Lokmat Sakhi >Fitness > घरच्याच कामातून व्यायाम होतो, मग योगा कशाला ? मैत्रिणींनो, असे अनेक योगाविषयीचे गैरसमज दूर करा...

घरच्याच कामातून व्यायाम होतो, मग योगा कशाला ? मैत्रिणींनो, असे अनेक योगाविषयीचे गैरसमज दूर करा...

"काय करावे बाई, घरीच एवढे काम असते की त्यातूनच आमचा मस्तपैकी व्यायाम होऊन जातो. मग कशाला पुन्हा योगाचा वेगळा क्लास लावायचा " अशा आशयाची चर्चा महिलांमध्ये नेहमीच रंगलेली दिसते. कामातूनच व्यायाम होतो, असे म्हणत अनेकजणी योगा करणे टाळतात. पण हा चुकीचा समज असून महिलांनी योगाविषयी असलेले असे अनेक गैरसमज त्यांच्या डोक्यातून काढून टाकण्याची गरज आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 03:34 PM2021-06-21T15:34:08+5:302021-06-21T15:47:43+5:30

"काय करावे बाई, घरीच एवढे काम असते की त्यातूनच आमचा मस्तपैकी व्यायाम होऊन जातो. मग कशाला पुन्हा योगाचा वेगळा क्लास लावायचा " अशा आशयाची चर्चा महिलांमध्ये नेहमीच रंगलेली दिसते. कामातूनच व्यायाम होतो, असे म्हणत अनेकजणी योगा करणे टाळतात. पण हा चुकीचा समज असून महिलांनी योगाविषयी असलेले असे अनेक गैरसमज त्यांच्या डोक्यातून काढून टाकण्याची गरज आहे.

World yoga day 2021 : Misconceptions and misunderstandings about yoga in the minds of women | घरच्याच कामातून व्यायाम होतो, मग योगा कशाला ? मैत्रिणींनो, असे अनेक योगाविषयीचे गैरसमज दूर करा...

घरच्याच कामातून व्यायाम होतो, मग योगा कशाला ? मैत्रिणींनो, असे अनेक योगाविषयीचे गैरसमज दूर करा...

Highlightsमहिलांनी अमूक आसन केले तर त्रास होईल, तमूक व्यायाम केला तर चुकीचे ठरेल, असे त्यांना वारंवार सांगितले जाते. पण असे कोणतेही गैरसमज मनात न ठेवता महिलांनी घराबाहेर पडून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास करावा.प्रत्येक वयोगटातील महिलांना योगाभ्यासाची गरज आहे. योगा करणे सोडून दिले तर वजन खूप पटापट वाढते, असा महिलांमध्ये असणारा समज अत्यंत चुकीचा आहे.

घरातली कामे करून दमून जाणे आणि वर्कआऊट किंवा योगा करून रिलॅक्स होणे, यातील फरक आजही बहुतांश महिलांना समजतच नाही. धुणे, भांडी करणे, फरशी पुसणे किंवा झाडू मारणे हे उत्तम व्यायाम  प्रकार आहेत. त्यामुळे ही कामे नित्यनेमाने केली तर तुम्हाला कोणत्याच व्यायामाची गरज पडत नाही, असे वारंवार आपल्या घरातल्या वयस्कर महिलांकडून आपण ऐकलेले असते आणि तेच कुठेतरी आपल्या  डोक्यात अगदी घट्ट रूतून बसते. असे समजणे तर चुकीचे आहेेच, पण त्यासोबतच योगाविषयी महिलांच्या  मनात असलेले इतर अनेक समजही किती चुकीचे आहेत, हे औरंगाबाद येथील योगतज्ज्ञ डॉ. चारूलता रोजेकर यांनी महिलांना समजून सांगितले आहे.

 

योगाविषयी महिलांच्या मनात असलेले गैरसमज
१. काम केल्याने आपोआपच योगा होतो
काम हाच योगाभ्यास हा समज अत्यंत चुकीचा आहे. घरातील कामे करून तुमचे शरीर थकते. त्यातून तुमचा कोणताही व्यायाम होत नाही. घरकाम करणे हे 'एर्क्झशन' आहे. त्यातून 'एक्सरसाईज' अजिबातच होत नाही. त्यामुळे काम करणे वेगळे आणि योगा करणे वेगळे.

२. पाळी सुरू असताना योगा करू नये
पाळीविषयी तर महिलांच्या डोक्यात कायमच वेगवेगळे गैरसमज असतात. पाळी सुरू असताना अमूक गोष्ट करू नये, तमूक गोष्ट टाळावी, अशा सुचनांचा आपल्यावर कायमच भडीमार होत असतो. याच सुचनांमधून निर्माण झालेला एक गैरसमज म्हणजे पाळी सुरू असताना योगा करू नये. याविषयी सांगताना डॉ. चारूलता रोजेकर म्हणाल्या की, पाळीत हलके- फुलके व्यायाम, योगासन करण्यास काहीही हरकत नाही. जास्त ब्लड फ्लो सुरू असेल, तर मात्र मासिक पाळीच्या काळात योगा करणे टाळावे. 

 

३. गरोदरपणात योगा नको गं बाई....
हा महिलांच्या डोक्यात असलेला सगळ्यात मोठा गैरसमज. गर्भावस्थेत आपण स्वत:ला जपलेच पाहिजे. पण म्हणून शरीराला काहीच व्यायाम न होऊ देणे, हे देखील अगदीच अयोग्य आहे. गर्भसंस्कार केंद्रात गर्भवतींना विशेष योगाभ्यास शिकविला जातो. अनेकदा नॉर्मल डिलीव्हरी होण्यासाठी गर्भसंस्कार वर्गात घेतली गेलेली आसने व श्वसन प्रकारच उपयुक्त ठरले, असे अनेक महिलांचे म्हणणे आहे. गर्भावस्थेत योगाभ्यास केला तर गर्भाशयाचे मुख बंद होत नाही, हा देखील गैरसमज महिलांच्या डोक्यात असतो. पण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य व्यायाम केला, तर अशी कोणतीही समस्या निर्माण होत नाही. 

 

४. महिलांनी सुर्यनमस्कार घालू नये
सुर्यनमस्कार घालणे हे पुरूषांचेच काम, अशी अनेक महिलांची धारणा असते. पुरूषप्रधान संस्कृतीतून हे महिलांच्या मनात रूजविण्यात आले आहे. आजही अनेक महिलांचा यावर विश्वास आहे. पण सुर्यनमस्कार हा एक उत्तम व्यायाम असून तो ज्याप्रकारे पुरूषांसाठी फायदेशीर आहे, तसाच महिलांसाठीही आहे. त्यामुळे महिलांनी न बिचकता सुर्यनमस्कार घालावेेत.

५. गायत्री मंत्र म्हणू नये
गायत्री मंत्र महिलांनी म्हटले तर त्याचा त्यांच्या शरीरावर विपरित परिणाम होतो, असा एक गैरसमज आहे. तो महिलांनी आधी डोक्यातून काढून टाकावा. कोणत्याही मंत्रोच्चाराने मनाला शांती मिळते, मन एकाग्र करण्यास मदत होते. त्यामुळे योगाभ्यास करताना जर ध्यान करण्याआधी गायत्री मंत्र म्हणायला सांगितला तर महिलांनी अजिबातच टाळाटाळ करू नये.
 

Web Title: World yoga day 2021 : Misconceptions and misunderstandings about yoga in the minds of women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.