Join us  

बद्धकोष्ठता, गॅसेस आणि अपचनाचा सतत त्रास? सुप्तवज्रासन करा, वाचा ५ जबरदस्त फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2022 8:10 AM

Home Remedies For Indigestion: खाण्यात जरा काही बदल झाला की बिघडलं पोट, असं तुमचंही होतं का, हा त्रास कमी करण्यासाठी करा सुप्तवज्रासन..

ठळक मुद्देअपचनाचा त्रास दूर करण्यासोबतच सुप्त वज्रासन करण्याचे इतर अनेक फायदेही आहेत.

काही लोकांना खाण्यापिण्यात झालेला थोडाही बदल सहन होत नाही. वय जास्त असेल, तर हा त्रास होणं साहजिक आहे. पण तरुण वयातही हा त्रास अनेकांना जाणवतो. सकाळी पोट साफ होत नाही (constipation), वारंवार गॅसेसचा (gases) त्रास होतो. ॲसिडीटी वाढते (acidity). असे अनेक त्रास कमी करण्यासाठी सुप्तवज्रासन करणे अधिक फायदेशीर ठरते. पचन चांगले व्हावे, म्हणून वज्रासन करावे, हे तर आपण जाणतोच. पण त्यापेक्षाही सुप्त वज्रासन (Benefits of Supta Vajrasana) करणे अधिक फायदेशीर ठरते. अपचनाचा त्रास दूर करण्यासोबतच सुप्त वज्रासन करण्याचे इतर अनेक फायदेही आहेत. ते इन्स्टाग्रामच्या fitnesshubworld7 या पेजवर शेअर करण्यात आले आहेत.

 

सुप्तवज्रासन करण्याचे फायदे१. छाती, कंबर, पाठ, पाठीणा कणा या भागांचा व्यायाम होण्यासाठी आणि त्यांचे उत्तमप्रकारे स्ट्रेचिंग होण्यासाठी चांगला व्यायाम.

२. पायाचे सांधे व स्नायू मजबूत करण्यासाठी फायदेशीर.

३. शरीरात हार्मोन्स स्त्रवणाऱ्या वेगवेगळ्या ग्रंथी अधिक सक्रिय होतात. त्यामुळे उर्जादायी वाटते.

४. ओटी पोटाचाही व्यायाम होतो. त्यामुळे मासिक पाळीतला त्रास कमी करण्यासाठी महिलांनी हे आसन नियमितपणे करावे.

५. आतडी, लिव्हर आणि किडनी यांचे कार्य अधिक चांगले होण्यास मदत होते.

 

कसे करायचे सुप्त वज्रासन१. सुप्त वज्रासन करण्यासाठी सगळ्यात आधी वज्रासन घाला. म्हणजेच दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून मागच्या बाजून वळवा आणि त्यावर ताठ बसा.

शिल्पा शेट्टी सांगतेय स्ट्रेचिंगसाठी २ परफेक्ट व्यायाम, फिटनेस आणि पोटाचे त्रास, दोन्हींसाठी उत्तम

२. आता हळूहळू मागे सरका आणि दोन्ही हातांचे कोपर जमिनीला टेकवा.

३. कंबर, पाठ, मान, डोके हे सगळे अवयव जमिनीला टेकवून पाठीवर झोपा.

४. दोन्ही हात पोटावर किंवा पायाच्या आजूबाजूला ठेवा.

५. हे आसन करताना कुणी दोन्ही तळपाय तसेच मांडीखाली राहू देतात, तर कुणी दोन्ही तळपाय दोन्ही बाजूंना काढतात. 

६. २५ ते ३० सेकंद हे आसन टिकविण्याचा प्रयत्न करावा. 

 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामयोगासने प्रकार व फायदे