Year Ender 2024 : रोज साधारण अर्धा तास कोणत्याही प्रकारची एक्सरसाईज केल्याने अनेक जीवघेण्या आजारांचा धोका ३० टक्क्यांपर्यंत कमी केला जाऊ शकतो, असा दावा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने केला आहे. म्हणजे याकडे असं बघता येईल की, रोज स्वत:साठी अर्धा तास देऊन तुम्ही हॉस्पिटलमधील उपचारांचे पैसे वाचवू शकता. नवीन वर्ष २०२५ येणार आहे. सरत्या वर्षात अनेक फिटनेस ट्रेन्ड चर्चेत राहिले. सोशल मीडियावर या फिटनेस ट्रेन्डची आजही चर्चा होते. अशात आज जाणून घेऊ की, २०२४ मध्ये कोणते फिटनेस ट्रेन्ड सगळ्यात जास्त चर्चेत राहिले आणि व्हायरल झालेत.
१० हजार पावलं
२०२४ मध्ये सगळ्यात जास्त चर्चा १० हजार पावलं पायी चालण्याची राहिली. फिट राहण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी ही एक्सरसाईज फॉलो करण्याचा अधिक प्रयत्न केला गेला. अनेक डॉक्टर्स आणि एक्सपर्ट्सनी सुद्धा फिट राहण्यासाठी हा सोपा आणि चांगला पर्याय सांगितलं आहे.
हाय इन्टेसिटी इंटरवल एक्सरसाईज
२०२४ मध्ये हाय इन्टेसिटी इंटरवल एक्सरसाईजही सोशल मीडियावर चर्चेत राहिली. ४० वयानंतर महिलांना आपल्या मसल्स मजूबत आणि हाडं मजबूत करण्यासाठी ही एक्सरसाईज करण्याचा सल्ला दिला गेला. आठवड्यातून २ ते ३ वेळा ही एक्सरसाईज करून स्वत:ळा फिट बनवू शकता.
प्लॅंक चॅलेंज
सोशल मीडियावर यावर्षीय प्लॅंक एक्सरसाईजही खूप ट्रेन्ड झाली. या एक्सरसाईजच्या माध्यमातून वजन कमी करण्याचा खासकरू बेली फॅट कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. २० सेकंदापासून ते ५ मिनिटांपर्यंत प्लॅंक चॅलेंज करण्याचा प्रयत्न लोकांनी केला.
स्क्वाट चॅलेंज
प्लॅंक चॅलेंजसोबतच स्क्वाट चॅलेंजही खूप ट्रेन्ड झाला. बॉडी टोन करण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी सुरू झालेलं हे चॅलेंजही चर्चेत राहिलं. याद्वारे लोअर बॉडी टोन करण्याचा आणि मसल्स मजबूत करण्याचा प्रयत्न केला गेला.
वॉल पिलाटेज
भिंतीच्या मदतीने उभं राहून बेली फॅट कमी करण्यासोबतच कंबरेची साइज कमी करण्यासाठी ही एक्सरसाईज सोशल मीडियावर चर्चेत राहिली.