Join us  

रोज पोळ्या करताना पहिली पोळी वाफेनं सादळते, ओली राहते? १ सोपा उपाय, झटपट सुटेल प्रश्न...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2023 11:46 AM

1 easy method to prevent the first chapati from getting wet : डब्यातील ही पहिली पोळी किंवा भाकरी ओली होऊ नये म्हणून सोपा उपाय आपल्याला करता येऊ शकतो.

गव्हाच्या पीठापासून तयार केली जाणारी पोळी किंवा इतर धान्यांची भाकरी असो, आपण रोजच्या जेवणात ती आवडीने खातो. आपल्यापैकी काहीजणांना  सकाळी नाश्त्याला पोळी, पराठे, थालीपीठ खायला आवडते. घरातील प्रत्येक व्यक्तीचा डब्बा गृहिणी सकाळीच बनवते. काही महिला या वर्किंग वुमन असल्याकारणाने सकाळचे व रात्रीचे असे दोन्ही वेळचे जेवण एकदाच बनवून ठेवतात. अशावेळी आपण जेव्हा पोळी, पराठे, थालीपीठ, भाकरी बनवून एका  डब्यात काढून ठेवतो. जेव्हा आपण पहिली पोळी किंवा भाकरी भाजून गरम गरम तव्यावरून उतरवून डब्ब्यात ठेवतो. डब्यातील ती पहिली चपाती गरम वाफेमुळे काही वेळाने ओली होते. या पहिल्या पोळीला नेहमी पाणी सुटते. पाणी सुटल्याकारणाने पोळी, भाकरी, पराठा काहीही असो वाफेने संपूर्ण भिजून जाते. अशी वाफ धरून ओली झालेली पोळी किंवा भाकरी घरातील कोणतीही व्यक्ती खाण्यास तयार होत नाही. तसेच रोज अशी एक पोळी वाया गेल्याने अन्नाचे देखील फार नुकसान होते. अशावेळी ही पोळी किंवा भाकरी फेकून देणे म्हणजे गृहिणीच्या जिव्हारी लागते. डब्यातील ही पहिली पोळी किंवा भाकरी ओली होऊ नये म्हणून सोपा उपाय आपल्याला करता येऊ शकतो(1 easy method to prevent the first chapati from getting wet).

पहिली चपाती वाफ धरून ओली होते? त्यामुळे ती चपाती कुणीही खात नाही अशावेळी काय करावे यासाठीचा एक मस्त सोपा उपाय saritaskitchenofficial या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. 

नक्की काय करता येऊ शकते.. 

आपण पोळी, भाकरी किंवा पराठा गरम तव्यावर भाजून मग तो लगेच ताटात किंवा डब्यात भरून ठेवतो. परंतु असे केल्याने त्या पोळीतील गरम वाफेमुळे  त्याला पाणी सुटते. पाणी सुटल्याने ती पोळी किंवा भाकरी ओली चिंब होते. आपण जर पोळी ठेवण्याच्या डब्ब्यात तळाला टिश्यू पेपर अंथरून घालत असू तर अशावेळी या ओलाव्यामुळे हा टिश्यू पेपर त्या पोळीला किंवा भाकरीला चिटकून राहण्याची शक्यता असते. ही डब्यातील पहिली पोळी वाया जाऊ नये म्हणून तव्यावरून उतरवून ती एका उंच जाळीवर गरम वाफ जाईपर्यंत ठेवावी. जेणेकरून या पोळीतील गरम वाफ या जाळीमधून बाहेर पडेल. यामुळे तुमची डब्यातील पहिली पोळी किंवा भाकरी, पराठा भिजून वाया जाणार नाही. फुलका ग्रील किंवा जाळी तुम्हाला बाजारांत सहज विकत मिळू शकते. जर तुमच्याकडे जाळी नसल्यास तुम्ही मोठी जाळीदार गाळण किंवा लहान छिद्र असलेल्या चाळणीचा वापर करू शकता. अशाप्रकारे तुमच्या डब्यातील पहिली पोळी, भाकरी, थालीपीठ वाफेमुळे भिजून न जाता खाण्यायोग्य राहील.

टॅग्स :अन्न