक्रेट..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 7:08 PM

स्वीट ॲण्ड सेक्सी अशी इमेज असणारी बॉलीवुड अभिनेत्री आलिया भट आणि तिचे फिटनेस प्रेम तर जगजाहीर आहे. आलियाने नुकताच तिचा एक फोटो चाहत्यांसोबत शेअर केला असून यामध्ये तिच्या चेहऱ्यावर आलेला ग्लो लक्ष वेधून घेणारा आहे. 

ठळक मुद्देआलियाच्या चाहत्यांसाठी ती जणू एक फिटनेस मोटिवेटर आहे. 

आपल्या फिटनेसबाबत आलिया भट अतिशय दक्ष आहे. डाएट आणि रूटीन वर्कआऊट यामध्ये आलिया जराही हलगर्जीपणा करत नाही. सध्या आलिया दोन- दोन बिगबजेट चित्रपटांच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. पण असे असले तरी ती तिचे वर्कआऊट मात्र कधीच मिस होऊ देत नाही. फक्त एवढेच नाही तर एक्सरसाईजचे वेगवेगळे प्रकारही ती आपल्या चाहत्यांसोबत नेहमीच शेअर करत असते. यामुळे आलियाच्या चाहत्यांसाठी ती जणू एक फिटनेस मोटिवेटर आहे. 

 

आलियाने नुकतेच तिचे दोन फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये तिने मिरर सेल्फी घेतला असून तिची वन साईडेड टोन बॉडी दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. या फोटोला तिने "Halfway there...#sohfit40daychallenge," असे फोटो कॅप्शनही दिले आहे. 

तर दुसऱ्या फोटोमध्ये वर्कआऊटमुळे तिच्या चेहऱ्यावर आलेला ग्लो दिसत आहे. तिचे फिटनेस ट्रेनर सोहराब यांनाही तिने या फोटोमध्ये टॅग केले आहे.आलियाचे हे ४० डेज चे चॅलेंज नेमके आहे तरी काय, असा प्रश्न आता तिच्या चाहत्यांना पडला आहे. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सआलिया भटबॉलिवूड