मीठ हा आपल्या रोजच्या जेवणातील सर्वात मुख्य आणि महत्वाचा पदार्थ आहे. मिठाशिवाय अन्नाला चव येऊ शकत नाही. जेवण अळणी असेल किंवा त्यात मीठ कमी असेल तर असे जेवण आपण खाऊ शकत नाही. जेवणाला स्वाद आणणारे मसाले आणि मीठ हे दोन्ही पदार्थ अतिशय महत्वाचे असतात. यातला एखादा पदार्थ जरी कमी पडला ते जेवण बेचव लागते. पदार्थांतील स्वाद चव वाढण्यासाठी तसेच आरोग्यासाठी नेहमी जेवणात मिठाचा वापर करत असतो. पण आपल्या मानवी शरीराची रचना अशी केलली गेलेली आहे की आपल्याला जसे जेवणात कमी मीठ असले तर ती भाजी अळणी आणि बेचव लागत असते. तसेच ते मीठ कोणत्याही पदार्थांत प्रमाणापेक्षा जास्त घातले गेले तर ते देखील आपल्या आरोग्याला हानीकारक ठरते. म्हणजेच मीठ ही एक अशी गोष्ट आहे ज्याचे प्रमाण पदार्थांत कमी असल्यावर पदार्थांची चव बेचव लागते. तेच मिठाचे प्रमाण जास्त झाले तर आपल्या आरोग्यासाठी नुकसानदायी ठरते.
सध्या बाजारांत मिठाचे वेगवेगळे प्रकार पहायला मिळतात. आयोडिनयुक्त मीठ, सैंधव मीठ, खडा मीठ, काळे मीठ असे अनेक प्रकार पहायला मिळतात. मीठ हा असा पदार्थ आहे की त्याला आपण व्यवस्थित सुक्या बरणीत भरुन साठवून ठेवतो. मिठाला आपला जरा ओलसर हात लागला तर मीठ लगेच खराब होते. काहीवेळा घाईगडबडीच्या वेळी स्वयंपाक करताना आपल्या हातून चुकून मिठात पाणी सांडले जाते. काहीवेळा हवामानातील दमटपणामुळे मिठाच्या बरणीला ओलसरपणा लागून मीठ खराब होण्याची शक्यता असते. अशावेळी हे ओले झालेले मीठ फेकून देण्यापेक्षा एक सोपी ट्रिक वापरुन आपण मिठातील ओलसरपणा काढू शकतो(How to dry salt and keep it dry 1 genius trick).
मिठातील ओलसरपणा काढण्यासाठी एक सोपी ट्रिक :-
ओलसर झालेले मीठ एका पॅनमध्ये ओतून घ्यावे. पॅनमध्ये ओतून घेतलेले मीठ गॅसच्या मध्यम आचेवर ३ ते ५ मिनिटे गरम करुन घ्यावे. हे मीठ गरम करत असताना अधून - मधून चमच्याने हलकेच ढवळत राहावे. मीठ व्यवस्थित गरम झाल्यावर त्यातील पाणी उष्णतेमुळे निघून जाऊन मीठ वाळते. तसेच मीठ पूर्ववत होऊ लागते. मीठ पूर्ववत झाल्यानंतर त्यातील पाणी निघून गेल्यानंतर मीठ वाळून सुके होऊ लागते. मीठ संपूर्णपणे वाळून आधीसारखे पूर्ववत झाल्यानंतर थोडे गार होण्यासाठी ठेवावे. हे मीठ गार झाल्यानंतर मिठाच्या बरणीत आधी चमचाभर तांदूळ घालूंन घ्यावेत. त्यानंतर या बरणीत मीठ ओतून घ्यावे. आता या बरणीचे झाकण व्यवस्थित बंद करुन ठेवावे. बरणीत हवा जाणार नाही याची खात्री करून घ्यावी. यासाठी हवाबंद बरणीचा वापर करावा. अशाप्रकारे ही एक सोपी ट्रिक वापरुन आपण मिठातील ओलसरपणा लगेच काढू शकतो.
दिवसभर मुलांचा दंगा, काहीतरी खायला दे अशी भूणभूण? करा चीज पराठा, सुटीचा स्पेशल बेत...
फ्रिजरमध्ये खूप बर्फ साचतो, फ्रिजमधून पाणी गळू लागते ? ७ सोपे उपाय, कुलिंगही होईल चांगले...