कंबरेच्या लटकणाऱ्या चरबीमुळे आपण अनेकदा हवेतसे ड्रेस घालू शकत नाही. शरीरातील एक्स्ट्रा फॅट्स वाढले की मांड्या, दंड, पोट, ओटी पोटावर दिसून लागते. (Fat Loss Tips) अशावेळी लूज कपडे घालण्याशिवाय काही पर्याय नसतो. घरच्याघरी तुम्ही कंबरेची लटकणारं फॅट कमी करू शकता. या सोप्या उपायामुळे फक्त १५ दिवसात तुम्हाला फरक जाणवले. (10 Minute Yoga Asana to reduce back fat)
एक्सपर्ट्सच्यामते कंबरेच्या आजूबाजूला लटकणाऱ्या चरबीमुळे फक्त तुमची पर्सनॅलिटी खराब होत नाही तर डायबिटीस, हृदयाचे आजार, लठ्ठपणा अशा आजारांचा धोका वाढतो. जास्त वजनामुळे सुस्ती येणं, शरीर जड होणं, पायाला सूज येणं असे त्रास उद्भवतात. यामुळे रोजच्या एक्टिव्हीजसुद्धा मंदावतात. पुरूष असो किंवा स्त्री सुडौल, सुंदर शरीरामुळे आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. (Yoga asnans to reduce side waist fat)
अधोमूख श्वानासन
हे आसन करण्यासाठी सगळ्यात आधी हात आणि पायांवर जोर देऊन उभं राहा. २ ते ३ मिनिटं या स्थितीत राहून पुन्हा सामान्य स्थितीत या.
उर्ध्वमुख श्वानासन
आधी पोटावर झोपा. त्यानंतर पोटाच्या बाजूला हात ठेवून हातांवर जोर देऊन थोडं वर या. कमरेपासूनचा भाग वर उचला. आणि बॅक आर्च ठेवा. काही सेकंद या आसनात राहिल्यानंतर पुन्हा पोटोवर झोपा.
मार्जरी आसन
गुडघ्यांवर बसा. आपले तळवे खांद्याच्या रेषेत सरळ ठेवा आणि गुडघे आपल्या नितंबांच्या खाली ठेवा. पाठीचा कणा वक्र करा. १ ते २ मिनिटं या स्थितीत राहिल्यानंतर पुन्हा समान व्यायाम ५ ते ६ वेळा तुम्ही हा व्यायाम करू शकता. हळूहळू व्यायामाचे प्रमाण वाढवा.
ओटी पोट लटकतंय, फिगर पूर्ण बिघडली? रोज सकाळी ४ गोष्टी करा, आपोआप स्लिम-फिट दिसाल
ताडासन
सरळ ताठ उभे राहा. पोट आतल्या बाजूने घ्या आणि खांदे खाली ठेवा. पायांचे मसल्स एक्टिव्ह ठेवून ५ ते ८ वेळा श्वासस घ्या आणि हळूहळू सोडा. न वाकता शरीराच्या वजनावर दोन्ही पायांच्या बोटांनी बॅलेन्स करा.
अंगकाठी बारीक पण दंड जाड-थुलथुलीत दिसतात? १० मिनिटं करा हा व्यायाम-हात दिसतील सुंदर
अर्ध पद्मासन
सुखासनाने या व्यायामाची सुरूवात करा. डावा पाय उजव्या मांडीवर ठेवा. गुडघ्यांचा जमिनीला स्पर्श व्हायला हवा. पाठ सरळ करून हातांची मुद्रा फोटोत दाखवल्याप्रमाणे ठेवा. काहीवेळ याच आसनात राहिल्यानंतर पुन्हा हे आसन करा.