Lokmat Sakhi >Fitness > उन्हाळ्यात डिहायड्रेशनचा त्रास होतो? योगतज्ज्ञ सांगतात ३ सोपे उपाय, लाही लाही होईल कमी...

उन्हाळ्यात डिहायड्रेशनचा त्रास होतो? योगतज्ज्ञ सांगतात ३ सोपे उपाय, लाही लाही होईल कमी...

Yoga Poses & Tips To Beat The Heat & Boost Energy Levels : उन्हाचा चटका वाढला की अनेकजण हैराण होतात, उष्णता सहन होत नाही त्यासाठी हे ३ सोपे आणि असरदार उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2023 09:04 PM2023-04-13T21:04:30+5:302023-04-13T21:24:14+5:30

Yoga Poses & Tips To Beat The Heat & Boost Energy Levels : उन्हाचा चटका वाढला की अनेकजण हैराण होतात, उष्णता सहन होत नाही त्यासाठी हे ३ सोपे आणि असरदार उपाय

Yoga experts on lifestyle tips, poses to prevent dehydration, heat illnesses in summer | उन्हाळ्यात डिहायड्रेशनचा त्रास होतो? योगतज्ज्ञ सांगतात ३ सोपे उपाय, लाही लाही होईल कमी...

उन्हाळ्यात डिहायड्रेशनचा त्रास होतो? योगतज्ज्ञ सांगतात ३ सोपे उपाय, लाही लाही होईल कमी...

उन्हाळा म्हटलं की बऱ्याचजणांना डिहायड्रेशनच्या समस्येला बहुतेकदा सामोरे जावे लागते. शरीरांतील पाण्याची पातळी कमी झाल्याने शरीरावर गंभीर परिणाम उद्भवू शकतात. या काळात शरीराला पुरेसे पाणी मिळणे खूप गरजेचे असते. आपल्या शरीराला मुबलक पाण्याची गरज असते. उन्हाळ्यात घामाद्वारे शरीरातील पाणी, क्षार आणि मिनरल्स शरीराबाहेर फेकले जातात. ज्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी सतत कमी जास्त होत असते. शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसांत मुबलक पाणी पिणं आवश्यक असते. 

शक्यतो आपण दिवसभरात प्यायलेल्या पाण्याच्या प्रमाणापेक्षा शरीरातून अधिक पाणी गमावणे या स्थितीला शरीरातील पाणी कमी होणे किंवा 'डिहायड्रेशन' असे म्हणतात. शरीरातून पाणी गमावणे ही सामान्य प्रक्रिया आहे; परंतु हे प्रमाण वाढले, तर 'डिहायड्रेशन'चा त्रास होतो. प्रत्येक ऋतूमध्ये स्वतःची अशी अनोखी आव्हाने असतात आणि उन्हाळ्यात उष्णतेचा सामना करणे आणि जास्तीत जास्त शारीरिक ऊर्जा पातळी राखणे हे एक कठीण कामच आहे, असे म्हणावे लागेल. यंदाच्या उन्हाळ्यात तुमच्यावर अशी वेळ येऊ नये यासाठी काही पथ्ये पाळली आणि काळजी घेतली तर उन्हाळा सुखकर होऊ शकतो. जागतिक योगा तज्ज्ञ मानसी गुलाटी यांनी उन्हाळ्यांत 'डिहायड्रेशन'चा त्रास होऊ नये म्हणून काही खास टिप्स दिल्या आहेत त्या लक्षात ठेवू(Yoga Poses & Tips To Beat The Heat & Boost Energy Levels).

नेमकं काय करावं ? 

१. Water Balloon Pose (वॉटर बलून पोझ) :- वॉटर बलून पोज करताना आपल्या तोंडात हवा भरुन दोन्ही गाल फुगवून घ्यावेत. त्यानंतर ही हवा १० सेकंदांसाठी तोंडात भरुन ठेवावी. त्यानंतर आपल्या हातांनी गालांवर हळुहळु दाब देऊन हवा बाहेर सोडावी. हा व्यायाम दिवसातून ३ वेळा करावा. असे केल्याने तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण वाढण्यास मदत होते, चेहऱ्याचे स्नायू मजबूत होतात व त्वचा आणि शरीर दोन्ही हायड्रेट राहते.

