Lokmat Sakhi >Fitness > दूध न पिता कॅल्शियम कसं मिळेल? दुप्पट कॅल्शियम असलेले ८ पदार्थ खा-२०६ हाडं होतील मजबूत

दूध न पिता कॅल्शियम कसं मिळेल? दुप्पट कॅल्शियम असलेले ८ पदार्थ खा-२०६ हाडं होतील मजबूत

World Osteoporosis Day : काहीजणांना दुधाची एलर्जी असते त्यामुळे ते दुधाचे पदार्थ खाण्याचाही कंटाळा करतात. हाडांच्या विकासासाठी विटामीन्स आणि मिनरल्सची आवश्यकता असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 11:47 AM2023-10-20T11:47:02+5:302023-10-20T12:07:28+5:30

World Osteoporosis Day : काहीजणांना दुधाची एलर्जी असते त्यामुळे ते दुधाचे पदार्थ खाण्याचाही कंटाळा करतात. हाडांच्या विकासासाठी विटामीन्स आणि मिनरल्सची आवश्यकता असते.

World Osteoporosis Day : Foods that gives you strong bones more than milk high in calcium foods | दूध न पिता कॅल्शियम कसं मिळेल? दुप्पट कॅल्शियम असलेले ८ पदार्थ खा-२०६ हाडं होतील मजबूत

दूध न पिता कॅल्शियम कसं मिळेल? दुप्पट कॅल्शियम असलेले ८ पदार्थ खा-२०६ हाडं होतील मजबूत

ऑस्टिओपोरेसिस (Osteoporosis) हा हाडांच्या आजाराचा सगळ्यात गंभीर प्रकार मानला जातो. हाडांमध्ये कॅल्शियम कमी झाल्यामुळे हाडं कमकुत होतात. या आजारांमुळे फॅक्चरचा धोकाही असते. यापासून बचाव करण्यासाठी दरवर्षी २० ऑक्टोबरला वर्ल्ड ऑस्टिओपोरोसिस दिवस साजरा केला जातो. (World Osteoporosis Day 2023) हाडं मजबूत ठेवण्यासाठी दूध, पनीर यांसारखे डेअरी प्रोडक्ट्स खायला हवेत. पण काहीजणांना दुधाची एलर्जी असते त्यामुळे ते दुधाचे पदार्थ खाण्याचाही कंटाळा करतात. हाडांच्या विकासासाठी विटामीन्स आणि मिनरल्सची आवश्यकता असते. (Foods that gives you strong bones more than milk high in calcium foods) दुधाव्यतिरिक्त कोणत्या पदार्थांतून तुम्ही कॅल्शियम मिळवू शकता पाहूया.

बदाम

बदाम खाल्ल्याने ऑस्टिओपेरेसिसचा धोका टळतो. यात व्हिटामीन ई,  मॅग्नेशियम आणि कॅल्शियम असते. USDA च्या रिपोर्टनुसार १०० ग्राम बदामात  २६९ कॅल्शियम असते जे दुधापेक्षा दुप्पट असते. 

हेजलनट

हाडांना जोडण्यासाठी हेजलनट्स उपयोगी ठरतात.  हेजलनट्स खाल्ल्याने सेल्स  डॅमेज होण्याची शक्यता कमी असते. याशिवाय कोलेस्टेरॉलही कमी होते. १०० ग्राम हेजलनट्समध्ये जवळपास  ११४ mg कॅल्शियम असते. 

पिस्ता

पिस्ता ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी करतो. यात कॅल्शियम व्यतिरिक्त कॉपर, मॅग्नेशियम, फॉस्फरेससुद्धा असते. हाडांच्या मजबूतीसाठी या पोषक तत्वांची  आवश्यकता असते. 

अक्रोड

मेंदूव्यतिरिक्त हार्ट आणि हाडांसाठी अक्रोड फायदेशीर ठरते.  यात अनेक पोषक  तत्व असतात जी संपूर्ण शरीराला मजबूत बनवतात. याशिवाय तुम्ही  अंजीर, खजूर,  मनुके, काजू सुद्धा खाऊ शकता. यामुळे हाडांच्या आजारांचा धोका टळतो. जर तुमचे बोन फॅक्चर झालं असेल तर तुम्ही लवकर रिकव्हर होण्यासाठी अक्रोडचे सेवन करू शकता. 

काबुली चणे

२ कप काबुली चण्यांमध्ये  ४२० मिलीग्राम कॅल्शियम असते. काबुली चण्यांचा वापर  तुम्ही गेव्ही, मसाल्यात करू शकता किंवा सॅलेडच्या स्वरूपातही खाऊ शकता. शिजवलेले चण्यांमध्ये चिरलेला कांदा, टोमॅटो घालून तुम्ही खाऊ शकता. 

पोट सुटत चाललंय, व्यायामासाठी वेळच नसतो? रोज इतका वेळ चाला-आपोआप कमी होईल फॅट

तीळ

४ टेबलस्पून तीळाच्या बीयांमध्ये ३५० मिलीग्राम कॅल्शियम असते. सॅलेड किंवा इतर पदार्थांमध्ये तुम्ही तिळाच्या बीया घालू शकता. पराठ्यात किंवा भाकरीत  तीळ घालू शकता. 

नाचणी

नाचणीत भरपूर कॅल्शियम असते.  १०० ग्राम नाचणीत  ३४५ मिलीग्राम कॅल्शियम असते. नाचणी तुम्ही आठवड्यातून  ४ वेळा खाऊ शकता. नाचणीचा आहारात समावेश कराताना तुम्ही चपाती, चिला, पॅनकेक्स किंवा लाडूच्या  स्वरूपात नाचणी खा.

४९ व्या वर्षी सुपरफिट दिसणाऱ्या मलायकाचं ब्युटी सिक्रेट; ३ योगासन करा-पन्नाशीत विशीतले दिसा

दही

 १ कप दह्यात जवळपास ३०० ते  ३५०  मिलीग्राम कॅल्शियम असते. रोजच्या नाश्त्याला किंवा दुपारच्या जेवणात तुम्ही दह्याचा समावेश करू शकता. दह्याची कोशिंबीर खाणं हा सुद्धा एक उत्तम ऑपश्न आहे.

Web Title: World Osteoporosis Day : Foods that gives you strong bones more than milk high in calcium foods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.