Join us  

उरलेला पिझ्झा परत गरम करुन खाण्याची १ सोपी भन्नाट ट्रिक ! पिझ्झा टॉपिंग, सॉसची चव लागेल एकदम फ्रेश...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2023 1:05 PM

Kitchen Hack : How To Reheat Pizza Without Making it Soggy or Dry : उरलेला शिळा पिझ्झा परत गरम करताना त्याचा बेस करपतो ? पिझ्झा गरम करण्याची पण एक खास युक्ती आहे...

पिझ्झा म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला आपसूकच पाणी सुटत. वेगवेगळ्या भाज्या, चिज, पनीर घातलेला गरमागरम पिझ्झा अनेक जण कोणत्याही वेळेला खाऊ शकतात. अनेक प्रकारचे व्हेजिटेबल आणि चमचमीत सॉस यांपासून बनलेला पिझ्झा खाण सगळेच पसंत करतात. मैद्याचा वापर करून तयार केलेला गोल जाडसर पिझ्झा बेस वापरून आपण पिझ्झा तयार करतो. संध्याकाळच्या नाश्त्याला आपल्याला असच चटपटीत खावंसं वाटत, किंवा काहीवेळा रोजच्या जेवणाचा कंटाळा आला की आपण काहीतरी चमचमीत खातो(How to Reheat Pizza So It Tastes as Good as Day One).

पिझ्झा खावासा वाटला की आपण तो काहीवेळा घरीच बनवतो तर काहीवेळा बाहेरुन ऑर्डर करतो. शक्यतो बाहेरून ऑर्डर केलेला पिझ्झा आपण एकदा मागवला की सगळा संपल्याशिवाय राहत नाही. पिझ्झा समोर येताच काही क्षणांत तो फस्त केला जातो. फार क्वचित वेळीच असं होत की तो पिझ्झा उरतो. हा उरलेला पिझ्झा आपण फ्रिजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी तो गरम करून खातो. परंतु दुसऱ्या दिवशी फ्रिजमधून काढून गरम केलेला हा पिझ्झा हा चवीला आधीसारखा लागत नाही. तसेच तो शिळा पिझ्झा वारंवार पुन्हा गरम केल्यामुळे त्याचा बेस काहीवेळा करपू शकतो किंवा तो चवीला वेगळा लागू शकतो. अशावेळी हा शिळा पिझ्झा व्यवस्थित गरम न झाल्याने त्यातील टॉपिंग किंवा सॉस यांची म्हणावी तशी चव दुसऱ्या दिवशी लागत नाही. अशा परिस्थितीत हा शिळा पिझ्झा गरम करण्याची (1 Easy Steps To Reheat Pizza In A Pan) एक सोपी ट्रिक समजून घेऊयात. ज्यामुळे उरलेला पिझ्झा व्यवस्थित गरम होऊन पुंन्हा खाण्यासाठी तयार असतो(1 Mind-Blowing Hacks for Making Your Leftover Pizza Taste Better the Next Day).

उरलेला शिळा पिझ्झा पुंन्हा खाण्यासाठी गरम करण्याची एक सोपी ट्रिक... 

एकदा खाऊन उरलेला पिझ्झा आपण दुसऱ्या दिवशी खाण्यासाठी शक्यतो फ्रिजमध्ये ठेवतो. फ्रिजमध्ये ठेवलेला हा पिझ्झा आपण दुसऱ्या दिवशी बाहेर काढून गरम करून खातो. हा पिझ्झा गरम करताना आपण पॅनमध्ये तेल किंवा बटर पसरवून त्यावर हा पिझ्झा गरम करतो. परंतु असे केल्याने या पिझ्झाचा फक्त बेसच गरम होतो तर काहीवेळा पिझ्झा बेस जास्त गरम झाल्याने करपतो किंवा कडक होतो. अशा पद्धतीने पिझ्झा गरम केल्यास त्याचे टॉपिंग व्यवस्थित गरम न झाल्याने त्याची पाहिजे तशी चव लागत नाही. यासाठी उरलेला पिझ्झा गरम करण्याची एक सोपी ट्रिक.     

उरलेले पनीर फ्रिजमध्ये ठेवले तरी लगेच शिळे - पिवळे दिसते, १ सोपी ट्रिक- पनीर राहील ताजे फ्रेश!

उकडलेले गरम बटाटे सोलण्याची १ सोपी ट्रिक, हात न पोळता साल काढा झटपट...

१. सर्वप्रथम एक पॅन घेऊन त्यावर झाकण ठेवून तो २ ते ३ मिनिटे प्री - हिट करून घ्यावा. 

२. प्री - हिट केल्यानंतर त्या पॅनचे झाकण उघडून त्यात उरलेल्या पिझ्झ्याचे तुकडे ठेवावेत. 

३. हे पिझ्झाचे तुकडे पॅनमध्ये ठेवल्यानंतर त्यात १ ते २ बर्फाचे खडे घालून परत पॅनवर झाकण ठेवावे. 

मोड आलेली कच्ची उसळ चिकट होते, आंबूस वास येतो ? १ भन्नाट ट्रिक, उसळ राहील फ्रेश...

बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर यात फरक काय असतो ? ओळखायचे कसे, चुकून भलतेच वापरले तर...

४. आता गॅसच्या मंद आचेवर हा पिझ्झा गरम करून घ्यावा. 

५. लक्षात ठेवा पॅनमध्ये घातलेले बर्फाचे खडे वाफेने संपूर्णपणे वितळेपर्यंत पिझ्झा मंद आचेवर गरम करून घ्यावा. पिझ्झा गरम करताना आपण बर्फासोबतच त्यावर थोडेसे पाणीदेखील शिंपडू शकतो.

 ६. जर आपण अशा पद्धतीने पिझ्झा गरम केला तर त्याचा बेस करपून न जाता तो सगळ्या बाजुंनी व्यवस्थित गरम होतो. तसेच त्यावर घातलेले चीझ देखील व्यवस्थित वितळून हा फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा पिझ्झा पुन्हा खाण्यासाठी तयार असतो.

टॅग्स :अन्नकिचन टिप्स