Join us  

बसून - बसून कंबरेचा भाग वाढलाय? २ सोपी योगासने, मलायका अरोराही सांगते त्यांचे फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2023 3:02 PM

Yoga asanas for toned abs: Malaika Arora’s trainer shares tips कंबरेचा भाग खूपच वाढलाय, व्यायाम करण्यासाठी वेळ नाही, २ योगासना करा, कंबर होईल सुडौल

शरीराला फिट व आजारांपासून बचाव करायचा असेल तर, व्यायाम करणे गरजेचं आहे. काही लोकं व्यायाम शाळेत जाऊन व्यायाम करतात. तर, काही  लोकं योगाचे धडे गिरवतात. योग केल्याने शरीर व मनाची स्थिती संतुलित राहते. व शरीराची लवचिकता वाढते. यासह वजन देखील कमी होते. सध्या बैठी शैलीचे जीवन सुरु आहे.

तासंतास काम करून पाठदुखी, कंबरदुखीची समस्या वाढते. यासह कंबरेचा भाग वाढतो. ८ तासांची ड्युटी झाल्यानंतर आपल्या शरीरात थकवा येतो. आपली देखील कंबरेची साईज वाढली असेल तर, चक्की चालनासन हा योग करून पाहा. मध्यंतरी फिटनेस फ्रिक मलायका अरोरा हिने आसन करतानाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर केला होता. हा योग करण्यास खूप सोपे आहे.  योगा ट्रेनर सविता यादव हिने कंबरेचा भाग कमी करण्यासाठी, कोणते योग फायदेशीर ठरतील याबाबतीत माहिती दिली आहे(Yoga asanas for toned abs: Malaika Arora’s trainer shares tips).

चक्की चालनासन

चक्की चालनासन योग हे नाव संस्कृतमधून आले आहे. ज्यात "चक्की" म्हणजे "दळणे", आणि "चलना" म्हणजे ''चालवणे". हे आसन करताना आपण गिरणी चालवत असल्याचा भास होतो. हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम, योगामॅटवर बसा, त्यानंतर दोन्ही पाय पुढे करून एकमेकांपासून लांब पसरवा.

३० मिनिटांत करा ४ सोपे व्यायाम, परफेक्ट फिगरचं स्वप्न होईल पूर्ण- कॅलरी बर्न झटपट

दोन्ही हातांची बोटे गुंफून हात जोडावेत. त्यानंतर श्वास घ्या, व शरीराचा वरचा भाग पुढे आणा आणि  हात पायांच्या मागे घेऊन सरळ करा. म्हणजे पाय झाकून हाताने मोठे वर्तुळ बनवावे लागेल. पुढे जाताना श्वास घ्या आणि परत येताना श्वास सोडा. घड्याळाच्या दिशेने १० वेळा आणि घड्याळाच्या उलट दिशेने १० वेळा करा.

बटरफ्लाय आसन

बटरफ्लाय आसन केल्याने पायांची लवचिकता वाढते. दिवसभर बसून काम केल्याने कंबर आणि पाठ दोन्ही गोष्टी दुखायला लागतात. या समस्येपासून आराम हवं असेल तर, बटरफ्लाय आसन करून पाहा. हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम, जमिनीवर चटई टाकून बसा. यानंतर, गुडघे वाकवून पाय टाचांच्या जवळ आणा.

कंबर - नितंबावरील चरबी वाढली? ३ सोपी योगासने नियमित, बेढब शरीर होईल सुडौल

आता दोन्ही पायांचे तळवे एकत्र ठेवा. दोन्ही पाय हातांनी घट्ट पकडून शेवटी फुलपाखराच्या पंखाप्रमाणे मांड्या वर करून खाली करा. या स्थितीत काही मिनिटे ही प्रक्रिया पुन्हा करत रहा. 

टॅग्स :मलायका अरोराव्यायामफिटनेस टिप्स