बऱ्याच जणींच्या बाबतीत असं होतं की शरीर व्यवस्थित प्रमाणात असतं. पण गळ्यावर किंवा हनुवटीच्या खालच्या भागातली चरबी वाढलेली असते. यामुळे असं होतं की त्या व्यक्ती जाड नसूनही जाड वाटतात. कारण त्यांचा चेहरा खूप गुबगुबीत, फुगलेला दिसतो. अशा व्यक्ती फुगीर चेहऱ्यामुळे फोटोतही चांगल्या लठ्ठ वाटतात. असं तुमच्या बाबतीत होत असेल तर गळ्यावरची चरबी कमी करून जॉ लाईन अगदी परफेक्ट दिसावी यासाठी हे काही साधे- सोपे व्यायाम करून पाहा (3 best jawline exercise in 5 minutes). त्यामुळे हनुवटीखालची चरबी झरझर उतरेल. (yoga for getting perfect jawline)
हनुवटीखालची, गळ्यावरची चरबी कमी करण्यासाठी उपाय
गळ्यावरची किंवा हनुवटीखालची चरबी कमी करण्यासाठी आपल्याला मानेचे काही व्यायाम करावे लागतील. हे व्यायाम अगदी ४ ते ५ मिनिटांत होतील. शिवाय तुम्ही ते बसल्या बसल्या कुठेही करू शकता. अगदी टीव्ही पाहात, गाणी ऐकत किंवा ऑफिसमध्ये मिळालेल्या रिकाम्या वेळेत केले तरी चालतील.
१. सगळ्यात आधी तर मान वर आणि खाली अशा पद्धतीने खाली वर करा. असं प्रत्येकी ५- ५ वेळा करा.
२. यानंतर एकदा उजव्या बाजुला तर नंतर डाव्या बाजुला या पद्धतीने मान हलवा. असं करताना मान शक्य तेवढी वळविण्याच प्रयत्न करावा. हा व्यायामही प्रत्येकी ५- ५ वेळा करा.
कस्टमाईज मंगळसूत्र पेंडंटचा भन्नाट ट्रेण्ड, सांगा तुम्हाला कोणतं आवडलं?
३. वरील दोन्ही व्यायाम झाल्यानंतर मान एकदा उजव्या बाजुकडून तर नंतर डाव्या बाजुकडून गोलाकार फिरवा. दोन्ही बाजुंनी प्रत्येकी ५- ५ वेळा मान गोलाकार फिरवावी. हे सगळे मानेचे व्यायाम अतिशय सावकाश करावे. यामुळे हनुवटीखालची, गळ्यावरची चरबी कमी होण्यास निश्चितच मदत होईल.
परफेक्ट जॉ लाईन मिळविण्यासाठी योगासनं
हनुवटीखालची किंवा गळ्यावरची चरबी कमी होऊन परफेक्ट जॉ लाईन मिळावी यासाठी काही योगासनं करणंही फायदेशीर ठरतं.
अंडरआर्म्सच्या काळेपणामुळे स्लिव्हलेस घालायला नको वाटतं? १ खास उपाय, काखेतला काळेपणा कायमचा जाईल
भुजंगासन, गोमुखासन, उष्ट्रासन, चक्रासन यासोबतच सुर्यनमस्कार नियमितपणे केल्यास गळ्यावरची, हनुवटीखालची चरबी कमी होण्यास मदत होते.