आज जागतिक वीगन दिन म्हणजेच शाकाहारी दिवस. सर्वत्र १ नोव्हेंबर रोजी जागतिक वीगन दिन साजरा करण्यात येतो. जगभरातील नागरिकांनी शाकाहारी जीवन जगावे ही मुख्य गोष्ट सर्वत्र पसरवण्यासाठी आणि या दिवसाचे महत्व पटवून देण्यासाठी या दिवसाची सुरुवात करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून जगभरातील अनेक देशांनी शाकाहारी आहाराला स्वीकारले आहे. भारतातील नागरिकांसह अनेक कलाकारांनी देखील वीगन व्हायचे ठरवले. शाकाहारी पदार्थांचे महत्व आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक वीगन दिनाची स्थापना झाली. या दिवसाची सुरुवात कुठून आणि कशी झाली, या दिवसाचे महत्व काय, आज आपण यासंदर्भात जाणून घेऊयात.
जागतिक वीगन दिनाची सुरुवात
जागतिक वीगन दिन हा दिवस यूके व्हेगन सोसायटीने 1 नोव्हेंबर 1994 रोजी सुरू केला होता. तो दिवस व्हेगन सोसायटीचा 50 वा वर्धापन दिन देखील होता, व्हेगन सोसायटीच्या अध्यक्षांनी दरवर्षी वीगन डे हा संस्मरणीय बनवण्यासाठी आणि लोकांमध्ये शाकाहारी आहाराला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली. असे म्हटले जाते की याआधी शाकाहारी लोकांना दुग्धजन्य पदार्थ खाण्याची परवानगी नव्हती. लोकांनी अंडी खाणे बंद केले होते पण त्यानंतर विरोध शांत करण्यासाठी 1 नोव्हेंबरपासून 'शाकाहार दिन' सुरू करण्यात आला.
शाकाहारी असण्याचे फायदे
वीगन डाएटमध्ये जास्त फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि पोषक तत्वांचा समावेश असतो ज्यामुळे शरीराला फायदा होतो. या आहारात पोटॅशियम, मॅग्नेशियम, फोलेट, व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन-ईचे प्रमाण खूप जास्त असते. या सर्व गोष्टी आरोग्यासाठी खूप महत्त्वाच्या असल्याचं सांगितलं जातं आणि त्यांचं नियमित सेवन केल्याने भयंकर आजार दूर होतात.
वजन आणि अतिरिक्त कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत
शाकाहारी पदार्थांचे सेवन केल्याने वजन झपाट्याने कमी होऊ शकते. शाकाहारी अन्न वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त असते. दररोज संतुलित प्रमाणात फळे, भाज्या, संपूर्ण धान्य इत्यादींचे सेवन केल्याने, आपले वजन आणि अतिरिक्त चरबी घटू शकते.
डायबिटिस कंट्रोलमध्ये
शाकाहारी आहार घेतल्याने मधुमेह हा नियंत्रित राहतो. शाकाहारी जेवणात भाज्या, फळे आणि धान्ये जास्त प्रमाणात वापरली जातात, ज्यात फायबर भरपूर असते आणि त्यामध्ये असलेली नैसर्गिक साखर रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
हृदय निरोगी ठेवण्यासाठी
विगन फूड हृदयासाठी खूप किफायतशीर आहे. फळे आणि भाज्यांचे नियमित सेवन केल्याने वाईट कोलेस्ट्रॉल दूर होण्यास मदत होते. यासोबतच गुठळ्या होण्यापासून बचाव करण्यासही हे उपयुक्त आहे. हृदयासोबतच स्ट्रोकचा धोकाही कमी होतो. बीपी वाढणे किंवा कमी होणे ही आजकाल जीवनशैलीशी संबंधित समस्या बनली आहे. ही समस्या खूप वेगाने पसरत असल्याचे दिसते. उच्च रक्तातील साखरेसोबतच शाकाहारी आहारामुळे बीपीशी संबंधित समस्याही दूर होते.
पचनक्रिया संबंधित समस्या होईल दूर
अनेकांना पचनाच्यानिगडीत अनेक समस्या उद्भवतात, मात्र, शाकाहारी आहाराला जर स्वीकारले तर नक्कीच याचा फायदा होईल. शाकाहारी अन्न तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. शाकाहारी अन्नामध्ये भरपूर फायबर असते, ज्यामुळे पचनाशी संबंधित समस्या कमी होतात.