Lokmat Sakhi >Food > पालेभाज्या फ्रिजमध्ये जास्त दिवस ताज्या ठेवण्याचा १ सोपा उपाय, भाज्या सडणार नाहीत..

पालेभाज्या फ्रिजमध्ये जास्त दिवस ताज्या ठेवण्याचा १ सोपा उपाय, भाज्या सडणार नाहीत..

Keep Your Leafy Vegetables Fresh In Refrigerator : पालेभाज्यांची जुडी आणली आणि एकावेळी ती संपली नाही तर भाजी सडते, वाया जाते..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2023 02:47 PM2023-01-11T14:47:34+5:302023-01-11T14:50:55+5:30

Keep Your Leafy Vegetables Fresh In Refrigerator : पालेभाज्यांची जुडी आणली आणि एकावेळी ती संपली नाही तर भाजी सडते, वाया जाते..

1 simple solution to keep leafy vegetables fresh for longer in the fridge. | पालेभाज्या फ्रिजमध्ये जास्त दिवस ताज्या ठेवण्याचा १ सोपा उपाय, भाज्या सडणार नाहीत..

पालेभाज्या फ्रिजमध्ये जास्त दिवस ताज्या ठेवण्याचा १ सोपा उपाय, भाज्या सडणार नाहीत..

आपण बाजारात गेल्यावर किमान पुढचे ३ ते ४ दिवस पुरतील इतक्या भाज्या नक्कीच आणून ठेवतो. या भाज्यांमध्ये आपण कडधान्य, फळभाज्या, पालेभाज्या आणतो. कडधान्य व फळभाज्या फ्रिजमध्ये बराच काळ टिकतात परंतु प्रश्न उरतो तो फक्त पालेभाज्यांचा. बाजारातून विकत आणलेली पालेभाजी आपल्याला त्याच दिवशी करायला जमेलच असे नाही. अशा वेळी या पालेभाज्या फ्रिजमध्ये ठेवल्याने तितक्या फ्रेश राहत नाहीत. कधी या पालेभाज्या फ्रिजमध्ये ठेवल्याने खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे जर आपल्याला जास्त दिवस पालेभाज्या फ्रिजमध्ये ठेवायच्या असतील तर पालेभाज्या स्टोअर करण्याची ही पद्धत नक्की ट्राय करा(Keep Your Leafy Vegetables Fresh In Refrigerator).

पालेभाज्या फ्रिजमध्ये स्टोअर करण्याचा सोपा उपाय... 

foody_class_या इंस्टाग्राम पेजवरून पालेभाज्या जास्त दिवस कशा टिकवून ठेवाव्यात याची सोपी पद्धत दिली आहे ती समजून घेऊ.  

आजकालच्या धकाधकीच्या काळात स्वयंपाक पटकन करण्यासाठी अनेक आधुनिक साधनसामुग्रीची मदत होते. नोकरी करणाऱ्या महिलांसाठी फ्रीज तर एक वरदानच आहे. कारण फ्रीजमध्ये अन्नपदार्थांसोबतच फळं, भाज्या, दूध असे अनेक नाशवंत पदार्थ बरेच दिवस टिकवून ठेवता येतात. परंतु फ्रिजमध्ये फळं आणि भाज्या टिकवून ठेवण्यासाठी ते व्यवस्थित साठवून ठेवायला हवे. नाहीतर जास्त दिवस ठेवल्यानंतर फळं आणि भाज्या ओलाव्यामुळे सडू शकतात. यासाठीच जास्तीत जास्त दिवस भाज्या आणि फळं फ्रिजमध्ये टिकवण्यासाठी फॉलो करा या सोप्या टीप्स. 

१. सर्वप्रथम पालेभाजी नीट निवडून घ्या. 
२. ही निवडून घेतलेली पालेभाजी न धुता किंवा धुवून घेतल्यास व्यवस्थित वाळवून घ्या. 
३.  ही पालेभाजी एका वर्तमानपत्रांत व्यवस्थित बांधून घ्या. 
३. वर्तमानपत्रांत बांधून घेतलेली ही पालेभाजी फ्रिजमध्ये स्टोअर करा. 


भाज्या, फळं, पालेभाज्या फ्रिजमध्ये  साठवण्यासाठी इतर काही सोप्या टीप्स समजून घेऊयात...
१. फळं आणि भाज्या कधीच प्लास्टिकच्या हवाबंद पिशवी किंवा डब्यात ठेवू नका.
२. भाज्या आणि फळं एकत्र साठवून ठेवू नयेत असं केल्यास त्या लवकर सडतात.
३. कंदमुळे साठवून ठेवण्यापूर्वी त्याच्या देठाकडचा भाग कापून घ्या आणि मग साठवून ठेवा. असे केल्यास कंदमुळे जास्त काळ टिकतात.  
४. नाजूक फळं जसे की स्टॉबेरी, ब्लू बेरी, अंजीर अथवा टोमॅटो सारख्या भाज्या एकमेंकांवर ठेवू नका.
५. पालेभाज्या निवडून, धुवून आणि सुकवून टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून ठेवा. 
६. एखादी भाजी किंवा फळं खराब झालं तर ते लगेच इतर भाज्या आणि फळांपासून वेगळं करा नाहीतर त्यामुळे इतर भाज्या, फळं खराब होतात.

Web Title: 1 simple solution to keep leafy vegetables fresh for longer in the fridge.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.