आजकाल स्क्रिनचा वापर वाढल्याने प्रत्येकालाच डोळ्यांच्या वेगवेगळ्या समस्या जाणवत आहेत. कुणाचे डोळे काेरडे पडतात (dryness of eyes), तर कुणाच्या डोळ्यावर ताण येतो (eye fatigue). चष्मा लागण्याचे किंवा चष्म्याचा नंबर वाढण्याचे प्रमाण तर हल्ली खूपच वाढले आहे. कमी वयात अनेकांना मोतीबिंदूही होत आहे. म्हणूनच डोळ्यांच्या बाबतीत असणाऱ्या वेगवेगळ्या समस्यांवर एक सोपा उपाय इन्स्टाग्रामच्या theyoginiworld या पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये डोळ्यांच्या आरोग्यासाठी प्राण मुद्रा (Benefits of Pran Mudra) करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
कशी करायची प्राणमुद्रा?१. योगशास्त्रानुसार आपल्या तळहातावर अनेक प्रेशर पॉईंट्स असतात. हे पॉईंट्स योग्य पद्धतीने दाबले गेले की आपोआपच त्याचा आरोग्यावर सकारात्मक उपयोग होतो. यालाच आपण योगमुद्रा असेही म्हणतो.
सारखी अंगदुखी, मसल्स पेनमुळे वैतागलात? ५ पदार्थ नियमित खा, स्नायूंचा थकवा कमी होईल
२. प्राणमुद्रा हा त्यातलाच एक प्रकार. यामध्ये करंगळी आणि त्याच्या बाजूचे बोट खाली झुकवा आणि त्या दोन्ही बोटांच्या समोरच्या टोकांनी अंगठ्याच्या वरच्या टोकावर प्रेशर द्या. साधारण दिवसभरातून साधारण १५ ते २० मिनिटे ही मुद्रा करावी.
३. प्राणमुद्रा करताना पाठीचा कणा ताठ असावा. डोळे बंद केलेले असावेत. श्वास संथ गतीमध्ये चालू असावा. मांडी घालून किंवा पद्मासन, वज्रासन, अर्ध पद्मासन घालूनही तुम्ही ही मुद्रा करू शकता.
अनुपमाचं जबरदस्त ज्वेलरी कलेक्शन! लग्नसमारंभात कशी ज्वेलरी घालावी हे सुचत नसेल तर तिचे १० लूक बघाच..
४. जेवण झालेलं असेल तर साधारण २ ते ३ तासाने ही मुद्रा करावी. किंवा सकाळी रिकाम्या पोटी करणे सगळ्यात उत्तम.
प्राणमुद्रा करण्याचे फायदे१. मोतीबिंदू, ग्लायकोमा, मायोपिया हे आजार टाळण्यासाठी ही मुद्रा प्रभावी ठरते.
२. डोळ्यांचा थकवा, ताण, कोरडेपणा कमी होण्यास मदत होते.
मलायका अरोराचा तब्बल ३ लाखांचा पांढराशुभ्र गाऊन.. बघा नेमकं काय सौंदर्य आहे त्यात
३. रातांधळेपणा किंवा कलर ब्लाईंडनेससाठीदेखील ही मुद्रा फायदेशीर ठरते.
४. सायटिका, पाय दुखणे, डोकेदुखी, खूप थकवा येणे असा त्रास होत असेल तरीही प्राणमुद्रा करावी. लवकर आराम मिळेल.