Join us  

नैसर्गिक पद्धतीने बॉडी डिटॉक्स करणारी योगमुद्रा, वेटलॉससाठीही होईल फायदा- बघा कशी करायची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2022 8:06 AM

Fitness Tips For Body Detox: बऱ्याचदा नियमितपणे डिटॉक्स ड्रिंक्स घेणं होत नाही. त्यामुळे अशावेळी ही एक योगमुद्रा करून बघायला हरकत नाही. 

ठळक मुद्देनियमितपणे डिटॉक्स ड्रिंक्स घेणं होत नाही. किंवा शरीर डिटॉक्स करणारी फळं, भाज्या नियमितपणे खाणं होत नाही. म्हणूनच अशा वेळी नैसर्गिक पद्धतीने बॉडी डिटॉक्स करणारी ही एक योगमुद्रा करून बघा

शरीरात जमा झालेले विषारी द्रव्य बाहेर टाकणे म्हणजेच बॉडी डिटॉक्स करणे होय. बऱ्याचदा आपल्याकडून गरजेपेक्षा जास्त खाल्ले जाते. अशावेळी शरीरात अनेक अनावश्यक पदार्थ तयार होतात आणि ते तसेच राहतात. अशा पदार्थांना वेळोवेळी शरीराबाहेर काढून टाकण्याची गरज असते. जेणेकरून तब्येत तर उत्तम राहतेच पण वजनही नियंत्रणात (weight control) राहण्यास मदत होते. यालाच आपण बॉडी डिटॉक्स करणे म्हणताे.(Yog mudra for natural body detox)

बॉडी डिटॉक्स करण्यासाठी काही पदार्थ, फळं, भाज्या उपयुक्त ठरतात. त्यांचे वेगवेगळे ज्यूस डिटॉक्स ड्रिंक्स म्हणूनच ओळखले जातात.

थंडीत त्वचा कोरडी पडली? अंगावर पुरळ आली, खाज सुटली? ४ उपाय, त्वचेच्या तक्रारी कमी

पण बऱ्याचदा कामाच्या धावपळीत किंवा स्वत:कडे लक्ष देण्यासाठी खूप वेळ न मिळाल्याने नियमितपणे डिटॉक्स ड्रिंक्स घेणं होत नाही. किंवा शरीर डिटॉक्स करणारी फळं, भाज्या नियमितपणे खाणं होत नाही. म्हणूनच अशा वेळी नैसर्गिक पद्धतीने बॉडी डिटॉक्स करणारी ही एक योगमुद्रा करून बघा, असा सल्ला योगतज्ज्ञ देत आहेत. याविषयीची माहिती इन्स्टाग्रामच्या yogic_hacks या पेजवर शेअर करण्यात आली आहे.

 

कशी करायची डिटॉक्स मुद्रा?१. ही मुद्रा करण्यासाठी मधले बोट आणि त्याच्या बाजुची अनामिका यांच्यामधले अंतर वाढवावे आणि त्या दोन्ही बोटांच्यामध्ये जी जागा आहे, त्यावर अंगठ्याने दाब द्यावा. अशी मुद्रा दोन्ही हातांनी करावी.

मायक्रोवेव्हची काच भुरकट झाली? २ सोपे उपाय, काच चटकन होईल स्वच्छ- चकचकीत

२. नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण या तिन्हींच्या आधी ७ ते १० मिनिटांसाठी ही मुद्रा करावी.

३. पचनक्रिया किंवा बॉडी डिटॉक्स यासंबंधी तुम्हाला काही शारिरीक तक्रारी असतील, त्यासाठी तुम्ही कोणतीही औषधी घेत असाल तर मनानेच सर्व औषधी बंद करून या मुद्रेचा प्रयोग करू नये. आधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि त्यानंतर ही मुद्रा करायला सुरुवात करावी. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्सवेट लॉस टिप्सयोगासने प्रकार व फायदे