Lokmat Sakhi >Fitness > झरीन खानचं फिटनेस सिक्रेट एरियल योगा, जाणून घ्या ही सोपी योगासनं कशी करायची

झरीन खानचं फिटनेस सिक्रेट एरियल योगा, जाणून घ्या ही सोपी योगासनं कशी करायची

Zareen Khan Aerial Yoga Sana अभिनेत्री झरीन खान जिमसह योग अधिक करते, ती व्यायाम करत असतानाचे फोटो सोशल मिडीयावर शेअर करत असते. तिने नुकतेच एरियल योग केला आहे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2022 03:48 PM2022-11-17T15:48:45+5:302022-11-17T15:49:45+5:30

Zareen Khan Aerial Yoga Sana अभिनेत्री झरीन खान जिमसह योग अधिक करते, ती व्यायाम करत असतानाचे फोटो सोशल मिडीयावर शेअर करत असते. तिने नुकतेच एरियल योग केला आहे..

Zareen Khan's Fitness Secret Aerial Yoga, Learn How To Do This Simple Yoga Asana | झरीन खानचं फिटनेस सिक्रेट एरियल योगा, जाणून घ्या ही सोपी योगासनं कशी करायची

झरीन खानचं फिटनेस सिक्रेट एरियल योगा, जाणून घ्या ही सोपी योगासनं कशी करायची

ir="ltr">बाॅलिवूड अभिनेत्री झरीन खान ही अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जी जिमसह योगाला अधिक प्राधान्य देते. ती स्वतःला खूप फिट ठेवते. ती सोशल मिडीयावर आपले योग करत असतानाचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करते. योगासनाचे अनेक प्रकार ती करताना दिसून येते. तिने नुकतेच एरियल योग करतानाचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहे. योग आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. व्यायाम करण्याचा हा भारतीय प्रकार आहे जो शरीरासह मनाला स्थिर ठेवण्यास मदत करते. आयुर्वेदात योगासनाला खूप महत्त्व आहे. एरियल योग हा योगाचा एक भाग आहे, जो पारंपारिक योगासनांचा नवा प्रकार आहे. एरियल योग हा योगा, जम्नास्टिक्स, डान्स आणि एक्रोबेट्सचा संमिश्र प्रकार आहे. या योगामध्ये शरीराला आधार देण्यासाठी (कापड) झोपाळ्याची मदत घेतली जाते. तिने देखील कापड झोपाळ्याच्या मदतीने विविध योगासने केली आहेत. सध्या ही पोस्ट सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे.

एरियल योग कसा केला जातो

एरियल योग हे पारंपारिक योगाचं नवं रुप आहे. हा योग शरीराला आधार देण्यासाठी झोपाळ्याच्या मदतीने केला जातो. एरियल योगामध्ये, हॅमॉक (झोपाळा) छतावरून लटकत असतो आणि तुम्हाला पाठीवर, डोक्यावर, खांद्यावर आणि मणक्यावर कोणताही दबाव न आणता, स्विंगच्या मदतीने वेगवेगळी आसने करावी लागतात.

एरियल योग करण्याची पद्धत

सिल्क फेब्रिकने शरीर जमीनीपासून काही अंतरावर बांधले जाते.

हवेत योग करताना प्रत्येक पोश्चरवर लक्ष द्यावे लागते.

श्वास, हात आणि पायांच्या मूव्हमेंटवर लक्ष ठेवले जाते.

यात कोणतीच स्टेप चूकवता येत नाही.

योग करणारा झोपाळ्यासारखा झुलत असतो.

जास्त दबाव हा टेलबोनवर पडतो.

योग गुरुशिवाय हा योग करू नये, नवीन असाल तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा योग करावा.

एरियल योग करण्याचे फायदे

कार्डियोवस्कुलरमुळे शरीर निरोगी होते.

पाठदुखी आणि कंबरदुखीपासून आराम मिळतो.

एकाग्रता वाढवण्यात मदत होते.

मसल्स, स्पाइनल आणि खांदे लवचीक बनतात.

तणाव मुक्त झाल्याने मेंदू आणि शरीर रिलॅक्स होते.

शरीराला परिपुर्ण ऑक्सीजन मिळतो. रक्तप्रवाह सुरळीत होतो.

एरियल योग करताना काय परिधान करावे

एरियल योग करताना सैल कपडे परिधान करू नये. कारण हा योग आपण झोपाळ्याच्या सहाय्याने करत असतो. सैल कपडे झोपाळ्यात अडकण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे लांब बाह्यांचे टाॅप आणि लेगिंग्स घालणं योग्य राहील.

Web Title: Zareen Khan's Fitness Secret Aerial Yoga, Learn How To Do This Simple Yoga Asana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Yogazareen KhanFitness Tipsयोगासने प्रकार व फायदेजरीन खानफिटनेस टिप्स