आजकाल लोकांना सायकल चालवायला फारसं आवडत नाही. त्यांना असे वाटते की कार आणि बाइकच्या युगात सायकल चालविण्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलेल. परंतु त्यांच्या आरोग्यासाठी सायकल चालविणे किती फायदेशीर आहे हे त्यांना ठाऊक नाही. विशेषत: जर आपण वजन कमी करण्याचा प्रयत्न करीत असाल आणि यासाठी जिमला जायचे नसेल तर सायकल चालविणे हा उत्तम व्यायाम आहे.
सायकल चालविणे ही केवळ मजेदार एक्टिव्हीटज नाही तर आपल्या स्नायूंना टोन करणं, हाडे मजबूत करणे आणि वजन कमी करणे यासाठी एक उत्तम व्यायाम आहे. आपले वजन कमी करण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला याबाबत काळजी घ्यावी लागेल. आज जागतिक सायकल दिनानिमित्त (World Bicycle Day 2021) वजन कमी करण्यासाठी सायकल चालविताना आपण कोणत्या 5 गोष्टी लक्षात घ्याव्यात याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
रोज सायकल चालवल्यानं मिळेल फायदा
वेटलॉससाठी लाँग राईड्स करणं उत्तम मार्ग ठरेल. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार पोटावरची चरबी कमी करण्यासाठी थोडं जास्तवेळ सायकल चालवल्यास उत्तम ठरेल. कमी गर्दी असलेल्या ठिकाणी राईडला जाण्याचा प्रयत्न करा. सायकलिंग रोज केल्यानं पोटावरची चरबी सहज कमी होण्यासाठी मदत होईल, रक्तदाब नियंत्रणात राहतो. याशिवाय ताणतणाव कमी करण्यासाठी सायकल चालवणं हा उत्तम पर्याय आहे.
पेडलिंग वेळेवर लक्ष द्या
आपण सायकल चालवून वजन कमी करण्याचा प्रयत्न करीत आहात. तर एकूण वेळेत किती पेडलिंग करतो हे खूप महत्वाचे आहे. वेळ ठरवताना आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की प्रत्येक व्यक्तीची चयापचय भिन्न आहे आणि कोणतीही दिनचर्या सुरू करण्यापूर्वी आपल्याला आपल्या शरीराची आवश्यकता समजून घ्यावी लागेल.
तुम्हाला हे लक्षात घ्याव लागेल की उर्जा वाचवण्यासाठी आणि राईडचा आनंद घेण्यासाठी वेगानं पेडलिंग करायला हवं. एक तास सायकल चालवून तुम्ही ५०० कॅलरीजपर्यंत बर्न करू शकता. त्यासाठी तुम्ही सातत्यानं सायलिंग करत राहायला हवं. जर तुम्ही चांगला आहार घेत असाल तर आठवड्यात ५०० ग्राम वजन सहज कमी करू शकता.
वेळ ठरवून घ्या
सरळ रस्त्यावर सायकल चालविणे आरामदायक वाटत असेल तर उतारावर सायकल चालविणे सुरू करा. आपल्याला चढवावर सायकल चालवण्यासाठी जोरदार प्रयत्न करावे लागतील. हे आपल्याला अधिक कॅलरी बर्न करण्यात मदत करेल आणि वजन कमी वेगाने कमी करेल. येथे नमूद केलेल्या सर्व गोष्टी काही किलो वजन कमी करण्यासाठी आश्यक आहेत.
या सर्व व्यतिरिक्त, निरोगी अन्न खा आणि सातत्याने व्यायामाचा सराव करा. सायकल चालवताना, आपले लक्ष केवळ वजन कमी करण्यावरच नाही, तर निरोगी आणि तंदुरुस्त जीवनशैलीवरही असायला हवे. कोरोना काळात व्यायामासाठी रस्त्यावर जायला आवडत नसेल तर तुम्ही इनडोअर सायकलिंग करू शकता.
इनडोअर सायकलिंगचे फायदे
१) अशा सायकल्स विकत घेण्याची गरज नसते. आजकाल अनेक जिममध्ये अशा सायकली असतात. तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही सायकल तुम्ही चालवू शकता.
२) कोणत्याही वयोगटातील कोणीही ही सायकल चालवू शकता. हळूहळू सुरुवात करून त्याचा वेळ आणि तीव्रताही आपण वाढवू शकतो.
३) कोरोनामुळे रस्त्यावर चालवण्याच्या सायकलींना तरी काही प्रमाणात मर्यादा पडतात, पण या सायकलिंगला नाही. त्यामुळे तुम्ही आरामात घरच्याघरी सायकल्स चालवू शकता.
४) कोणत्याही काळात तुम्ही सहजपणे ती चालवू शकता. उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळ्यातही. घरात अशी सायकल असल्यास सगळेच सदस्य या सायकलच्या वापरानं आरोग्य चांगलं ठेवू शकतात.