ऑफिसमध्ये एकाच जागी बसून पाठ व कंबर आखडली ? मलायका सांगते झटपट सोपा उपाय...

२. Water Air Puff Pose (वॉटर एअर पफ पोझ) :- वॉटर एअर पफ पोज करताना तोंडात मावेल इतके पाणी भरुन घ्यावे. आता हे पाणी उजव्या गालातून डावीकडे तर डाव्या गालातून उजवीकडे न्यावे. असे ५ वेळा रिपीट करत रहावे. हा योग प्रकार केल्याने तोंडातील स्किन स्वच्छ राहते व एकूणच तोंडातील आरोग्य सुधारते. तसेच डिहायड्रेशनच्या आजाराचा धोका संभवत नाही. 

३. Pawanmuktasana (पवनमुक्तासन) : -फरशीवर पोटाच्या आधारे शवासन (Shavasana) सारखी स्थिती करुन आरामात झोपा. डावा गुडघा वाकवा आणि जेवढे शक्य होईल तितके त्याला पोटाजवळ नेण्याचा प्रयत्न करा. आता श्वास सोडताना तुमच्या दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंतवा आणि गुडघ्यांच्या खाली ठेवा आणि त्यांच्या सहाय्याने तुमच्या डाव्या गुडघ्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर तुमचे डोके जमिनीवरुन वरच्या बाजूला घ्या आणि गुडघ्यापर्यंत नाकाने स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. डोके वर उचलून आणि नाकाने गुडघ्यांना स्पर्श करुन १० ते ३० सेकंद याच स्थितीमध्ये रहा आणि हळूहळू श्वास सोडा. आता हीच पूर्ण प्रक्रिया उजव्या पायाने करा आणि ३ ते ५ वेळा हे आसन पुन्हा करा. पवनमुक्तासन बद्धकोष्ठता आणि अपचनासाठी आदर्श योगासन मानले जाते, तसेच पचनसंस्था सुधारण्यासाठी हे योगासन प्रभावी ठरते. 

दुपारी जेवल्यानंतर छोटीशी डुलकी काढण्याचे ५ फायदे, फिटनेस एक्सपर्ट सांगतात छोट्या झोपेची जादू...

इतर काही महत्वाच्या टिप्स :- 

१. पाण्याची बाटली कायम सोबत ठेवा :- उन्हाळ्याच्या दिवसांत आपल्या शरीराला व अवयवांना चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी तसेच शरीराला पुरेसे सक्रिय ठेवण्यासाठी पाणी सर्वात महत्वाचे आहे. डिहायड्रेशनमुळे अशक्तपणा येऊ शकतो, प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते आणि इतर अनेक प्रतिकूल मार्गांनी तुमच्यावर परिणाम होऊ शकतो. तुम्ही दिवसभर पुरेसे पाणी पीत आहात याची सवय स्वतःला लावून घ्यावी. यासाठी उन्हाळ्यात घराबाहेर पडताना  तुमच्यासोबत पाण्याची बाटली नेहमी ठेवावी. 

२. फळांच्या रसाचे सेवन करा :- शरीराला हायड्रेट ठेवण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे फळांच्या रसांचे सेवन करत रहाणे. पॅकेजिंग केलेल्या रसांपेक्षा ताज्या फळांचा रस पिणे सर्वोत्तम असते. फळांमध्ये अत्यावश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर असतात आणि ताजे तयार केलेले फळांचे रस शरीरासाठी चांगले असतात. फळांची निवड करताना हंगामी फळे निवडा जसे की टरबूज, कलिंगड किंवा अगदी साधे लिंबाचे पाणी देखील शरीराची तहान भरून काढू शकते आणि थकवा दूर ठेवू शकते.

Web Title: Yoga experts on lifestyle tips, poses to prevent dehydration, heat illnesses in summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.