Lokmat Sakhi >Fitness > Yoga For Summer: उन्हाळ्यात होणारा उष्णतेचा त्रास कमी करणारी ३ आसनं, मलायका अरोराचा खास सल्ला 

Yoga For Summer: उन्हाळ्यात होणारा उष्णतेचा त्रास कमी करणारी ३ आसनं, मलायका अरोराचा खास सल्ला 

Fitness Tips By Malaika Arora: उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास टाळायचा असेल तर शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी कोणती आसनं करायला पाहिजे, हे सांगते आहे बॉलीवूडची फिटनेस क्वीन मलायका अरोरा.(yoga for summer)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2022 01:32 PM2022-04-26T13:32:23+5:302022-04-26T13:48:20+5:30

Fitness Tips By Malaika Arora: उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास टाळायचा असेल तर शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी कोणती आसनं करायला पाहिजे, हे सांगते आहे बॉलीवूडची फिटनेस क्वीन मलायका अरोरा.(yoga for summer)

Yoga For Summer: Malaika Arora recommends 3 asanas that will help you cool down the body in this hot summer | Yoga For Summer: उन्हाळ्यात होणारा उष्णतेचा त्रास कमी करणारी ३ आसनं, मलायका अरोराचा खास सल्ला 

Yoga For Summer: उन्हाळ्यात होणारा उष्णतेचा त्रास कमी करणारी ३ आसनं, मलायका अरोराचा खास सल्ला 

Highlights ही आसनं केल्यामुळे शरीरातील शरीरातील तापमान नियंत्रित राहतं आणि उष्णतेचा त्रास कमी होतो

उष्णता वाढल्यामुळे उन्हाळ्यात अनेकांना वेगवेगळे त्रास जाणवायला लागतात. कुणाला उन्हाळी लागते तर कुणाच्या तळहाताची, तळपायाची त्वचा रखरखीत कोरडी होते. डिहायड्रेशनचा त्रासही या दिवसांत होतो. त्यामुळेही शरीरातली पाणी पातळी कमी होते आणि उष्णता वाढू लागते. (How to reduce heat in body?) म्हणूनच अंगातली उष्णता कमी करण्यासाठी (how to get cool down in summer with yoga?) आणि शरीराला थंडावा देण्यासाठी उन्हाळ्यात काही खास फळ खावीत, सरबते प्यावीत असा सल्ला डॉक्टर देत असतात. त्याचप्रमाणे शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी उन्हाळ्यात काही विशेष आसनं करायचीही गरज आहे.

 

मलायका अरोराने नुकताच एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. यामध्ये उन्हाळ्यात प्रत्येकाने करायलाच हवीत अशी ३ आसनं सांगितली आहेत. ही आसनं केल्यामुळे शरीरातील शरीरातील तापमान नियंत्रित राहतं आणि उष्णतेचा त्रास कमी होतो, असं ती सांगते आहे. त्यामुळे उन्हाळ्यात कुल- कुल राहण्यासाठी काढा थोडा वेळ आणि करून बघा ही सोपी आसनं.

 

उन्हाळ्यात करावीच अशी ३ आसनं (summer special yoga)
१. एकपाद कपोतासन (Pigeon pose)

हे आसन करण्यापुर्वी एकदा सुर्यनमस्कार घालून अंग मोकळं करून घ्या. सुर्यनमस्काराचं एक आवर्तन झालं की पुन्हा दुसऱ्यांदा सुरुवात करा. सुर्यनमस्काराची जी तिसरी अवस्था आहे त्या अवस्थेतूनच आपल्याला एकपाद कपोतासन करायचे आहे. तिसऱ्या अवस्थेत तुमचे दोन्ही हाताचे तळवे जमिनीवर टेकलेले असतात. एक पाय गुडघ्यात वाकवून या दोन्ही हातांच्या मध्ये असतो तर दुसरा पाय मागे असतो. आता जो समोर टेकलेला उभा पाय आहे, तो जमिनीवर आडवा करा. मान सरळ रेषेत असू द्या. ही आसनस्थिती ३० सेकंद टिकविण्याचा प्रयत्न करा.

 

२. मार्जरासन (Cat cow pose)
हे आसन करण्यासाठी गुडघ्यावर उभे रहा. आता दोन्ही तळहात जमिनीला टेकवा. एकदा पाठीचा कणा शक्य तेवढा जमिनीच्या दिशेने झुकवा. मान झुकवू नका, सरळ ठेवा. आता त्यानंतर पुन्हा पाठीचा कणा शक्य तेवढा वरच्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न करा. या अवस्थेत मान खाली करा. या दोन्ही अवस्था एकानंतर एक या पद्धतीने करा. यालाच Cat cow pose असेही म्हणतात.

 

३. वृक्षासन (Tree pose)
वृक्षासन करण्यासाठी ताठ उभे रहा. एका पाय गुडघ्यातून वाकवा आणि त्याचा तळपाय दुसऱ्या पायाच्या मांडीजवळ ठेवा. दोन्ही हात डोक्याच्या वर घ्या आणि तळहात एकमेकांना जोडा. नजर समाेरच्या भिंतीवर स्थिर ठेव. एका पायाने आसन केल्यानंतर दुसऱ्या पायानेही करा. दोन्ही पायांची आसनस्थिती ३० सेकंद किंवा त्यापेक्षा अधिक वेळ टिकवा.

 

Web Title: Yoga For Summer: Malaika Arora recommends 3 asanas that will help you cool down the body in this hot summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.