Join us  

हॉटेलस्टाइल कुरकुरीत कांदा भजी करण्याची १ झटपट ट्रिक, भजी होतील खमंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2023 6:34 PM

Onion Pakoda Recipe, How to Make Onion Pakora हॉटेलस्टाइल कुरकुरीत कांदा भजी घरी होत नाहीत? मऊ पडतात, ही घ्या एक खास टिप

गरमा - गरम कुरकुरीत कांदा भजी कोणाला आवडत नाही. कांदा भजीचं नाव जरी ऐकलं की तोंडात पाणी सुटलेच म्हणून समजा. कांदा भजी हा पदार्थ कांदा, बेसन व इतर चमचमीत मसाल्यांपासून तयार होतो. मात्र, घरी कांदा भजी घरी ट्राय करून पाहिली की, हॉटेलसारखी चव भज्यांना येत नाही. त्यांना मऊपणा येतो.

आपल्याला हॉटेल स्टाईल भजी घरी ट्राय करायची असेल, तर काही ट्रिक फॉलो करा. या टिप्समुळे भजी नक्कीच कुरकुरीत आणि चमचमीत बनतील. आपण ही भजी चहासोबत अथवा सायंकाळचा नाश्ता म्हणून खाऊ शकता. चला तर मग या क्रिस्पी पदार्थाची कृती पाहूयात.

क्रिस्पी कांदा भजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य

बारीक - लांब चिरलेला कांदा

हिरवी मिरची

काश्मिरी लाल तिखट

जिरं पावडर

धणे पूड

आमचूर पावडर

ओवा

बेसन

तांदळाचं पीठ

मीठ

तेल

पाणी

अशी बनवा कुरकुरीत कांदा भजी

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये कांद्याचे बारीक लांब काप करून घ्या. त्यानंतर त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, काश्मिरी लाल तिखट, जिरं पावडर, धणे पूड, आमचूर पावडर आणि ओवा घाला. आता त्यात १ कप बेसन, अर्धा कप तांदळाचं पीठ आणि चवीनुसार मीठ घालून संपूर्ण मिश्रण मिक्स करा.

कांद्याला पाणी सुटते, जर पाणी सुटले नसेल तर, किंचित पाणी मिसळून मिश्रण मिक्स करा. मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा.

रात्री भात जास्त उरला? करा क्रिस्पी भात वडे - नाश्ता झटपट, खा पोटभर

दुसरीकडे गॅसवर कढई ठेवा. कढईत तेल गरम करत ठेवा. तेल गरम झाल्यानंतर, त्यात भजीचे तयार पीठ हाताने छोटे छोटे गोळे करून सोडा. भज्यांना गोल्डन ब्राऊन रंग येउपर्यंत तळून घ्या. अशा प्रकारे कुरकुरीत कांदा भजी खाण्यासाठी रेडी. आपण या भजीचा आस्वाद चहा अथवा सॉस सोबत लुटू शकता.

टॅग्स :अन्नकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.