Join us  

थकवा दूर होऊन वाढेल स्टॅमिना, करा मलायका अरोरा सांगतेय ते अंजनेयासन, ५ जबरदस्त फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2022 8:07 AM

Yoga For Mental Fitness: मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या अधिक खंबीर होण्यासाठी मलायका अरोराने एक खास व्यायाम सांगितला आहे (Benefits of Anjaneyasana).

ठळक मुद्देज्या लोकांना कायम थकल्यासारखे वाटते, अशा लोकांचा थकवा घालवून त्यांचा स्टॅमिना वाढविण्यासाठी अंजनेयासनाची मदत होते.

आज प्रत्येकाच्याच मागे कुठला ना कुठला ताण आहे. करिअर, नोकरी, रिलेशन अशा टेन्शन्सचा व्यापही दिवसेंदिवस वाढतच असतो. हा सगळा ताण पेलायचा असेल तर आपण मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या खंबीर असणं गरजेचं आहे. योगाच्या माध्यमातून शारिरीक आणि मानसिक फिटनेस (Yoga For Mental Fitness) मिळवणं शक्य आहे. आणि म्हणूनच त्यासाठीचं उत्तम योगासन कोणतं आणि ते कसं करायचं, याविषयीची माहिती मलायका अरोरा हिने एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे दिली आहे. यामध्ये मलायका (Malaika Arora) अंजनेयासन करताना दिसते आहे. बघा हे आसन करण्याचे नेमके काय फायदे होतात.(Benefits of Anjaneyasana)

 

कसं करायचं अंजनेयासन?१. पोस्टमध्ये मलायकाने पायाखाली एक रिंग घेतलेली दिसत आहे. पण तुम्ही जेव्हा तुमच्या घरी हे आसन कराल, तेव्हा अशा कोणत्याही रिंगची गरज नाही. योगा मॅट किंवा सतरंजीवर तुम्ही हे आसन करू शकता. 

करवा चौथ स्पेशल : बॉलिवूड अभिनेत्रींच्या सुंदर साड्या, लालचुटूक-भरजरी साड्यांचे पहा एकसेएक व्हायरल फोटो

२. अंजनेयासन करण्यासाठी योगा मॅटवर उभे रहा. यानंतर एक पाय पुढे घ्या आणि तो गुडघ्यात वाकवा.

३. मागचा पाय मागच्या बाजूने शक्य होईल तेवढा वाकवा. तसेच समोरचा पायही गुडघ्यात वाकवा.

४. आता दोन्ही हात डोक्यावर घेऊन तळहात एकमेकांना नमस्काराच्या अवस्थेत जोडा.

५. या अवस्थेत असताना कंबरेतून मागे वाकण्याचा प्रयत्न करा.

६. ही अवस्था २५ ते ३० सेकंद टिकविल्यानंतर हेच आसन दुसऱ्या पायाने तेवढ्याच वेळेसाठी करा.

 

अंजनेयासन करण्याचे फायदे१. शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या खंबीर राहण्यासाठी हे आसन उपयुक्त ठरते.

२. ज्या लोकांना कायम थकल्यासारखे वाटते, अशा लोकांचा थकवा घालवून त्यांचा स्टॅमिना वाढविण्यासाठी अंजनेयासनाची मदत होते.

घरात उंदीर झाले? ३ सोपे उपाय, उंदीर होतील गायब

३. अंजनेयासन नियमितपणे केल्यास फुफ्फुसांची ताकद वाढते.

४. पोटाच्या आणि कंबरेच्या स्नायूंना बळकटी देण्यासाठी या आसनाची मदत होते.

५. सायटिकाचा त्रास कमी करण्यासाठीही हे आसन उपयुक्त ठरते. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामयोगासने प्रकार व फायदेमलायका अरोरा