Join us  

करा ‘सूक्ष्म व्यायाम’, छोटा पॅकेट बडा धमाका! रक्ताभिसरणच नाही तर पचनही सुधारेल, फ्लेक्झिबलही व्हाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2022 2:31 PM

सूक्ष्म व्यायाम ही प्राचीन व्यायाम पद्धती आहे, योगाभ्यासात तिचे मोठे महत्त्व आहे.

ठळक मुद्देलहान वयापासूनच सूक्ष्म व्यायाम साधना केल्यास शरीर कायमस्वरूपी बलवान होते.

वृषाली जोशी-ढोके

व्यायाम म्हणजे कष्टाचं काम, प्रचंड मेहनत असं अनेकांना वाटतं. हल्ली तर हायपर एक्सरसाईज, रिगरस व्यायाम यांचीही चर्चा असते. त्यासाऱ्यात सावकाश हालचाली करत सूक्ष्म व्यायाम करा असं कुणी सांगितलं तर पहिला प्रश्न विचारला जाईल की पण त्याचा फायदा शरीराला होतो का? खरंच व्यायाम पुरतो का तेवढा. तर त्याचं उत्तर असं कीजुन्या काळात जंगलात, हिमालयात बरेच वर्ष राहून देखील  ऋषीमुनी फिट असतं. ते नक्की काय खातात, नुसतेच कंद मुळे खाऊन कसे राहू शकतात असे एक न अनेक प्रश्न. या सगळ्याचं उत्तरं आपल्याला भारतीय संस्कृतीत प्राचीन काळातील ग्रंथांमध्ये सापडतात. त्यातीलच एक साधना म्हणजे सूक्ष्म व्यायाम योग साधना. अगदी पाच हजार वर्षांपूर्वीच्या महाभारत ग्रंथात देखील सूक्ष्म व्यायामाचा उल्लेख आढळतो. परंतु कालांतराने ही साधना काही कारणांमुळे लुप्त झाली. सूक्ष्म व्यायामाला योग प्राणायामाचा "राजा" असेही म्हंटले जाते. योगाभ्यासाची पूर्व तयारी म्हणून देखील ही साधना केली जाते. आपल्या शरीराचेसुध्दा दोन प्रकार आहेत स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर. भारतीय पारंपरिक दर्शनांनुसार सूक्ष्म व्यायाम प्रक्रिया सूक्ष्म शरीरावर परिणाम करतात. सूक्ष्म शरीरावर ताबा आणि नियंत्रण मिळवण्यासाठी, अधिकार प्राप्त करण्यासाठी हे व्यायाम प्रकार सांगितले आहेत. सूक्ष्म व्यायामामुळे शरीराच्या आतील प्रत्येक नाडी, शिरा, सूक्ष्मतंतू (मज्जातंतू), नसा, मांसपेशी, हाडे या सर्वांमध्ये संचार करणाऱ्या सूक्ष्म शक्तीवर नियंत्रण करता येते. सूक्ष्म शरीरात पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये,पंचप्राण,मन आणि बुद्धी अश्या शरीराच्या १७ तत्वांचा समावेश आहे. सूक्ष्म व्यायमामध्येही अनेक प्रकार आहेत. 

(Image : Google)

सूक्ष्म व्यायामाचे ५ महत्त्वाचे प्रकार आहेत.

१. मानेच्या हालचाली२. खांद्याच्या हालचाली३. कमरेच्या हालचाली४. गुडघ्याच्या हालचाली५. घोट्याच्या हालचाली

 

(Image : Google)

सुक्ष्म व्यायामाचे फायदे

 सूक्ष्म व्यायाम सर्व प्रकारच्या वयोगटासाठी उपयुक्त आहे. ज्यांना योगासने, प्राणायाम करता येत नाही ते सूक्ष्म व्यायाम सहज करू शकतात. ह्या हालचालींचा मनावरही चांगलाच परिणाम होतो. मनावरचा ताण काढून टाकण्यासाठी, मनःशांतीसाठी, एकाग्रतेसाठी ही फायदेशीर आहेत.

१. कोणत्याही प्रकारच्या व्याधीग्रस्तांसाठी उपयुक्त२. शरीरातील मांसपेशी बलवान होतात.३. स्नायूंची लवचिकता वाढते.४. रक्तप्रवाह आणि चयापचय प्रक्रिया सुधारते.५. शरीराची पूर्ण शुद्धता होते.६. आयुष्यभर आरोग्य उत्तम राहते.७. श्वासाची गती कमीतकमी होत जाते त्यामुळे हाडांची बळकटी वाढते.लहान वयापासूनच सूक्ष्म व्यायाम साधना केल्यास शरीर कायमस्वरूपी बलवान होते. संतती ही सुदृढ, दीर्घायु आणि बुद्धीवान होते. अशी ही साधना, "छोटा पॅक बडा धमाका".

(लेखिका आयुष मान्यताप्राप्त योगा-वेलनेस ट्रेनर आहेत.)

टॅग्स :योगासने प्रकार व फायदेफिटनेस टिप्स