Lokmat Sakhi >Fitness > ऑफिसमधून दमून आल्यावर, सायंकाळी अंगात त्राण नसतात? थकवा फार? 'हा' उपाय करा, ५ मिनिटांत रिफ्रेश...

ऑफिसमधून दमून आल्यावर, सायंकाळी अंगात त्राण नसतात? थकवा फार? 'हा' उपाय करा, ५ मिनिटांत रिफ्रेश...

yoga asans to reduce fatigue after coming from office : Tired & Overwhelmed At Work? Try These Yoga Poses To Deal With Burnout : Tired & Stressed Out After Work? Here Are 2 Yoga Poses To Relax : मिनिटांत दिवसभराचा थकवा होईल नाहीसा करा 'ही' २ योगासनं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2025 14:48 IST2025-02-19T14:35:38+5:302025-02-19T14:48:21+5:30

yoga asans to reduce fatigue after coming from office : Tired & Overwhelmed At Work? Try These Yoga Poses To Deal With Burnout : Tired & Stressed Out After Work? Here Are 2 Yoga Poses To Relax : मिनिटांत दिवसभराचा थकवा होईल नाहीसा करा 'ही' २ योगासनं...

yoga asans to reduce fatigue after coming from office Tired & Stressed Out After Work Here Are 2 Yoga Poses To Relax | ऑफिसमधून दमून आल्यावर, सायंकाळी अंगात त्राण नसतात? थकवा फार? 'हा' उपाय करा, ५ मिनिटांत रिफ्रेश...

ऑफिसमधून दमून आल्यावर, सायंकाळी अंगात त्राण नसतात? थकवा फार? 'हा' उपाय करा, ५ मिनिटांत रिफ्रेश...

वर्किंग वुमन असणाऱ्या महिलांना घर आणि ऑफिस असं दोन्ही सांभाळावं लागतंच. घर आणि ऑफिस अशा दोन्ही जबाबदाऱ्या एकाच वेळी सांभाळताना तारेवरची कसरत होते. दिवसभर ऑफिसमध्ये काम (yoga asans to reduce fatigue after coming from office) करून संध्याकाळी घरी आल्यावर फारच थकवा येतो. दिवसभर ऑफिसमधील काम, ऑफिस ते घर असा प्रवास अशा इतर अनेक गोष्टी करताना दमछाक होणे सहाजिकच आहे. ऑफिसमध्ये ९ तास एकाच (Tired & Overwhelmed At Work? Try These Yoga Poses To Deal With Burnout) जागी बसून काम केल्याने फक्त मानसिकच नाही तर शारीरिक थकवाही येतो. स्क्रीन टाइम, कामाचा ताण आणि घाई - गडबड यामुळे  संध्याकाळी घरी पोहोचताच आपल्याला थकवा जाणवू लागतो(Tired & Stressed Out After Work? Here Are 2 Yoga Poses To Relax).

दिवसभराचा हा थकवा घालवून पुन्हा एकदा रिफ्रेश व्हावे आणि पुढच्या कामांना सुरुवात करावे असे वाटते. परंतु शारीरिक आणि मानसिक थकव्यामुळे आपल्याला काहीच सुचेनासे होते, शरीरातील एनर्जी लेव्हल इतकी डाऊन होऊन जाते की काहीच न करता अंथरुणात शिरुन झोपावेसे वाटते. अशावेळी आपल्याला पटकन एनर्जी देणारी २ सोपी योगासन आपण नक्कीच घरच्याघरीच करु शकता. ऑफिसमधून आल्यावर फक्त १० ते १५ मिनिटे काढून आपण शांत चित्ताने ही सोपी २ योगासनं करु शकता. जर का ही दोन योगासन केली तर अगदी काहीच मिनिटांत दिवसभराचा थकवा नाहीसा होऊन तुम्ही पुन्हा रिफ्रेश होऊ शकता. एवढंच नव्हे तर तुमच्या शरीराला ऊर्जा मिळून तुम्ही पुन्हा परत पुढची काम करण्यासाठी झटपट तयार होऊ शकता. 

कोणती दोन योगासनं करावीत ? 

१. बालासन :- दिवसभर ऑफिसमध्ये एकाच जागी बसून मांड्या, पोटऱ्या यांच्यावर ताण येऊन तेथील स्नायूं आखडून राहतात. अशावेळी बालासन केल्याने स्नायूं आणि नसा मोकळ्या होतात. याचबरोबर, मांड्या, पोटऱ्यांवरील अतिरिक्त चरबी कमी होण्यासाठी देखील हे आसन उपयुक्त ठरेल. या आसनामुळे पाठ दुखी, शरीर आखडणं या समस्यांवरही आराम मिळतो. बालासन करण्यासाठी सगळ्यात आधी वज्रासनाची अवस्था घेऊन योगा मॅट किंवा सतरंजीवर बसा.त्यानंतर पायाचे तळवे एकमेकांना जोडण्याचा प्रयत्न करा.गुडघे शक्य होतील तेवढे एकमेकांपासून दूर करा. आता कंबरेतून खाली वाका आणि दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये तुमचे पोट, छाती असेल, अशा पद्धतीने शरीराची अवस्था घ्या. डोके खाली जमिनीवर टेकवा आणि हात समोरच्या बाजूने सरळ रेषेत पसरवा. 

फक्त १० मिनिटं आणि ४ योगासनं, चाळीशीतही सहज राहाल फिट-दिसाल सुंदर...

२. शवासन :- दिवसभर ऑफिसमध्ये काम करुन स्ट्रेस येतो. अशावेळी स्ट्रेस कमी करण्यासाठी आपण शवासन करु शकता.    शवासन करण्यासाठी जमिनीवर सतरंजी अंथरावी. सतरंजीवर सरळ झोपावं. सर्व अवयवावरील ताण काढून टाकावा. दोन्ही हात छताच्या दिशेने जमिनीला टेकलेले आणि पाय दोन्ही बाजूंनी कललेले असावेत. मान एका बाजूला कललेली असावी. डोळे मिटलेले असावे. एक दीर्घ श्वास घेऊन नंतर अगदी मंद श्वसन सुरु ठेवावं. एक 5-10 मिनिटं याच अवस्थेत पडून राहावं. शवासन केल्यानं शरीराप्रमाणे मनावरचा ताणही निघून जातो. मन शांत होतं. मन आणि शरीर शांत झाल्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा फ्रेश व्हाल. 

'छावा' साठी विकी कौशलने केलं प्रोटीन रिच डाएट, पाहा त्यानं नेमकं काय काय खाल्लं...

ऑफिसमधून आल्यावर फक्त १० ते १५ मिनिटांचा वेळ काढून बालासन आणि शवासन केल्यास दिवसभराचा थकवा दूर होऊन तुम्ही पुन्हा एकदा रिफ्रेश होऊ शकता.

Web Title: yoga asans to reduce fatigue after coming from office Tired & Stressed Out After Work Here Are 2 Yoga Poses To Relax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.