Lokmat Sakhi >Fitness > रात्री टेंन्शन फ्री होऊन झोपण्यासाठी करा एक सोपी मुद्रा, झोप लागेल एकदम गाढ...

रात्री टेंन्शन फ्री होऊन झोपण्यासाठी करा एक सोपी मुद्रा, झोप लागेल एकदम गाढ...

Yoga Nidra For Sleep : पुरेशी झोप न मिळाल्याने आपल्याला अनेक शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागते, यासाठी झोपण्यापूर्वी करा 'योग निद्रा'...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2024 08:04 PM2024-06-26T20:04:06+5:302024-06-26T20:14:54+5:30

Yoga Nidra For Sleep : पुरेशी झोप न मिळाल्याने आपल्याला अनेक शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागते, यासाठी झोपण्यापूर्वी करा 'योग निद्रा'...

Yoga Nidra A Step-by-Step Guide to Yogic Sleep for Top Relaxation Yoga Nidra Meditation for Sleep - Benefits and How to do it | रात्री टेंन्शन फ्री होऊन झोपण्यासाठी करा एक सोपी मुद्रा, झोप लागेल एकदम गाढ...

रात्री टेंन्शन फ्री होऊन झोपण्यासाठी करा एक सोपी मुद्रा, झोप लागेल एकदम गाढ...

धकाधकीच्या फास्ट लाईफस्टाईलमुळे आपल्या रुटीनमध्ये अनेक बदल होतात. या बदलत्या लाईफस्टाईल व रुटीनचा आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम झालेला दिसून येतो. निरोगी राहण्यासाठी तणावापासून दूर राहणे आणि चांगली झोप घेणे अत्यंत आवश्यक असते. परंतु बदलत्या काळानुसार, तणाव वाढत चालला आहे. वाढलेल्या तणावामुळे अनेक शारीरिक समस्या निर्माण होतात, त्यापैकी झोप न येणे ही एक मोठी समस्या आहे. झोप न येण्याची समस्या आजकाल सर्वच वयोगटांतील व्यक्तींना कमी - अधिक प्रमाणात जाणवते. दिर्घकाळ तणावाखाली राहणे किंवा पुरेशी झोप न मिळाल्याने आपण आजारी पडू शकतो(Yoga Nidra For Sleep).

आजकाल आपण सर्वजण कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे तणावाखाली रहात आहोत. जेव्हा शरीरात स्ट्रेस हार्मोन्स वाढतात तेव्हा त्याचा आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. ताणतणावात असताना आपल्याला झोप लागत नाही. पुरेशी झोप न लागल्याने आपल्याला अनेक शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागते. यासाठीच तणावातून मुक्त (Reduce Stress) होण्यासाठी आणि चांगली झोप येण्यासाठी, योग्य आहार आणि निरोगी जीवनशैली अत्यंत आवश्यक आहे. रात्री टेंन्शन फ्री होऊन गाढ झोपी जाण्यासाठी (Yoga Nidra for Sleep) आपण एक सोपे योगासन करु शकतो. तणाव कमी करण्यासाठी आणि चांगली झोप येण्यासाठी आपण हे आसन करु शकता(Yoga Nidra Meditation for Sleep - Benefits and How to do it).

१. 'योग निद्रा' हे आसन कसे करावे ? 

चांगली झोप आणि तणाव दूर करण्यासाठी 'योग निद्रा' हे आसन खूप चांगले मानले जाते. हे असं जेवण केल्यानंतर, २ ते ३ तासांनी झोपण्यापूर्वी करावे. झोपण्यापूर्वी १५ ते २० मिनिटे हे आसन करावे. 

१. सर्वातआधी एका शांत आणि मोकळ्या अशा ठिकाणी मॅट किंवा कोणत्याही आसनावर पाठ टेकवून झोपा. तुमचे संपूर्ण शरीर सैल सोडा आणि डोळे बंद करून तळहात जमिनीला चिकटवून, हाताचा पंजा वरच्या दिशेने येईल असा ठेवा. दीर्घ श्वास घ्या आणि शांतपणे सोडा असे तीन ते चार वेळा करा ज्यामुळे तुमचा श्वास संथ सुरू राहिल. श्वासावर लक्ष ठेवत हळूहळू तुमच्या शरीरातील प्रत्येक अवयवावर तुमचे लक्ष क्रेंद्रित करा. जसं की डावा पाय, डाव्या पायाचा अंगठा, डाव्या पायाचे पाऊल, डाव्या पायाची मांडी असे शरीरातील प्रत्येक अवयवावर लक्ष देत देत संपूर्ण शरीरावर तुमचे लक्ष क्रेंद्रित करा.

२. शरीरातील प्रत्येक अवयव डावा पाय, उजवा पाय, डावा हात, उजवा हात, छाती, पोट, खांदे, बेंबी, गळा, कंबर, डोके अशा प्रत्येक अवयवामधील संवेदना अनुभवा. संपूर्ण शरीरावर लक्ष देण्याची क्रिया पूर्ण झाल्यावर पुन्हा तीन वेळा दिर्घ श्वास घ्या. अशा वातावरणात तुम्हाला हवे तितका वेळ तुम्ही शांतपणे पडून राहू शकता.

३. उठण्यासाठी आधी डाव्या कुशीवर वळा त्यानंतर उजवा हात पोटाजवळ ठेवत सावकाश मांडी घालून बसा. तळहात एकमेकांवर रगडा आणि हाताची उष्णता डोळ्यांना देत हळू हळू डोळे उघडा. 

'योग निद्रा'आसन करण्याचे फायदे :- (Amazing Benefits of Yoga Nidra) 

१. झोपेच्या अनेक समस्या दूर करून झोप लागण्यास मदत मिळते. 

२. योग निद्रा नियमित केल्यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढते. 

३. या आसनामुळे तणाव दूर होतो आणि मन शांत होते.

४. आरोग्य सुधारते आणि चेहऱ्यावर चमक येते.

५. तणावामुळे आलेला थकवा दूर होण्यास मदत मिळते.

Web Title: Yoga Nidra A Step-by-Step Guide to Yogic Sleep for Top Relaxation Yoga Nidra Meditation for Sleep - Benefits and How to do it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.