Lokmat Sakhi >Food > रव्यात अळ्या होवू नयेत म्हणून १ सोपा झटपट उपाय, फ्रीजमध्ये न ठेवताही रवा उत्तम टिकेल...

रव्यात अळ्या होवू नयेत म्हणून १ सोपा झटपट उपाय, फ्रीजमध्ये न ठेवताही रवा उत्तम टिकेल...

How To Preserve Sooji (Semolina) For Long : रवा कितीही व्यवस्थित पद्धतीने पॅकिंग करून ठेवला तरी कालांतराने त्यात लहान अळ्या किंवा किड लागून तो खराब होण्याची शक्यता असते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2023 11:44 AM2023-01-23T11:44:17+5:302023-01-23T12:00:07+5:30

How To Preserve Sooji (Semolina) For Long : रवा कितीही व्यवस्थित पद्धतीने पॅकिंग करून ठेवला तरी कालांतराने त्यात लहान अळ्या किंवा किड लागून तो खराब होण्याची शक्यता असते.

1 Easy Quick Remedy to Preserve Semolina, Semolina will last better even without refrigeration... | रव्यात अळ्या होवू नयेत म्हणून १ सोपा झटपट उपाय, फ्रीजमध्ये न ठेवताही रवा उत्तम टिकेल...

रव्यात अळ्या होवू नयेत म्हणून १ सोपा झटपट उपाय, फ्रीजमध्ये न ठेवताही रवा उत्तम टिकेल...

कोणताही गोड पदार्थ म्हटला की त्यात रवा आपण आवर्जून वापरतो. गोड शिरा, रव्याचे लाडू, रव्याची खीर आपण आवडीने खातो.  उपमा, शिरा, इडली व इतर अनेक पदार्थ तयार करण्यासाठी वापरला जाणारा रवा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. रव्यात फायबर, विटामिन बी कॉम्‍पलेक्‍स आणि विटामिन इ, मिनरल्स असे आवश्यक पोषक तत्त्व आढळतात. रव्यात कार्बोहाइड्रेट अधिक असल्यामुळे शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते. ब्रेकफास्टमध्ये रव्याने तयार केलेले पदार्थ खाल्ल्याने दिवसभर एनर्जी राहते. रव्याचे पाकीट आपण एकदा फोडले आणि त्यानंतर उरलेला रवा कितीही व्यवस्थित पॅकिंग करून ठेवला तरी त्यास अळया लागून तो खराब होण्याची शक्यता असते. अशावेळी एक सोपा उपाय वापरून आपण रवा स्टोअर करून ठेवल्यास तो चांगला टिकून राहतो(How To Preserve Sooji (Semolina) For Long). 

नक्की काय उपाय करता येऊ शकतो? 

आपण महिनाभराचा किराणा सामान आणताना त्यात त्यात रवा आठवणीने घेऊन येतोच. घरी बनवल्या जाणाऱ्या बऱ्याचश्या पदार्थांमध्ये आणि मुख्यत्वे करून गोड पदार्थांमध्ये रवा वापरला जातो. बाजारातून आणलेले रव्याचे पाकीट एकदा फोडले की आपण एकाच वेळी त्यातला सगळा रवा वापरत नाही. उरलेला रवा आपण व्यवस्थित पॅक करून फ्रिजमध्ये किंवा हवाबंद डब्यात भरून ठेवतो. रवा आपण कितीही व्यवस्थित पद्धतीने पॅकिंग करून ठेवला तरी काही कालांतराने त्यात लहान लहान अळ्या तयार होऊन तो खराब होण्याची शक्यता असते. असा रवा आपल्याला पुन्हा वापरता येत नाही. बाजारातून आणलेले रव्याचे पाकीट एकदा फोडून ठेवल्यानंतर उरलेल्या रव्यात अळ्या तयार होऊन तो वाया जाण्याची शक्यता असते. अशावेळी एक सोपा उपाय करून रव्यामध्ये तयार होणाऱ्या अळ्यांना प्रतिबंधित करून रवा व्यवस्थित स्टोअर करून ठेवू शकतो.

foodielalita या इंस्टाग्राम पेजवरून रव्यामध्ये अळ्या तयार होऊ नयेत म्हणून काय उपाय करता येऊ शकतो, याबद्दलचा एक सोपा उपाय शेअर करण्यात आला आहे. नक्की काय उपाय आहे ते समजून घेऊयात. 

एक सोपा उपाय...

१. रव्याच्या पाकिटातील उरलेला रवा एका पॅन मध्ये ओता. 
२. मंद आचेवर हा रवा व्यवस्थित भाजून घ्या. (आच मंदच ठेवा.)
३. लक्षात ठेवा भाजताना या रव्याचा रंग पांढरा शुभ्रच राहिला पाहिजे. 
४. मंद आचेवर रवा व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर तो एका डिशमध्ये काढून थंड करून घ्या. 
५. रवा थंड झाल्यानंतर तो एका स्वच्छ धुवून, वाळवून घेतलेल्या हवाबंद डब्यात भरून ठेवा. 
६. रवा हवाबंद डब्यात भरून ठेवताना त्या डब्यात एक तमालपत्राचे (Bay Leaf) पान ठेवा.      
७. डब्याचे झाकण व्यवस्थित बंद करून रवा स्टोअर करून ठेवा. 

असे केल्यास रव्यामध्ये अळ्या तयार होणार नाहीत व रवा जास्त काळ टिकेल. 

Web Title: 1 Easy Quick Remedy to Preserve Semolina, Semolina will last better even without refrigeration...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.