Lokmat Sakhi >Fitness > गुडघेदुखी- पाठदुखीचा त्रास? मलायका अरोरा सांगतेय खास उपाय, त्रास होईल कमी- तब्येत फिट 

गुडघेदुखी- पाठदुखीचा त्रास? मलायका अरोरा सांगतेय खास उपाय, त्रास होईल कमी- तब्येत फिट 

Fitness Tips By Malaika Arora: बैठं काम असणाऱ्यांना हे दुखणं कायमच छळतं.. म्हणूनच तर त्यावरचा खास उपाय सांगते आहे बॉलीवूडची फिटनेस क्वीन मलायका अरोरा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2022 01:39 PM2022-08-10T13:39:02+5:302022-08-10T13:40:40+5:30

Fitness Tips By Malaika Arora: बैठं काम असणाऱ्यांना हे दुखणं कायमच छळतं.. म्हणूनच तर त्यावरचा खास उपाय सांगते आहे बॉलीवूडची फिटनेस क्वीन मलायका अरोरा..

Yoga for reducing backpain and knee pain, special yoga tips shared by Malaika Arora, Benefits of Utkatasana or chair pose | गुडघेदुखी- पाठदुखीचा त्रास? मलायका अरोरा सांगतेय खास उपाय, त्रास होईल कमी- तब्येत फिट 

गुडघेदुखी- पाठदुखीचा त्रास? मलायका अरोरा सांगतेय खास उपाय, त्रास होईल कमी- तब्येत फिट 

Highlightsपाठदुखी- कंबरदुखी- गुडघेदुखी हा त्रास कमी करायचा असल्यास, उत्कटासन करणे अतिशय उपयुक्त. या आसनाला chair pose असंही म्हणतात. 

आजकाल नोकरदार मंडळींना सतत ८- ९ तास स्क्रिनसमोर बसावं लागतं. लंच ब्रेक, टी ब्रेक या वेळात उठून चालण्याचं प्रमाण खूपच कमी असतं. त्यामुळे दिवसांतला अधिकाधिक वेळ बैठं काम करण्यात जातो. यातंही बऱ्याचदा सिटींग पोझिशन चुकीची असल्याने किंवा एकाच स्थितीत खूप वेळ बसल्याने कंबरदुखी, पाठदुखी (How to reduce backpain and knee pain) असा त्रास अनेक जणांना जाणवतो. चालणं कमी झाल्यामुळे आणि वजन वाढल्यामुळे कमी वयातच गुडघेदुखी मागे लागली असल्याची तक्रारही अनेकांनी आहेच. हा सर्व त्रास कमी करायचा असेल, तर मलायका अरोरा सांगतेय तो उपाय करून बघा. (remedies for back pain and knee pain by Malaika Arora )

 

मलायक अरोरा सोशल मिडियावर नेहमीच ॲक्टीव्ह असते. फिटनेससाठी कोणता व्यायाम किती वेळ आणि कशा पद्धतीने केला पाहिजे, आहार कसा असावा, या गोष्टींची माहिती ती नेहमीच शेअर करत असते. तिच्या या टिप्स अतिशय उपयोगी ठरत असल्याने त्या फॉलो करणाऱ्यांची संख्याही खूप जास्त आहे. आता नुकताच मलायकाने तिचा आणखी एक व्हिडिओ शेअर केला असून यामध्ये ती योगा करताना दिसते आहे. यामध्ये ती उत्कटासन करत असून पाठदुखी- कंबरदुखी- गुडघेदुखी हा त्रास कमी करायचा असल्यास, उत्कटासन करणे अतिशय उपयुक्त असल्याचं ती सांगते. या आसनाला chair pose असंही म्हणतात. 

 

कसं करायचं उत्कटासन?
- दोन्ही पायांत थोडे अंतर घेऊन ताठ उभे रहा.
- दोन्ही हात समाेरच्या दिशेने घ्या.

पावसाळ्यात सगळ्या डाळी खायलाच हव्यात, मात्र तज्ज्ञ सांगतात डाळी खाण्याची योग्य पद्धत..
- आता दिर्घ श्वास घ्या. श्वास हळूवार सोडत दोन्ही गुडघ्यातून खाली वाका. आपण एखाद्या खुर्चीमध्ये असत आहोत, त्याप्रमाणे शरीराची अवस्था ठेवा.
- कमीतकमी ५ ते ६ सेकंद या अवस्थेत रहा आणि त्यानंतर पुन्हा मुळ स्थितीत या.
- ५ ते ६ वेळा हा व्यायाम करावा. 

 

उत्कटासन करण्याचे फायदे
Benefits of Utkatasana or chair pose

१. पाय, कंबर यांचे स्नायू मजबूत करण्यासोबतच छाती, पाठ, खांदे येथील स्नायुंच्या मजबुतीसाठीही हे आसन फायदेशीर आहे.
२. मनावरचा ताण कमी करण्यासाठी या आसनाचा उपयोग होतो.

खूप राग येतो, चिडचिड होते? मीरा कपूर सांगतेय, मन आणि डोकंही शांत ठेवणारा उपाय
३. हे आसन करताना गुडघ्यांवर विशिष्ट पद्धतीने दाब येतो. त्यामुळे हा व्यायाम नियमित केल्यास भविष्यात गुडघेदुखीचा  त्रास  जाणवणार नाही. कमी वयात गुडघेदुखीचा त्रास सुरु झाला असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने हा व्यायाम करा. 
४. पाठ आणि कंबरेचे स्नायू रिलॅक्स होऊन पाठदुखी- कंबरदुखी कमी करण्यासाठी उपयुक्त व्यायाम.
५. उत्कटासन नियमित केल्याने एकाग्रता वाढते.
६. शारिरीक- मानसिक संतुलन उत्तम राहण्यासाठी उपयुक्त् व्यायाम. 

 

Web Title: Yoga for reducing backpain and knee pain, special yoga tips shared by Malaika Arora, Benefits of Utkatasana or chair pose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.