Lokmat Sakhi >Fitness > सततच्या कंबरदुखीने वैतागलात? सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अनुष्का परवानीने सांगितलेले ३ व्यायाम करा, रहा फिट

सततच्या कंबरदुखीने वैतागलात? सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अनुष्का परवानीने सांगितलेले ३ व्यायाम करा, रहा फिट

Fitness Tips for Reducing Back Pain and sciatica: कंबरदुखी, सायटिका या आजारांवर ही काही योगासनं नक्कीच उपयोगी ठरणारी आहेत. अनुष्का परवानीने सांगितलेले हे व्यायाम एकदा करून बघा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2022 08:13 AM2022-11-09T08:13:44+5:302022-11-09T08:15:01+5:30

Fitness Tips for Reducing Back Pain and sciatica: कंबरदुखी, सायटिका या आजारांवर ही काही योगासनं नक्कीच उपयोगी ठरणारी आहेत. अनुष्का परवानीने सांगितलेले हे व्यायाम एकदा करून बघा.

Yoga for reducing back pain, sciatic nerve and sciatica pain, Yoga tips given by Anushka Parwani | सततच्या कंबरदुखीने वैतागलात? सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अनुष्का परवानीने सांगितलेले ३ व्यायाम करा, रहा फिट

सततच्या कंबरदुखीने वैतागलात? सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अनुष्का परवानीने सांगितलेले ३ व्यायाम करा, रहा फिट

Highlightsबॉलीवूडच्या सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अनुष्का परवानी यांनी सांगितलेले काही योगा प्रकार

पहिलं बाळंतपण झालं की अनेक जणींच्या मागे कंबरदुखी लागते. दिवसभर उत्साहाने काम होतं. पण रात्री अंथरुणाला पाठ टेकली की कंबरदुखी ( Back Pain) प्रकर्षाने जाणवू लागते. खाली वाकणं कठीण हाेतं. त्यात खूप तास बसून काम करावं लागतं. खड्डे सांभाळत दुचाकी चालवावी लागते. अनेकदा ओझी उचलली जातात. किंवा बॉडी पोश्चर चुकीचं असतं. या सगळ्यांमुळे कंबरदुखी तसेच सायटिकाचा (sciatic nerve and sciatica pain) त्रास वाढत जातो. हा त्रास कमी करण्यासाठी बॉलीवूडच्या सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अनुष्का परवानी (Yoga tips given by Anushka Parwani) यांनी सांगितलेले काही योगा प्रकार

 

सायटिका, कंबरदुखीचा त्रास कमी करणारी योगासनं
१. हाफ पीजन पोझ

यासाठी दोन्ही तळहात जमिनीला टेकवा. एक पाय मागे सरळ रेषेत ठेव. तर दुसरा गुडघ्यात दुमडा.

"माझी वेणी अशीच घाल...", आईकडे हट्ट करून बसणाऱ्या लेकीचा व्हिडिओ व्हायरल, बघा ही प्रेमळ गोष्ट

नंतर गुडघ्यात दुमडलेला पाय तुमच्या समोरच्या बाजुने जमिनीवर आडवा ठेवा. दोन्ही तळहात जमिनीला टेकलेच राहू द्या. काही सेकंद ही आसनस्थिती टिकवा. पुन्हा दुसऱ्या पायाने अशाच पद्धतीने आसन करा.

 

२. रिव्हर्स पिजन पोज
यामध्ये पाठीवर झोपा. एक पाय गुडघ्यात दुमडा. दुसरा पाय गुडघ्यात दुमडून वर उचला आणि दुसऱ्या पायावर आडवा ठेवा. तुमचा एक हात दोन्ही पायांच्या मधून घाला तर एक हात गुडघ्यात दुमडून उभ्या ठेवलेल्या पायाच्या बाजूने ठेवा. दोन्ही हातात एकमेकांत गुंफून घ्या आणि पाय शरीराजवळ घ्या. ही स्थिती दोन्ही पायांनी करा.

पीसीओडी आणि पीसीओएसचा त्रास? ५ पथ्य पाळा, वाचा आहारतज्ज्ञांचा खास सल्ला

३. स्पायनल ट्विस्ट
पाठीवर सरळ झोपा. एक पाय गुडघ्यात दुमडा आणि तो दुसऱ्या पायावर ठेवा. शरीर मात्र ताठ आणि सरळ रेषेत ठेवण्याचा प्रयत्न करा. 

 

Web Title: Yoga for reducing back pain, sciatic nerve and sciatica pain, Yoga tips given by Anushka Parwani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.