वजन कमी करणं कठीण काम आहे पण लठ्ठपणानं त्रस्त असलेल्यांना लोकांना वजन कमी करण्याची नितांत गरज असते. अनेकजण प्रयत्न करूनही त्यांना हवंतसं यश मिळत नाही म्हणून ते हार मानतात. एक्सपर्ट्सच्यामते वजन कमी करण्याची योग्य पद्धत माहीत असेल तर तुम्ही कायम फिट राहू शकता. वजन कमी करण्याचे अनेक उपाय आहेत त्यापैकीच एक म्हणजे पाणी कसं प्यायचं ते सुद्धा माहीत असायला हवं. खाण्याआधी पाणी प्यायला हवं (Right Way To Drink Water)
जगातील प्रसिद्ध न्युट्रिशनिस्ट एलन एरागॉन यांनी वजन कमी करण्यासाठी जेवणाआधी २ ग्लास पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे. या पद्धतीनं वजन कमी करण्यास खरंच फायदा होतो का ते समजून घेऊया. (World Famous Nutritionist Told Drink 2 Glass Water Before Every Meal For Weight Lost Fast And Healthy)
आरएसीजीपीच्या रिपोर्टनुसार जेवणाआधी पाणी प्यायल्यानं वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. पाण्यात कॅलरीज जास्त नसतात. ज्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं. जर तुम्हाला जास्त जेवण्याची सवय असेल तर या पद्धतीचा अवलंब केल्यास तुम्ही जेवताना जास्त प्रमाणात खाणं टाळता. अभ्यासात दिसून आलं की जे लोक जेवणाच्या आधी जवळपास ५०० मिली पाणी प्यायले होते त्यांचे वजन जेवणाच्या आधी पाणी न पिणाऱ्यांच्या तुलनेत १२ आठवड्यात कमी झाले होते.
कोणत्या पद्धतीनं पाणी प्यायल्यास वजन कमी होते
मॉडल हेल्थ शो पॉडकास्टवर एलन यांनी सांगितले की जेवणाच्या आधी पाणी प्यायल्यानं पोट भरलेलं राहतं आणि वजन कमी करण्यास मदत होते. पण हा उपाय खरंच असरदार आहे का ते पाहायला हवं. एलन एरागॉन सांगतात की जेवणाआधी २ ग्लास पाणी प्यायल्यानं भूक कमी लागते आणि कॅलरीचे प्रमाणही कमी होते.
एलन यांनी सांगितले की, हीवॉटर ट्रिक काय आहे ते माहीत करून घ्यायला हवं. जेवणाच्या आधी तुम्ही साधं पाणी पिऊ शकता. पाणी प्यायल्यानंतर तुमचं पोट भरलेलं राहील आणि तुम्ही कमी खाल. खासकरून रात्रीचं जेवण करताना आणि बाहेर जाताना हा उपाय फायदेशीर ठरेल.
जेवणाच्या आधी २ ग्लास पाणी प्यायल्यानं कॅलरीज कमी होण्यास मदत होते. भारतीय आहारातज्ज्ञ आणि पोषणतज्ज्ञ शिखा अग्रवाल यांच्यामते वजन कमी करण्यासाठी जेवणाआधी पाणी पिण्याची पद्धत लोकप्रिय झाली आहे. जेवणाआधी पाणी प्यायल्यानं पोट भरलेलं राहतं. ज्यामुळे कॅलरीज कमी होतात.