Join us  

पालेभाज्या सुकतात-सफरचंद काळी पडतात? लिंबाच्या रसाचा एक सोपा उपाय, काही मिनिटात दिसतील फ्रेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2023 4:27 PM

1 Easy Way to Keep Apple From Turning Brown, and leafy vegetables from dry : पालेभाज्या सुकल्यावर, व सफरचंद काळपट पडल्यावर कोणीच खात नाही, त्यावर एक भन्नाट उपाय

ठळक मुद्देभाज्या सुकल्यानंतर पुन्हा ताजे, व सफरचंद लवकर काळपट पडू नये, असे वाटत असेल तर, लिंबाच्या रसाचा वापर करून पाहा.

आहारात भाज्या, फळे, व ड्रायफ्रुट्सचा समावेश करायला हवा, असा सल्ला तज्ज्ञ देतात. ज्यात पालेभाज्या (Leafy Vegetables) जास्त प्रमाणात खाण्याचा सल्लाही मिळतो. पालेभाज्या खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. लहानग्यांपासून थोरामोठ्यांपर्यंत प्रत्येकाला याचा फायदा होतो. भाजी मंडईत अनेक प्रकारच्या पालेभाज्या मिळतात. पालक, मेथी, चाकवत, शेपू, अंबाडी, करडईची भाजी आवडीने खाल्ली जाते. पण या भाज्या लवकर सुकतात. ज्यामुळे खाताना घरातील सदस्य नाकं मुरडतात.

याशिवाय सफरचंद देखील कापल्यानंतर लगेच काळपट पडतात. भाज्या सुकल्यानंतर पुन्हा ताजे, व सफरचंद (Apple) लवकर काळपट पडू नये, असे वाटत असेल तर, लिंबाच्या रसाचा वापर करून पाहा. यामुळे पालेभाजी जरी कितीही सुकली तरी, लिंबाच्या वापराने ते पुन्हा फ्रेश दिसतील. यासह सफरचंद देखील लवकर काळपट पडणार नाही(1 Easy Way to Keep Apple From Turning Brown, and leafy vegetables from dry).

पालेभाज्या - सफरचंद फ्रेश ठेवण्यासाठी लिंबाचा एक सोपा उपाय

अशा पद्धतीने सुकलेल्या पालेभाज्यांवर करा लिंबाचा वापर

अनेकदा फ्रिजमध्ये पालेभाज्या ठेवल्याने सुकतात, किंवा भाज्या निवडून ठेवल्याने त्या लवकर सुकतात. जर पालेभाजी सुकली असेल तर, लिंबाच्या रसाचा वापर करून पाहा. यासाठी एका बाऊलमध्ये थंड पाणी घ्या. त्यात पालेभाज्या भिजत ठेवा. नंतर त्यात लिंबाचा रस घालून मिक्स करा. ५ मिनिटानंतर भाजीमधून पाणी काढा. यामुळे सुकलेली पालेभाजी फ्रेश दिसेल.

हात न लावता पीठ मळता येते? एक ट्रिक-२ मिनिटात पीठ मळण्याची सुपरफास्ट पद्धत

कमी तेल पिणारे हिरव्या मुगडाळीचे मेदूवडे करण्याची सोपी रेसिपी, उडीद डाळीपेक्षा पचायलाही हलके आणि पौष्टिक

सफरचंदावर लिंबाचा करा असा वापर

टिफिनमध्ये बरेच जण सफरचंद कापून नेतात. अशा वेळी सफरचंदाचे तुकडे लगेच काळपट पडतात. सफरचंदाचे तुकडे लवकर काळपट पडू नये असे वाटत असेल तर, लिंबाच्या रसाचा वापर करून पाहा. यासाठी सफरचंद कापून झाल्यानंतर त्यावर लिंबाचा रस लावा. लिंबाच्या रसामुळे सफरचंदाचे तुकडे लवकर काळपट पडणार नाही.

टॅग्स :किचन टिप्सअन्नसोशल व्हायरल