Join us  

उरलेला केक लवकर शिळा होवू नये म्हणून १ सोपी ट्रिक, फ्रीजमध्ये केक राहील फ्रेश...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2023 5:47 PM

The Best Ways To Store Cake In Refrigerator : उरलेला केक दुसऱ्या दिवशी खाताना तो जसा आहे तसाच व्यवस्थित हवा असेल तर एक सोपी ट्रिक वापरून स्टोअर करून ठेवू शकता.   

आजकाल वाढदिवस असो किंवा कोणतेही फंक्शन केक कापून तो क्षण साजरा करणे हे आलेच. केक आवडत नाही असा एकही व्यक्ती अस्तित्वात नसेल. केक हा असा पदार्थ आहे की, जो बहुतेक लोकांना फारच प्रिय असतो, आणि काही लोकांना जर त्याचे नाव ऐकले तर खाल्ल्याशिवाय चैनच पडत नाही. सण, फंक्शन काहीही असो केक कापून त्या कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केला जातो. घरातील प्रत्येक व्यक्तीचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस यासारख्या खास क्षणांसाठी केक आणला जातो. अशावेळी हा केक खाऊन फस्त केला जातो. फारच क्वचित वेळ अशी असेल की केक थोडाफार उरत असेल. हा उरलेला केक आपण फ्रिजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी खाऊ शकतो. उरलेला केक डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवताना त्याची क्रिम डब्याला चिकटून केक दुसऱ्या दिवशी खाताना त्याची मज्जा निघून जाते. जर तुम्हांला उरलेला केक दुसऱ्या दिवशी खाताना तो जसा आहे तसाच व्यवस्थित हवा असेल तर एक सोपी ट्रिक वापरून तुम्ही केक व्यवस्थित फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता(The Best Ways To Store Cake In Refrigerator).

काय आहे सोपी पद्धत... 

उरलेला केक आपण डब्यांत भरून फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवतो. हा केक डब्यात अस्ताव्यस्त भरून ठेवल्याने दुसऱ्या दिवशी केक खायचा म्हटलं तर त्याची क्रिम डब्याला चिकटलेली असते. अशावेळी हा क्रिम शिवाय केक खाण आपण पसंत करत नाही. तसेच डब्यात अस्ताव्यस्त पद्धतीने कोंबून भरलेला केक खाण्यात मज्जा येत नाही. अशावेळी एक सोपी ट्रिक वापरून आपण हा उरलेला केक आहे त्या स्थितीत स्टोअर करून व्यवस्थित फ्रिजमध्ये ठेवू शकतो. 

busezeyneppp या इंस्टाग्राम पेजवरून उरलेला केक आहे त्या स्थितीत उचलून व्यवस्थित फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो याबद्दलचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.  

 

 

एक सोपी ट्रिक :- 

१. उरलेला केक किती आहे त्याचा अंदाज घ्या. २. उरलेला केक संपूर्ण मावेल इतका मोठा डबा घ्यावा, डबा शक्यतो मोठा आणि पारदर्शक असावा. जेणेकरून आपल्याला आतील केक दिसू शकेल. ३. आता हा डबा उलटा करा. (डब्याचे झाकण खाली येईल आणि त्यावर डबा येईल अशा पद्धतीने उघडा.)४. आता या डब्याच्या झाकणांत उरलेला केक अलगद ठेवून घ्यावा. ५. या झाकणात केक संपूर्ण व्यवस्थित बसवून त्यावरून डबा अलगद लावून घ्यावा. (हे करत असताना डबा थोडा मोठा घ्यावा जेणेकरून केकची क्रिम डब्याला चिकटणार नाही.याची खबरदारी घ्यावी.)  ६. आता हा उलटा डबा तसाच उचलून फ्रिजमध्ये ठेवावा. 

दुसऱ्या दिवशी किंवा केक खाण्यासाठी डबा अलगद उघडून घ्यावा. ही ट्रिक वापरल्यास तुमचा केक आहे तसाच व्यवस्थित राहू शकतो. यामुळे दुसऱ्या  दिवशीसुद्धा केक खाताना मज्जा येईल.

टॅग्स :अन्नकिचन टिप्स