Lokmat Sakhi >Fitness > मिलिंद सोमण दररोज किती वेळ वर्कआऊट करतो? वाचाल तर खरंच आश्चर्यचकीत व्हाल...

मिलिंद सोमण दररोज किती वेळ वर्कआऊट करतो? वाचाल तर खरंच आश्चर्यचकीत व्हाल...

Fitness Tips By Milind Soman: तुम्हाला काय वाटतं दररोज किती वेळ वर्कआऊट करत असेल आपला फिटनेस फ्रिक अभिनेता मिलिंद सोमण.. वाचा फिटनेस आणि वर्कआऊट बाबतची त्याचीच पोस्ट... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2022 07:27 PM2022-04-07T19:27:07+5:302022-04-07T19:32:11+5:30

Fitness Tips By Milind Soman: तुम्हाला काय वाटतं दररोज किती वेळ वर्कआऊट करत असेल आपला फिटनेस फ्रिक अभिनेता मिलिंद सोमण.. वाचा फिटनेस आणि वर्कआऊट बाबतची त्याचीच पोस्ट... 

You will get surprise after reading the daily workout timing of actor Milind Soman, Viral post on social media | मिलिंद सोमण दररोज किती वेळ वर्कआऊट करतो? वाचाल तर खरंच आश्चर्यचकीत व्हाल...

मिलिंद सोमण दररोज किती वेळ वर्कआऊट करतो? वाचाल तर खरंच आश्चर्यचकीत व्हाल...

Highlights तो म्हणतो जर तुम्हाला आता व्यायाम करायला वेळ मिळत नसेल तर भविष्यात तुम्हाला आजारी पडण्यासाठी नक्कीच वेळ काढावा लागेल.

अभिनेता मिलिंद सोमण किती फिटनेस फ्रिक आहे, हे आपण जाणतोच.. फक्त तोच नाही तर त्याच्या ८० वर्षांच्या आई उषा सोमण आणि त्याची पत्नी अंकिता या दोघीही फिटनेसबाबत अतिशय जागरुक आहेत.. मिलिंदचा जबरदस्त फिटनेस पाहून तो दररोज अमूक- अमूक तास व्यायाम करत असणार असं आपण प्रत्येकानेच आपल्या मनात काही तरी आकडा ठरवलेला असतो... पण त्याने नुकतीच एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर (instagram share) केली असून अनेक जणांनी त्याच्या वर्कआऊटबाबत (daily workout by Milind Soman) बांधलेले अंदाज साफ खोटे ठरवले आहेत. 

 

मिलिंद सोशल मिडियावर बऱ्यापैकी ॲक्टीव्ह असतो आणि फिटनेसबाबत वेगवेगळ्या पोस्ट शेअर करून त्याच्या चाहत्यांना नेहमीच व्यायामाविषयी प्रोत्साहन देत असतो. नुकतीच त्याने शेअर केेलेली पोस्टही याच प्रकारातली आहे. फिटनेस जपण्यासाठी आहार आणि व्यायाम या दोन गोष्टींवर कसं फोकस केलं पाहिजे आणि तो स्वत: याबाबतीत काय- काय करतो हे त्याने सविस्तर सांगितलं आहे. यामध्ये त्याने सांगितलेलं त्याचं स्वत:चं वर्कआऊट टायमिंग खरोखरंच आश्चर्यचकीत करणारं आहे.

 

या पोस्टमध्ये त्याने फिटनेसबाबतचं एक प्रसिद्ध वाक्य सांगितलं आहे. तो म्हणतो जर तुम्हाला आता व्यायाम करायला वेळ मिळत नसेल तर भविष्यात तुम्हाला आजारी पडण्यासाठी नक्कीच वेळ काढावा लागेल. आपली जीवनशैली, सवयी, आहार, सभोवतालचं प्रदुषण यासगळ्या गोष्टी आपण ठरवू त्याप्रमाणे आपल्या तब्येतीवर चांगला किंवा वाईट परिणाम करत आहेत.. 

आहाराविषयी मिलिंद सांगतो...
आपला आहार कसा असावा याविषयी मिलिंदने ३ गोष्टी सांगितल्या आहेत. तो म्हणतो....
१. आपला आहार साधा, सात्विक असावा. 
२. आपण जिथे राहतो त्या प्रांतातले पदार्थ आणि सिझनल पदार्थ आपल्या आहारात भरपूर असावे.
३. आपल्याला ओळखणाऱ्या व्यक्तीच्या हातचं जेवण घ्यावं किंवा मग तुमचा स्वयंपाक तुम्ही स्वत:च करा..

 

व्यायामाबाबत मिलिंद म्हणतो .. 
व्यायामाशिवाय फिटनेस नाहीच.. त्यामुळे दररोज नियमितपणे व्यायाम करा. व्यायामाची सवय होईपर्यंत दररोज ५ मिनिटे का असेना पण काही ना काही वर्कआऊट नक्की करा. यापुढे मिलिंदने असंही सांगितलंय की तो महिन्यातले १५ दिवस प्रवास करतो आणि दररोजचं त्याचं वर्कआऊट सेशन हे केवळ १५ ते २० मिनिटांचं असतं. तो मुळीच जीममध्ये जाऊन तासनतास घाम गाळत नाही.. दररोज नियमितपणे १५ ते २० मिनिटे व्यायाम करून मिलिंदसारखा जबरदस्त फिटनेस मिळत असेल तर काय हरकत आहे, आपणही तसा प्रयत्न करून पहायला?

 

Web Title: You will get surprise after reading the daily workout timing of actor Milind Soman, Viral post on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.