Lokmat Sakhi >Fitness > पचन उत्तम होण्यासाठी रात्रीच्या जेवणानंतर करा ४ आसनं, पोटही होईल नीट साफ, तब्येतही सुधारेल

पचन उत्तम होण्यासाठी रात्रीच्या जेवणानंतर करा ४ आसनं, पोटही होईल नीट साफ, तब्येतही सुधारेल

Yoga Asanas for Digestion Problem : जेवण झाल्यावर काही सोपी आसने केल्यास अन्न पचण्यास तर मदत होतेच पण सकाळी उठल्यावर पोट साफ होण्यासही याचा चांगला उपयोग होतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2022 12:08 PM2022-11-28T12:08:11+5:302022-11-28T12:38:42+5:30

Yoga Asanas for Digestion Problem : जेवण झाल्यावर काही सोपी आसने केल्यास अन्न पचण्यास तर मदत होतेच पण सकाळी उठल्यावर पोट साफ होण्यासही याचा चांगला उपयोग होतो.

Yoga Asanas for Digestion Problem : Do 4 asanas after dinner to digest the food eaten, help to clear the stomach | पचन उत्तम होण्यासाठी रात्रीच्या जेवणानंतर करा ४ आसनं, पोटही होईल नीट साफ, तब्येतही सुधारेल

पचन उत्तम होण्यासाठी रात्रीच्या जेवणानंतर करा ४ आसनं, पोटही होईल नीट साफ, तब्येतही सुधारेल

Highlightsअन्नाचे योग्य रितीने पचन होण्यासाठी शरीराची हालचाल होणेही आवश्यक असते. काही सोपी आसने केल्यास जड झालेला कोठा मोकळा होण्यास निश्चित मदत होते.

थंडीच्या दिवसांत आपल्याला चांगली भूक लागते. त्यामुळे आपण भरपूर खातोही. मात्र थंडीमध्ये पाणी कमी प्यायल्यामुळे आपलं पोट साफ होतंच असं नाही. थंडीत अनेकांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. पोट नीट साफ झाले नाही की आपल्याला दिवसभर अस्वस्थ वाटत राहते. पोट साफ होण्यासाठी पाण्याची तर आवश्यकता असतेच पण त्यासोबतच शरीराची पुरेशी हालचाल होणेही आवश्यक असते. त्यासाठी जेवण झाल्यावर काही सोपी आसने केल्यास अन्न पचण्यास तर मदत होतेच पण सकाळी उठल्यावर पोट साफ होण्यासही याचा चांगला उपयोग होतो. आता रात्रीच्या वेळी तेही जेवण झाल्यावर कशी काय आसनं करायची असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. तर ही आसने अतिशय सोपी असल्याने ती जेवल्यानंतरही आपण सहज करु शकतो. ही आसनं कोणती पाहूयात (Yoga Asanas for Digestion Problem)...

(Image : Google)
(Image : Google)

१. सुप्तबद्ध कोनासन (Supta Baddha Konasan)

पाठीवर झोपून दोन्ही पाय आपल्या मांडीजवळ आणायचे आणि पायांचा नमस्कार घालायचा. यावेळी हात जमिनीवर रिलॅक्स ठेवायचे. पायाचा नमस्कार घातल्यावर आपल्या मांड्यांचा आणि पायाचा सगळा भाग जमिनीला चिकटलेला असायला हवा. या अवस्थेत किमान १ मिनीटे राहून श्वासावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करायचा.

२. वज्रासन (Vajrasan)

हे दिसायला अतिशय सोपे आसन असले तरी अनेकांसाठी या आसनात बसणे काहीसे अवघड असते. पाय गुडघ्यात दुमडून घ्यावेत आणि त्यावर बसावे. यामध्ये आपले सीट टाचांवर ठेवून आपल्याला रिलॅक्स बसता यायला हवे. यामुळे पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. त्यामुळे हे आसन जेवणानंतर आवर्जून करायला हवे. 

(Image : Google)
(Image : Google)

३. बालासन (Balasan)

वज्रासनात बसायचे. त्यानंतर डोके जमिनीवर टेकवून हात जमिनीवर पसरुन घ्यायचे. सीट टाचांना टेकलेले ठेवून शरीर पुढच्या बाजूला ताणायचा प्रयत्न करायचा. या अवस्थेत १० ते १५ सेकंद राहण्याचा प्रयत्न करायचा आणि दिवसातून किमान ४ ते ५ वेळा हे आसन न चुकता करायचे. 

४. गोमुखासन (Gomukhasan)

एक मांडी गुडघ्यात वाकवून त्यावर दुसरी मांडी ठेवायची. एक हात खालच्या बाजुने मागे घेऊन दुसरा हात वरच्या बाजुने पाठीवर घ्यायचा. दोन्ही हात पाठीच्या मागे एकमेकांत लॉक करायचे. पाठ ताठ राहील याची काळजी घ्यायची आणि जास्तीत जास्त वेळ या आसनात राहण्याचा प्रयत्न करायचा.    

Web Title: Yoga Asanas for Digestion Problem : Do 4 asanas after dinner to digest the food eaten, help to clear the stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.