जागतिक तंबाखू दिन 31 मे रोजी दरवर्षी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश म्हणजे लोकांना तंबाखूच्या सेवनाच्या हानीबद्दल जागरूक करणे. तंबाखूच्या सेवनाने फुफ्फुसांमध्ये निकोटीन जमा होते आणि हळूहळू शरीरात विषासारखे कार्य करते हे सर्वांनाच ठाऊक आहे. फुफ्फुसांचं केवळ यामुळे नुकसान होत नाही, तसेच श्वास आणि घश्याशी संबंधित अनेक आजारांचे कारण देखील आहे.
धूम्रपान करण्याची सवय खूप वाईट आहे. परंतु जर आपण धूम्रपान सोडण्याचा दृढनिश्चय केला असेल तर सर्वात प्रथम फुफ्फुसात साठवलेल्या निकोटीनला दूर करणे आवश्यक आहे. आज तंबाखू दिनाच्या दिवशी नाही, आम्ही तुम्हाला काही सोपे उपाय सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही फुफ्फुसात साठलेलं निकोटिन बाहेर काढून स्वच्छ फुफ्फुसं मिळवू शकता.
स्मोकिंगमुळे फुफ्फुसांवर कसा परिणाम होतो?
प्रथम फुफ्फुस कसे कार्य करतात याबद्दल बोलूया. जेव्हा आपण श्वास घेता तेव्हा हवा आपल्या वायुमार्गामध्ये प्रवेश करते, जी दोन वायुमार्गांमध्ये विभागली जाते, ज्याला ब्रोंची म्हणतात. हे ब्रॉन्ची लहान वायुमार्गामध्ये विभागल्या जातात, ज्याला ब्रॉन्चिओल्स म्हणतात. हे आपल्या फुफ्फुसातील सर्वात लहान वायुमार्ग आहेत. प्रत्येक ब्रोन्चिओल्सच्या शेवटच्या भागात अल्व्हिओली नावाची एक लहान हवा असलेली थैली असते. आता जेव्हा आपण धूम्रपान करता तेव्हा आपल्यामध्ये सुमारे 600 संयुगे अनेक हजार रसायनांमध्ये मोडल्या जाऊ शकतात. यातील काही कॅन्सरच्या प्रसारासाठी कारणीभूत ठरतात.
सिगारेटचा धूर आपल्या शरीरावर कसा परिणाम करतो?
हृदय- धूम्रपान केल्याने रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे शरीरातील इतर भागात ऑक्सिजनचा संचार कमी होतो. अशा परिस्थितीत हृदयाला योग्य प्रकारे कार्य करणे कठीण आहे.
मेंदू - शरीरात निकोटीनच्या उपस्थितीमुळे आपल्याला थकवा जाणवतो. ज्यामुळे आपले लक्ष विचलित होऊ शकते.
श्वसन प्रणालीवर परिणाम- धूम्रपानाच्या व्यसनाने आपल्या फुफ्फुसात जळजळ होऊ शकते. ज्यामुळे आपल्याला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
प्रजनन क्षमतेवर परिणाम- कालांतराने धूम्रपान अति प्रमाणात केल्याने वंध्यत्व आणि लैंगिक इच्छा कमी होऊ शकतात.
फुफ्फुसातून निकोटीन स्वच्छ करण्याचे सोपे मार्ग
व्यायाम करा
ज्यांनी हळू हळू धूम्रपान सोडले आहे त्यांनी व्यायाम केला पाहिजे. हे श्वासोच्छवासाची प्रणाली मजबूत करते आणि फुफ्फुसातील निकोटीन बाहेर काढण्यास मदत करते.
डेअरी प्रॉडक्टसपासून लांब रहा
वर्षानुवर्षे धूम्रपान केल्यामुळे फुफ्फुसांमध्ये निकोटीन साचत जातं. म्हणून सर्व प्रथम दुधाच्या उत्पादनांपासून स्वतःला लांब ठेवा फुफ्फुसात साचलेल्या निकोटिनपासून वेगानं मुक्तता मिळवता येऊ शकते.
एंटी इंफ्लेमेटरी खाद्यपदार्थांचे सेवन
धूम्रपान करणार्यांच्या फुफ्फुसात सूज येते, ज्यामुळे श्वास घेणे कठीण होते. एका अभ्यासात असे सिद्ध झाले आहे की ब्लूबेरी, चेरी, पालक, बदाम आणि ऑलिव्ह यासारख्या एंटी इन्फेमेटरी गुणधर्मयुक्त असलेले पदार्थ खाल्ल्यानं शरीराची जळजळ कमी होते. याव्यतिरिक्त ग्रीन टी प्यायल्यानं देखील फुफ्फुसातील निकोटीन दूर करण्यास मदत होते.
फुफ्फुसांसाठी व्यायाम प्रकार
ब्रीदिंग- ही एक्सरसाइज करण्यासाठी तुम्हाला श्वासावर फोकस करावा लागतो, ज्यामुळे मेंदू शांत आणि रिलॅक्स होतो. ही एक्सरसाइज करण्यासाठी ४ सेंकदापर्यंत श्वास घ्या, जेणेकरून फुफ्फुसं ऑक्सिजनने भरले जातील. त्यानंतर पुढच्या ४ सेकंदात श्वास सोडा. ही एक्सरसाइज रो ५ मिनिटे करा.
योगाभ्यास - फुफ्फुसांना मजबूत करण्यासाठी योगाभ्यासही फार फायदेशीर ठरतो. योगाभ्यास करताना जेव्हा तुम्ही मोठा श्वास घेता तेव्हा याने रक्तप्रवाह चांगला होतो. ज्यामुळे फुफ्फुसामध्ये ऑक्सिजन जास्त राहतं. फुफ्फुसांसोबतच डायफ्रामसाठीही योगाभ्यास चांगला असतो.
स्वीमिंग - पाण्यात श्वास रोखून ठेवल्याने तुमच्या फुफ्फुसांची क्षमता वाढते. त्यासोबत पाणी श्वसन मांसपेशींवर दबाव टाकून त्यांना मजबूत करतं. स्वीमिंग फुफ्फुसांसाठी एक फायदेशीर एक्सरसाइज आहे.
कार्डिओ - रनिंगसारखी सोपी एक्सरसाइजही फुफ्फुसांसाठी फायद्याची ठरते. कारण आपल्या शरीराला एक्सरसाइज करताना ऑक्सिजनची गरज असते. त्यामुळे आपल्या फुफ्फुसांना अधिक काम करावं लागतं. शारीरिक हालचाल नसे तर याने फुफ्फुसांचं नुकसान होतं. त्यामुळे जॉगिंग, जुम्बासारखे वर्कआउट करत राहिलं पाहिजे.
वॉटर स्प्लॅश - चेहऱ्यावर पाणी टाकल्याने फुफ्फुसाची क्षमता वाढते. याने आपले हार्ट रेट कमी करून मोठा श्वास घेणे सहजपणे शक्य होतं. त्यामुळे ब्रीदिंग एक्सरसाइज करण्याआधी चेहऱ्यावर थंड पाणी नक्की टाका.