Lokmat Sakhi >Food > पोहे जास्त पौष्टिक आणि चविष्ट होण्यासाठी शेफ संजीव कूपर सांगतात खास रेसिपी, नाश्त्याची वाढेल रंगत

पोहे जास्त पौष्टिक आणि चविष्ट होण्यासाठी शेफ संजीव कूपर सांगतात खास रेसिपी, नाश्त्याची वाढेल रंगत

1 Easy Recipe of Poha to make it more nutritious : पाहूयात नेहमीच्याच पोह्यांची थोडी आगळीवेगळी रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2024 11:08 AM2024-03-01T11:08:05+5:302024-03-04T16:29:05+5:30

1 Easy Recipe of Poha to make it more nutritious : पाहूयात नेहमीच्याच पोह्यांची थोडी आगळीवेगळी रेसिपी...

1 Easy Recipe of Poha to make it more nutritious : Sanjeev Kapoor tells 1 simple trick to make regular Poha more nutritious, breakfast will be nutritious... | पोहे जास्त पौष्टिक आणि चविष्ट होण्यासाठी शेफ संजीव कूपर सांगतात खास रेसिपी, नाश्त्याची वाढेल रंगत

पोहे जास्त पौष्टिक आणि चविष्ट होण्यासाठी शेफ संजीव कूपर सांगतात खास रेसिपी, नाश्त्याची वाढेल रंगत

नाश्त्याला किंवा कोणी पाहुणे आल्यावर झटपट करता येईल असा पदार्थ म्हणजे कांदेपोहे.अगदी १० मिनीटांत होणारे हे पोहे अनेकांच्या आवडीचा पदार्थ असतो. पटकन होत असल्याने आणि पोटभरीचा पदार्थ असल्याने बहुतांश जणांकडे नाश्त्याला आवर्जून गरमागरमपोहे किंवा उपमा केला जातो. अनेकांना हे पोहे इतके आवडतात की आठवड्यातून २ ते ३ वेळा तरी पोहे केले जातात. पोहे म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर गरगमागरम कांदेपोहे किंवा बटाटा पोहे त्यावर कोथिंबीर, शेव असे चित्र येते (1 Easy Recipe of Poha to make it more nutritious). 

काहीवेळा आपण त्यात मटार, टोमॅटो, शेंगादाणे हेही घालतो. याशिवाय दही पोहे, दडपे पोहे हेही पोह्याचे थोडे वेगळे आणि चविष्ट लागणारे प्रकार. मात्र या पोह्यातून म्हणावे तितके पोषण मिळतेच असे नाही. मग पोह्यांचे पोषण वाढवण्यासाठी असे काय करता येईल जेणेकरुन नेहमीचेच पोहे जास्त पौष्टीक होतील. प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यासाठीच एक खास रेसिपी सांगतात, त्यानुसार पोहे केले तर पोह्यांचे पोषण वाढण्यास मदत होते. पाहूयात ही रेसिपी नेमकी कशी करायची. 

(Image : Google)
(Image : Google)

१. नाश्ता हा आपला दिवसातील पहिला आहार असून शरीराला जास्त पोषण मिळावे यासाठी त्यात प्रोटीन्सचे प्रमाण चांगले असावे असे सांगितले जाते. 

२. पोह्यामध्ये प्रोटीन्सचा समावेश कसा करणार असा प्रश्न साहजिकच आपल्याला पडू शकतो. 

३. पण नेहमीच्याच पोह्यामध्ये मोड आलेले मिक्स कडधान्य घातल्यास या पोह्यांची चव आणि पोषण दोन्हीही वाढू शकते. 

४. नेहमीप्रमाणे फोडणीमध्ये कांदा, मिरची, कडीपत्ता घालून त्यात मोड आलेली आणि शिजवलेली कडधान्य घालायची. 

५. मग यात पोहे, मीठ, साखर घालून पोहे नेहमीप्रमाणे परतायचे आणि वाफ काढायची. 

६. नागपूरमध्ये खाल्ले जाणारे तर्री पोहे हा अशाचप्रकारे पोषक असा पोह्यांचा एक प्रकार असतो. 

७. हे पोहे करायलाही सोपे असून  पौष्टीकतेच्या दृष्टीने चांगले असल्याने तुम्हीही आवर्जून ते ट्राय करुन पाहायला हवेत. 

Web Title: 1 Easy Recipe of Poha to make it more nutritious : Sanjeev Kapoor tells 1 simple trick to make regular Poha more nutritious, breakfast will be nutritious...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.